अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..
नभी काजळी दाटता सूर ओला
उरा अंतरातून बरसून गेला
झरा आत वाहे,तरीही सुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
कुणी हासते वा कुणी गीत गाते
कुणी प्रेमरंगात रंगून जाते
उभी एकटी दूर सार्याहुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
झरावे किती मेघ आतून सारे
फुलावे किती अंतरंगी शहारे
फिरो गार वारा किती आसमंती
तरी कोरडासा उरे जीव अंती
नव्याने नटो ही धरा मेघवेडी
नवी बावरी लाजुदे सांज थोडी
उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा
सुटावे जिणे,श्वास माझा सरावा
उरो शेवटाला तुझी होवुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
© डॉ.अदिती शरद जोशी
💬 प्रतिसाद
(20)
प
पाषाणभेद
Wed, 07/23/2014 - 03:06
नवीन
वा छान
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 07/23/2014 - 05:46
नवीन
उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी>>> येकच नंबर! *good*
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Wed, 07/23/2014 - 06:27
नवीन
सुंदर ,मनाला भिडणारी कविता
- Log in or register to post comments
अ
अधिराज
Wed, 07/23/2014 - 06:46
नवीन
क्या बात है! हृदयाचा ठाव घेणारी कविता!
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 07/23/2014 - 08:35
नवीन
कविता मीटरवर म्हणायला मजा आली. पण अर्थाचे म्हणाल तर त्यातल्या सखीची आर्तता तितकीशी भिडली नाही. थोडे अलंकारिक लिहिण्याच्या नादात कदाचित थोडा विस्कळीतपणा आलाय की काय असे वाटले. राग मानू नका हो. हे कदाचित फक्त मलाच जाणवले असेल. इतरांना आवडलीय म्हणजे तसे नसेलही.
पुकशु.
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 07/25/2014 - 08:45
नवीन
+१
व्याकरणाला बांधून तरीही अगदी करकचून छंदबद्ध अशी ही कविता केली आहे (कविता मीटर!! :-)) ). पण ती फारच क्लीष्ट झाली आहे वाचायला...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 08:40
नवीन
सुंदर :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 07/23/2014 - 09:00
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/23/2014 - 10:57
नवीन
झरावे किती मेघ आतून सारे
फुलावे किती अंतरंगी शहारे
फिरो गार वारा किती आसमंती
तरी कोरडासा उरे जीव अंती
खासच..!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Sat, 07/26/2014 - 03:25
नवीन
हेच कडवं आवडलं मलाही.
छान आहे कविता.
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 08/04/2014 - 15:26
नवीन
असेच म्हणतो. सुंदर रचना.
तसेच शेवटचे कडवे वेगळ्या दृष्टीनं बघीतलं तर आणिक सुंदर भासतंय..! खूप छान! :)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 07/23/2014 - 19:47
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Wed, 07/23/2014 - 20:12
नवीन
(अवांतरः आनंदमयींच्या कवितांमुळे मिपावर याआधी लयदार कविता लिहिणार्या प्राजुची आठवण होते.)
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/24/2014 - 09:10
नवीन
अतिशय सुंदर रचना.... आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 07/25/2014 - 08:38
नवीन
मस्तं! खूप आवडली कविता.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 07/25/2014 - 09:07
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 07/25/2014 - 09:43
नवीन
असे वाचुनी जाहले दीस फार
अभिव्यक्ति केली पहा जोरदार
अशी येउद्या येथ काव्ये अपार
भुजंगप्रयाती 'य' येतात चार ||
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 07/25/2014 - 09:51
नवीन
आले रे. :-D
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 07/25/2014 - 10:27
नवीन
कविता ाआवडली.
- Log in or register to post comments
फ
फिझा
Mon, 08/11/2014 - 08:51
नवीन
खुप छान !!!!
- Log in or register to post comments