Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रबंध

व — वेल्लाभट, Fri, 07/25/2014 - 11:04
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
3819 वाचन

💬 प्रतिसाद (20)
P
psajid Fri, 07/25/2014 - 11:12 नवीन
"एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा" हे जमायला हवं !
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 07/25/2014 - 11:40 नवीन
अन मार्ग रुंद व्हावा ऐवजी "अन मार्ग स्पष्ट व्हावा" चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
व
वेल्लाभट Fri, 07/25/2014 - 12:09 नवीन
नाही..; काफिया जुळत नाही. स्पष्ट पेक्षाही अर्थाने रुंदच अभिप्रेत आहे. थिन लाईन ऑफ डिफरन्स. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
P
psajid Fri, 07/25/2014 - 11:14 नवीन
गजल नव्हे गझल वाचावे !
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 07/25/2014 - 11:14 नवीन
एकाहून एक कविता पाडायलेत राव लोक!! मस्तच हो!!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 07/25/2014 - 11:18 नवीन
क्या बात वेल्लाः
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 07/25/2014 - 11:24 नवीन
सुंदर. :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 07/25/2014 - 11:33 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/25/2014 - 12:11 नवीन
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 07/25/2014 - 12:30 नवीन
आज छान कवितांचा दिवस आहे मिपावर!
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Fri, 07/25/2014 - 13:15 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/25/2014 - 15:14 नवीन
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा >>> अत्तीशय सुंदर!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 07/25/2014 - 15:24 नवीन
सुंदर !!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 07/26/2014 - 05:27 नवीन
क्या बात है वेल्लाशेठ, मस्तच लिहिलंय!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 07/26/2014 - 07:32 नवीन
_/\_ धन्यवाद सगळ्यांचे :)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 07/29/2014 - 06:40 नवीन
आवाडली
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 07/29/2014 - 07:43 नवीन
मस्तये.. आवडली..
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 08/01/2014 - 18:36 नवीन
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 08/04/2014 - 13:16 नवीन
आभार !:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
प
पाषाणभेद Fri, 08/08/2014 - 05:50 नवीन
सुंदर आवडलीच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा