भटकंती
Abandoned
Primary tabs
कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते :)
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
सहीच, एक लंबर आलेत फोटो
आवडले...
भन्नाटच.
(ज्युरासिक पार्क आठवला)
आवडले.
पण अशा जागा उदास करून जातात!
आवडले.
पण अशा जागा उदास करून जातात!
फोटो लयच आवडले त्याची कारणे २.
१. फोटो जबरी आलेत.
२. Dawn of the planet of the apes या नुकत्याच आलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्या पिच्चरमध्ये हुबेहूब असलेच सीन्स आहेत कित्तीतर्री. पिच्चर बघितला नश्शील तं आत्ताच्या आत्ता बघ!
डंका आहे रे नुसता , माझे काही मित्र ह्या प्रोजेक्ट वर होते, सो बघावाच लागला :)
दणका*
आयला जबरीच की बे. मोठी लोकं!
(स्पावड्याचे काँटॅक पाहून छाती दडपलेला) बॅटमॅन.
ह्यातील बरेच काम भारतातील स्तुदिओत झालेले आहे रे
काय सांगताय !! भारीच.. चित्रपटातील तांत्रिक सतील, दृश्ये खूपच आवडली होती, आपल्याकडे काम झालेले ऐकून भारी वाटलं.. :)
अस्सं? मग तर जबरीच की. साला आपल्याकडं असले जबराट शिन्मे कधी निघतील काय की बे.
+१
उदास फीलिंग आलं फोटो पाहून!! त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन आलो तर हे फीलिंग आणखी जाणवेलसं वाटतं.
स्पा.... मस्त!!!!!! यांतले काही फोटो चेपु'वर पाहिलेत... पावसाळी वातावरणामुळे या पडझड झालेल्या वास्तूला एक गूढ वलय प्राप्त झालंय.... :) ... ९ नम्बरचा फोटो.. सगळ्यांत जास्त आवडला.... त्या लोखंडाचा आकार आणि नॅच्युरली त्यात असलेली रंगसंगती, स्पेशली "लोखंडी" रंग -- उजव्या गोलातील काळसर किरमिजी रंग.. आणि डाव्या गोलातील हिरवट रंग... सुपर्ब कॉम्बिनेशन!!!.... रॉयल अॅन्टीक फील करून देतो!!...... :)
पावसाळ्यातले एखाद्या जुन्या युनिवर्सीटी'चे फोटो येऊ देत.... यु मे गेट मोअर स्कोप देअर..... :)
बंद पडलेल्या गिरण्या व गिरणीकामगार डोळ्यासमोर आले, मन उदास झाले. फोटो छानच काढलेत. क्रमांक दोनच्या फोटोत भिंतीवर शेवाळ निळसर का दिसते? झाडाची पानेही थोडी निळसर दिसतात.
Abandoned हे नांव एकदम परफेक्ट... वार्यावर सोडलेली जागा...
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
हेच विचारणार होतो.
ते शेवाळ नाहीये :)
विटांवर नीळा रंग असेल पूर्वी,आता थोडासा उरलेला आहे
अच्छा...असं आहे होय.
धन्यवाद खुलासा केल्याबद्दल.
सगळेच्या सगळे फोटो झक्कास आले आहेत. :-)
फोटो मस्तच आले आहेत.
शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला.
पैजारबुवा,
फोटो आवडले.
मस्तच एवढंच म्हणतो .हा विषय हाताळणारे कमीच लोक सापडतात .चोळा थर्मल पॉवर हाऊस ठाकुर्ली वाटतंय.
गंगा ,राजस्थान आणि बंद पडलेल्या गिरण्यांचे फोटो हझलब्लाडने काढणारा कोण होऊन गेला (रघु राय ?)त्याची आठवण झाली .
बरं झालं काही प्रस्तावना नाही लिहिलीस, फोटोच फार बोलके आहेत.
मधले मधले बरेच फोटो दिसत नाहीयेत. (क्र. २, ३, ४, ६, ८, १०, १२, १४.)
तुम्ही तुमच्या लेन्सच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. अफलातून रंगअचूकता, वर्णविक्षेप आणि विपर्यासभ्रंश यांच्यावरील चांगले नियंत्रण आणि ३५मिमी चा क्रॉप्ड सेन्सरवर मिळणारा 'नॉर्मल व्ह्यू' अॅन्गल. हे सगळंच छान वापरलंय. मला दिसणार्या प्रतिमांपैकी ७, १३ आणि १७ ह्या खूपच आवडल्या. ७ मधील ते थांबलेले घड्याळ या वास्तूचे थिजलेले आयुष्यच जणू सूचित करत आहे. १२ व्या प्रतिमेतील पर्स्पेक्टिव मस्त आलाय आणि उजवीकडील इनअॅक्सिसिबल होत जाणार्या काळपट कॉरिडॉरच्या भीतीदायकतेला डावीकडील पिवळ्या स्तंभांनी छान तोलून धरलेय. १७ व्या प्रतिमेत टोकिना ११-१६ सारखी अल्ट्रावाइड लेन्स जर असती तर एक वेगळाच अंगावर येणारा पर्स्पेक्टिव मिळाला असता असे वाटले.
एकूणच अतिशय छान प्रतिमा! तुमच्या प्रतिभेला सलाम!
क्लासिक... बंद पडलेले व्होल्ट मीटर अतिशय बोलके आहेत. स्पासर रॉक्स. Keep it up :)
वेगळी भयकथा!! :)
@वेगळी भयकथा!! >>> +++१११ ह्येच म्हण्टो!
आता आमाले पां डुब्बा कडून योक भय्कता पायजेच!
इषेशतः फोटू णंबर १० आनी १७ वरुण इण् स्पा यर होऊण !!! *biggrin*
वेगळीच फटूग्राफी.
अर्थातच आवडली.
छान हॉररपट बनू शकेल. राम गोपाल वर्मा ला लोकेशन दाखवा.
सुंदर
चाकोरीबाहेरचा विषय, पण सॉलिड हाताळलाय ! सर्वच फोटो खूप आवडले !! भन्नाट !!!
भारी!!
पूर्वी कधीतरी मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सर्वात पडिक आणि दुर्लक्षित डॉक मध्ये फिरल्याचा भास होत राहातो...गंजलेली लोखंडी जड अवजारं, रया गेलेल्या भिंती,त्यावर पडलेले उन्हाचे कवडसे..त्यातुन फक्त जाणवणारा इतिहास. कधीकाळी इथे ही मशिन्स धडधडत होती त्याच्या केवळ पाऊलखुणा...
परफेक्ट कॅपचर्स.
-मयुरा.
खत्री फोटो आहेत. आवडले.
भंगार झालेले पावर स्टेशन आणि इतकी भकास जागादेखिल इतक्या सुंदर पद्धतिने सादर करता येऊ शकते, हे बघून खुप आश्चर्य वाटले.
फोटो अतिशय बोलके आले आहेत. जियो स्पावड्या...
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते.
हे फोटोत अगदी उतरलयं, सगळेच फोटो आवडले, रंगसंगती खासच.
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते.
हे फोटोत अगदी उतरलयं, सगळेच फोटो आवडले, रंगसंगती खासच.
सखीसारखेच म्हणते,
स्वाती
मस्त! हे पाहताना एखादी भयकथा सुचली नाही का?
प्लाॅट आलाय डोक्यात, बघुया लिहिन पुढे कधितरी. :-)
त्या रिकाम्या स्टेशन मधुन गुपचुप फिरताना , आजुबाजुला वाढलेल्या गचपणातुन अनेक डोळे तुमच्यावर रोखलेत,असं सतत वाटत राहतं हे नक्की.पटकन मान वळवायची हिम्मत नाही होत.. न जाणो काय बघायला मिळेल
नारायण धारपांच्या बखळी आणि त्यात वाढलेलं अस्ताव्यस्त गवत आठवलं!
नारायण धारपांच्या कथेतील स्थळासारखे आहे.
फोटो आवडले. अशा ठिकाणी हमखास एखादा पांढरा चाफा ऊतउतून फुललेला असतो. त्याचा तो फुलण्याचा उत्साह आणि सभोवतालची भयाण मरगळ. एक विचित्र जक्स्टॅपोज़िशन बनून जाते.
सरनौबत *i-m_so_happy*
.
.
.
.
.
पांडू.................. :-/ आता लिवायाच पायजेस तू....!!! *biggrin*
कोण हा पांडू ? *smile*
बुवा, टाकू का यमक ;)
कोड्यात बोलता बुवा
बुवा, टाकू का यमक
>>>
तेवढी आहे का धमक ? *crazy*
हेच आहे यशाचे गमक ;)
मग दाखवा तुमची चमक ;)
दाखवली असती चमक,
पण जास्ती होईल नमक,
त्यामुळे आवरती घेतो धमक,
योग्य ठिकाणी कंडुशमन हेच यशाचे गमक!
तुमच्या इंटरनेट ची तोडावी लागेल कुमक
नका ओ तोडू कुमक
तेवढी नाय धमक
पांडू=स्पांडू=स्पा हे खरे गमक
व्हा थंड आणि पाडा यमक
बोलवा यमक-शामक.
इथे आग लागली आहे भ्रामक.
उडाली आहे छोटी चकमक
तोडा रसद आणि कुमक
आग लागलिं म्हणे, सरनौबत |
वाजवा नच इथे बघु, नौबत |
बंद करा हे खलबत …
गर्दन उडवू अलबत
आम्ही साधे शिपाई नाही ….
सर्व सैन्याचे …….
……सरनौबत !!!!!!!!
गप रांव मरे, वश्शांड मेलो!!
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..
ढिशक्यांव्! ढिशक्यांव्!! ढिशक्यांव्!!!
*lol*
हायला !!!! स्पाराव तुम्ही जो काही व्यवसाय करताय तो सोडून, पूर्णवेळ फोटोग्राफी करा राव !! जबरी नजर हाय तूमची...
फोटो कैच्याकै म्हणजे कैच्याकै जबरदस्त आलेत !!
वरील सर्व प्रतीसादान्शी सहमत !!!
सारेच फोटो आवडले. 'भिंत खचली, कलथून खांब गेला'मधल्या मूडची आठवण करून देणारे. विशेषतः दुसरा फोटो सेपिया किंवा कृष्णधवल छटेत कसा दिसला असता, याची कल्पना करून पाहतो आहे.
Abandoned न वापरती जागा/ वस्तू, त्याज्य, सोडून दिलेले आदी बाबत उत्कृष्ट छायाचित्रे बघायची झाल्यास ही लिंक पहा.
या साईटवरती अजून दुसर्या विषयांवरील देखील छायाचित्रे आहेत.
चेर्नोबिल डायरिस नावाने एक हॉररपटपण आलेला
http://www.imdb.com/title/tt1991245/
हू इज जॉन गाल्ट ?
अतिशय सुरेख छायाचित्र. ब्रिटिशकालीन पॉवरहाऊसचे भग्नावशेष, पावसाळी वातावरण आणि छायाचित्रणातील अचूकता सर्वच अप्रतिम आहे.
http://www.fakingnews.firstpost.com/2014/07/man-with-dslr-turns-out-to-…
>>> हा फोटोग्राफर तुच आहेस की काय स्पावड्या *biggrin*
=))
म्या आय टी वाला नाही पण
फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे.
जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते.
सुंदर.
अरे, हे काय! अक्खा प्रतिसाद गायबच झाला. आता हे चोप्यपस्ते.
फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे.
जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते.
सुंदर.
आता खूप चांगले क्यामेरे सामान्य लोकांच्या हातात आल्याने पूर्वी सारखी " ३६ मधले १६ च आले" ही सिचवेशन संपतीय.त्यात फटू शॉप व तत्सम एडीटर मधे बरेच काही सुधारता येते. ( मिपावरच्या बर्याच लोकांचे फटू शाप शी वाकडे आहे असे दिसते मात्र) .आताच्या या स्थितीत सन्सेट,फुलपाखरे, फुले ई विषयाचा वीट यावा इतके काही पहायला मिळते. त्या मुळेबुवांचे फटू सहित पत्रकारिता धागे, इस्पिक एक्क्कांचे संस्कृति दर्शन धागे असे थीमॅटिक फोटो प्रत्यय देणारे वाटतात. त्या सारखाच हा प्रयत्न आहे. हे स्थळ माझ्या अंदाजाने ठाकुरली जवळ असावे. प्रयत्न उत्तम आहे.
हे मुळेबुवा कोण बुवा ? असा प्रश्न पडू नये म्हणून 'त्यामुळे बुवांचे ' असे वाचावे.
फोटो आणि शिर्षक....ज ह ब ह र्या!
जियो स्पावड्या..जियो!
सुं द र... !!! अप्रतिम फोटोज..
फोटो विलक्षण आहेत. मधे मधे जरा म्याटर टाका की राव .
फ्रेशनेस आणि रस्टीनेस..
डेडली कॉम्बिनेशन !
मस्त फोटो.. परत एकदा उन्हाळ्यात तिथेच जावुन बघ.. फार वेगळा प्रकाश मिळेल..
मस्तच!
अगदी वेगळं काहीतरी.
मस्तं
मस्त ! रस्टी आणि ग्रीन चे काँबिनेशन मस्त जुळुन आले आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lasya :- Anoushka Shankar
एक नम्बर फाटू रे भावा …। जिकलस …।
कल्पना आणि बहुतेकसे फोटो आवडले. काही चित्रांमधला खरखरीत पोत, उदा घड्याळ, गियर, यंत्रांचं मोडकं मेट्रीक्स फारच आवडलं.
पण उदा क्र १ आणि ३ या चित्रांमधला हिरवा रंग फार भडक वाटला. कदाचित तो थोडा फिकट करून किंवा चित्रं काळीपांढरी करून बहुतेक अधिक भावतील.
पुढच्या वेळेला चक्कर मारावी लागेल.
फोटुग्राफीत बाप माणुस आहेस दोस्ता !!
लै म्हणजे लै म्हणजे लैच जबरदस्त फोटो़ज आहेत, दोस्ता.. साला, लेन्सा आमच्याकडंबी आहे, पन अशी नजर पाहीजे ना राव.. नजरेत आणि कॅमेरॅत मज्जा आहे राव तुमच्या..