Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डांबरी रस्त्यावर

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Fri, 07/25/2014 - 08:25
लांबच लांब डांबरी रस्त्यावर घरंगळत जाणारे पावसाचे पाणी कुठेतरी जाऊन थांबत असेलच कदाचित, तिथेच तू भेटशील.. -- तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं... -- त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला -- तुझ्यापर्यंत पोहचतांना किती चिमुकले भवरे पार केले असतील त्या नावेने कुणास ठाऊक पण तुला सापडली कि जप तिला तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं -- लांबच लांब डांबरी रस्त्यावर घरंगळत जाणारे पावसाचे पाणी कुठेतरी जाऊन थांबत असेलच |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२४/०७/२०१४)

प्रतिक्रिया द्या
3674 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ए
एस Fri, 07/25/2014 - 08:27 नवीन
तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं
तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/25/2014 - 08:39 नवीन
*good*
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 07/25/2014 - 08:49 नवीन
क्या बात मिकेश लय भारी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 07/25/2014 - 08:54 नवीन
कविता आवडली. संदीपच्या या दिलकष ओळी पाहा: पडेना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 07/25/2014 - 10:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 07/25/2014 - 10:55 नवीन
नेहमीप्रमाणेच छान!!
  • Log in or register to post comments
P
psajid Fri, 07/25/2014 - 10:59 नवीन
एकदम आवडली ! "तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं..." या ओळी तर खूपच छान
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/25/2014 - 11:05 नवीन
हिच कविता दुसर्‍या कोणी लिहिली असती तर आवडली म्हणुन प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/25/2014 - 11:09 नवीन
हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्यारे१ Fri, 07/25/2014 - 11:21 नवीन
>>> हा आमचा मि.का. नाही. अगदी असंच म्हणायचं होतं. म्हणूनच बरीचशी आवडली म्हटलंय खाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/25/2014 - 11:55 नवीन
कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे. काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/25/2014 - 12:09 नवीन
लब्बाड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्यारे१ Fri, 07/25/2014 - 11:09 नवीन
बरीचशी आवडली...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/25/2014 - 11:25 नवीन
क्क्या बात !
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Fri, 07/25/2014 - 11:28 नवीन
स्वप्नांची नाव आवडली. फक्त चाफ्याच्या फुलांचं कडवं किंचीत उणं पडलंय..
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 07/29/2014 - 07:05 नवीन
छछान......॥!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2014 - 07:32 नवीन
नेहमी प्रमाणेच सुंदर....! त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 07/31/2014 - 05:42 नवीन
सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच! बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
रुमानी गुरुवार, 07/31/2014 - 11:56 नवीन
खरचं मस्तच...! कसे काय जमते हो तुम्हाला हे..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
च
चाणक्य Wed, 07/30/2014 - 21:11 नवीन
पहिल्या चार ओळीतच जीव गेला आपला तर...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/31/2014 - 05:37 नवीन
एकदम झकास
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/31/2014 - 18:58 नवीन
छान ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 08/04/2014 - 07:14 नवीन
खासच !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा