Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Online Shopping

N
NiluMP
Mon, 07/28/2014 - 12:51
🗣 52 प्रतिसाद
Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली. Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.

प्रतिक्रिया द्या
16592 वाचन

💬 प्रतिसाद (52)
प
प्रसाद१९७१ Mon, 07/28/2014 - 12:57 नवीन
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही. पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Mon, 07/28/2014 - 12:57 नवीन
शक्यतो मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम वर फसगत होत नाही हा माझा वैयक्तीक अनुभव
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 13:24 नवीन
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा, १. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे २. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे) ३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे या खबरदा-या घ्याव्यात. आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले. बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 07/28/2014 - 13:26 नवीन
१ स्नॅपडील २ फ्लिपकार्ट ३ अमेझन ४ ईबे या बेस्ट
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 07/28/2014 - 13:41 नवीन
२ फ्लिपकार्ट ३ अमेझन
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत. आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते. मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
N
NiluMP Mon, 07/28/2014 - 13:45 नवीन
<मात्र अ‍ॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्‍या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
आ
आदूबाळ Mon, 07/28/2014 - 14:41 नवीन
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 15:10 नवीन
फ्लिपकार्टी =)) =)) धन्य _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ध
धन्या Mon, 07/28/2014 - 15:20 नवीन
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2014 - 07:40 नवीन
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे. १०० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 07/28/2014 - 13:28 नवीन
कोणाला गमट्री या वेबसाईटचा अनुभव आहे का? (आयला! स्वसंपादन!)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 07/28/2014 - 13:36 नवीन
खरं की काय?! खरंच की!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 07/28/2014 - 14:42 नवीन
गेलं आता. इट वॉज टू गुड टू बी ट्रू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 07/28/2014 - 15:15 नवीन
खरंच की काय??? (ह्याच्या खाली खरंच की! अशी ओळ असेल तर.. सॅडली इट्स ट्रू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पिलीयन रायडर Mon, 07/28/2014 - 15:16 नवीन
नसेल तर*... द्या की राव संपादन.. बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Mon, 07/28/2014 - 15:21 नवीन
बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सूड Mon, 07/28/2014 - 16:07 नवीन
>>एस एस पी डी __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विअर्ड विक्स Mon, 07/28/2014 - 16:48 नवीन
online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.
  • Log in or register to post comments
ए
एसमाळी Mon, 07/28/2014 - 16:56 नवीन
online shopping चा चांगला अनुभव आहे. amazon and homeshop18 चा चांगला अनुभव आहे. cash on delivery चा पर्याय कायम आवडतो.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 07/28/2014 - 17:03 नवीन
होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Mon, 07/28/2014 - 18:08 नवीन
अगदी बराबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
V
vrushali n Mon, 07/28/2014 - 17:14 नवीन
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स मज्जानु लाइफ
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 07/28/2014 - 18:03 नवीन
अ‍ॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 07/29/2014 - 14:56 नवीन
त्यांच्या संमंला...आपले कस्टमर केअरला इचारून बघा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 14:59 नवीन
उडणार बहुदा!! पण तरी... खिक्क!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
र
रेवती Tue, 07/29/2014 - 15:51 नवीन
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 15:53 नवीन
सगळीकडं एकाच दुकानातनं एकाच मजकुराचे श्ट्याम्प जातेत काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 07/29/2014 - 15:56 नवीन
हाव! तसं ट्रेनिंगच आस्तय! नाईतर लोकं जगू द्याची न्हाईत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 15:58 नवीन
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना. त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 07/29/2014 - 16:18 नवीन
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्‍हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 16:23 नवीन
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 16:25 नवीन
धन्या, लग्न झालं की कळेल. दीनाचा दयाळू की नव्याचा आशाळू ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
र
रेवती Tue, 07/29/2014 - 16:34 नवीन
प्यारे काकांना आज लैच गफ्फा मारायच्यात जनु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 16:42 नवीन
ईद मुबारका जी ईद मुबारका! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 07/29/2014 - 16:33 नवीन
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मदनबाण Mon, 07/28/2014 - 18:47 नवीन
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही... पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्‍या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अ‍ॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे... आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;) तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का... तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अ‍ॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे. आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे. हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :- Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush How Google's Latest Algorithm Update Hurt eBay बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली. संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील. संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 07/28/2014 - 18:48 नवीन
वर धान्याने सांगितल्याप्रमाणे अमेझोन वर डोळे झाकून खरेदी करावी.
  • Log in or register to post comments
श
श्रीमान Tue, 07/29/2014 - 06:41 नवीन
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित. कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो. flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 08:37 नवीन
फ्लिपकार्ट्चा अनुभव उत्तम.. चक्क २४ तासात सुद्धा पुस्तकं मिळाली आहेत.. किमती पण कमी असतात..
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/29/2014 - 10:02 नवीन
असेच म्हणतो. अ‍ॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोग्याम्बो Tue, 07/29/2014 - 10:57 नवीन
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात. बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे. शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 11:16 नवीन
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
सहमत.
Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अ‍ॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
हे कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 07/29/2014 - 15:39 नवीन
>>हे कशासाठी मनाचे समाधान. शिवाय वेब applications कशी चालतात याबद्दलचे गैरसमज वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 11:20 नवीन
अ‍ॅमेझॉन वर बाकी वस्तु पण चांगल्या मिळतात का?
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 11:43 नवीन
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे. पुस्तके खरेदीसाठी अ‍ॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 11:58 नवीन
मोटो इ फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव आहे. तुम्हास तो अमेज़न वर कसा काय मिळाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 12:14 नवीन
हाच प्रश्न पडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 12:37 नवीन
माफी असावी. गडबड झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चौकटराजा Tue, 07/29/2014 - 14:37 नवीन
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
उ
उदय के'सागर Tue, 07/29/2014 - 13:52 नवीन
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्‍या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं. कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा