Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

म
मराठी कथालेखक
Fri, 07/25/2014 - 13:18
🗣 271 प्रतिसाद
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?

प्रतिक्रिया द्या
96475 वाचन

💬 प्रतिसाद (271)
क
कवितानागेश Fri, 07/25/2014 - 13:24 नवीन
४ नंबरला मिष्टर आणि मिशेस असतं बरं का. :)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 07/25/2014 - 13:32 नवीन
नंतर सांगतो, आत्ता थोडा वीकनेसपणा आलाय!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 13:50 नवीन
मग डॉक्टरना (किंवा डॉक्टरीणबाईंना) बोलवाकी हो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ध
धन्या Fri, 07/25/2014 - 13:55 नवीन
कदाचित ते/त्या व्हिजीटला गेले/ल्या असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
वामन देशमुख Fri, 07/25/2014 - 14:06 नवीन
डॉक्टरीणबाईं आमच्याकडे दवाखान्यात नोकरी करत असलेल्या लेडीज बायकांना "सिस्टरिणबाई" असं म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
क
कविता१९७८ Fri, 07/25/2014 - 13:36 नवीन
झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 07/25/2014 - 13:40 नवीन
काही दुकानदार 'झेरोक्ष' लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
म
मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 13:45 नवीन
Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
क
कविता१९७८ Fri, 07/25/2014 - 13:47 नवीन
हो जसे मिनरल वॉटर ला बहुतेक सर्वजण बिसलरी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
व
वेल्लाभट Fri, 07/25/2014 - 13:59 नवीन
हो, कुठल्याही एसयुव्ही ला जीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
आ
आदूबाळ Fri, 07/25/2014 - 14:25 नवीन
मारूती ८००, मारूती १००० आणि जीप असे गाड्यांचे तीन प्रकार भेटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
श
शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 12:16 नवीन
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 08/11/2014 - 08:00 नवीन
समजा मला रस्त्यात म्हैस दिसली. तर ती मिळाली, सापडली का भेटली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/11/2014 - 09:30 नवीन
>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्यारे१ Mon, 08/11/2014 - 10:22 नवीन
म्हैस ऐवजी कुठला शब्द चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बाळ सप्रे Mon, 08/11/2014 - 10:27 नवीन
हेच लिहिणार होतो पण वेळ नाही 'भेटला'!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ह
हुप्प्या Mon, 08/11/2014 - 20:45 नवीन
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
क
कपिलमुनी Mon, 08/11/2014 - 11:55 नवीन
आमच्या मावळात लोकल भेटते, मोबाईल भेटतो , बस भेटते.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
आ
आदूबाळ Mon, 08/11/2014 - 12:57 नवीन
आमच्या शाळेत परीक्षेत मार्क पण भेटायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्यारे१ Mon, 08/11/2014 - 13:45 नवीन
पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 14:07 नवीन
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
य
यसवायजी Mon, 08/11/2014 - 17:54 नवीन
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मराठे Mon, 08/11/2014 - 17:58 नवीन
एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ख
खटपट्या Tue, 08/12/2014 - 02:31 नवीन
हसा चकटफू या कार्यक्रमात टायवाल्यासाठी चक्क "टायघाल्या" हा शब्द वापरला होता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/25/2014 - 15:08 नवीन
आणि कुठल्याही नूडलला "मॅग्गी"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
न
नाव आडनाव Sat, 07/26/2014 - 06:56 नवीन
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ध
धन्या Mon, 07/28/2014 - 12:29 नवीन
आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :)
हे इतकेही कॉमन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
आ
आदूबाळ Tue, 07/29/2014 - 16:28 नवीन
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
र
रेवती Tue, 07/29/2014 - 17:01 नवीन
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/29/2014 - 21:27 नवीन
जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नानासाहेब नेफळे Wed, 07/30/2014 - 07:09 नवीन
काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 15:12 नवीन
त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Wed, 07/30/2014 - 15:27 नवीन
माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नानासाहेब नेफळे Wed, 07/30/2014 - 15:28 नवीन
ईस्पीकएक्का ऐकिव माहीती खरी नसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 20:22 नवीन
नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 20:24 नवीन
अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
भ
भीडस्त Wed, 07/30/2014 - 20:29 नवीन
श्रीरामपूर तालुका होता का तो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
भ
भिंगरी Wed, 07/30/2014 - 10:54 नवीन
प्रत्येक नॉनस्टिक भांड्यांना निर्लेप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
अनुप ढेरे Fri, 07/25/2014 - 14:57 नवीन
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संचित Tue, 07/29/2014 - 16:16 नवीन
हल्ली गुगल पण क्रियापद झाले आहे. त्याला गुगलची हरकत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Wed, 07/30/2014 - 07:16 नवीन
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संचित
म
मराठी कथालेखक Wed, 07/30/2014 - 10:23 नवीन
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/25/2014 - 16:03 नवीन
@Photocopy म्हणतात. >>> (वि)शुद्ध मराठीत- छायाप्रत ! बराबर ना!? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 13:37 नवीन
काही चूक नाही त्यात. आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/25/2014 - 15:09 नवीन
त्यांची झोपडी आपण तोडलीच पाहिजे... ते करताना आपला बंगला मोडला तरी बेहत्तर ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:16 नवीन
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/29/2014 - 21:28 नवीन
नाय पण मग रिवेंज घेण्यातली मजा कमी होते ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या Wed, 07/30/2014 - 16:14 नवीन
हा हा हा .. 'रिवेंज' शब्दावर निषेध नोंदवायला आलो होतो पण काँटेक्स्ट लक्षात आल्यावर लॉळ झालो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 20:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कवितानागेश Fri, 07/25/2014 - 16:00 नवीन
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा