Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कस्टमर केअर - एक गंडवणे

ध
धन्या
Tue, 07/29/2014 - 12:35
🗣 100 प्रतिसाद
काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर." फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला. मला ऑफीसरशी बोलण्यासाठी पैसे पडतील हे एक दाबून मान्य केल्यावर फोन लागला. मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे. कके वरची मुलगी: सर तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का? तिने माझं म्हणणं ऐकलंच नव्हतं सवयीने "तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?" असं विचारुन मोकळी झाली होती. मी: (मनातल्या मनात, भवाने) मी सिम हरवला आहे म्हणतोय तर त्याच नंबरवरुन कसा बोलेन? कके वरची मुलगी: सॉरी सर. पुन्हा सांगता का? मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे. कके वरची मुलगी: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी पोस्टपेडला ट्रान्स्फर करते. कृपया लाईनवर राहा. बयेने मला लाईनवर राहायला सांगितले खरे मात्र तीन चार मिनिटे लाईनवर राहूनही कुणी उत्तर दिलंच नाही. मी वैतागून फोन कट केला आणि पुन्हा लावला. पुन्हा एकदा एक दाबा, दोन दाबाचे सोपस्कार पार पाडून मी त्यांच्या माणसापर्यंत पोहचलो. त्या मुलाला माझा प्रॉब्लेम सांगितला. कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. पोस्टपेडसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावर कॉल करा. त्य दादाने नंबर दिला. मी कॉल केला. पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरु झाले. मी ती दाबादाबी करत मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत पोहचलो. फोन अटेंड करणार्‍या मुलाला माझी समस्या सांगितली. कके वरची मुलगा: सर आता आमच्या सिस्टीमचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे सिस्टीम डाऊन आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही नांव आणि नंबर देऊन ठेवा आणि दोन तासांनी फोन करा. नांव आणि नंबर देऊन ठेवण्यापलिकडे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. मी दोन तासांनी फोन केला. यावेळी थेट पोस्टपेडचा नंबर लावला. पुन्हा एक दाबा, दोन दाबाचा मंत्र सुरु झाला. मी स्टार सिक्सने मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत गेलो. कके वरची मुलगा: सर तुम्ही याआधी चार वेळा कॉल केला होता. हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल. मी पोस्टपेडवाला नंबरच डायल केला होता हे सांगायच्या आत त्याने फोन ठेवला. त्याने बहुतेक नुकतंच डॉ. रमा मराठेंचं "रंग सुखाचे" पुस्तक वाचलेलं असावं. साखर, किराणा मालाचे दुकान आणि पेट्रोल पंपाचे उदाहरण त्याच पुस्तकात आहे. मी हताश, हतबल आणि हतबद्ध. त्याने फोन चालू ठेवला असता तर त्याच्या पुढच्या सात पीढयांना तो शिकवू शकेल इतकं मानसशास्त्राचे ज्ञान मी त्याला दिले असते. पण त्याने फोन फोन ठेवला होता. सिम ब्लॉक कारावाच लागणार होता त्यामुळे मी पुन्हा एकदा उरले सुरले अवसान गोळा करुन मी पुन्हा एकदा थेट पोस्टपेडचा नंबर डायल केला. दाबादाबीचे सोपस्कार पार पाडून मी हव्या त्या पर्यायाला गेलो. कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी तुम्हाला पोस्टपेड डीपार्टमेंटचा नंबर देतो. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहीला जात होता. पण यावेळी मात्र मी "आलीया भोगाशी का घ्यावी माघार" म्हणून जे घडेल त्याला सामोरे जायचे ठरवले. तो मुलगा त्याचा "पोस्टपेड"चा नंबर सांगत होता. हा तोच नंबर होता जो पोस्टपेडचा थेट नंबर डायल करुन दाबादाबी करत मी त्याच्यापर्यंत पोहचलो होतो. लहानपणी मुखोद्गत असणारी घरातील सार्‍यांचा सत्कार करणारी सारी शब्दमौक्तिके त्याच्यावर उधळावीत अशी प्रचंड ईच्छा झाली होती. मात्र मला माझ्या ध्येयाप्रत जायचे असल्यामुळे मी तो मोह आवरला. मी: मित्रा तू जो पोस्टपेडचा नंबर सांगितलास तोच नंबर डायल करुन तुझ्यापर्यंत आलोय. कके वरची मुलगा: असं का? थांबा मी पाहतो. मी तुमचा डेटा चेक करेपर्यंत लाईनवर राहा. तुमचे नांव आणि ब्लॉक करायचा आहे तो नंबर सांगा. मी त्याला नाव आणि नंबर सांगितला. त्याने माझा सिम ब्लॉक केला. मी डुप्लिकेट सिम मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते विचारुन घेतले. कके वरची मुलगा: अजून आपली काय सेवा करु शकतो सर? मी: झाली एव्हढी सेवा खुप झाली. कके वरची मुलगा: धन्यवाद सर. आपला दिवस शुभ होवो.

प्रतिक्रिया द्या
28117 वाचन

💬 प्रतिसाद (100)
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 12:45 नवीन
अच्चा, असं जालं तर! - स्प्यारे ;)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 07/29/2014 - 12:49 नवीन
मी तर सरळ त्यांच्या ऑफिसला जाऊन सिम ब्लॉक करुन नवीन सिम घेतलं होतं.. पण एकंदरीत इअतर विविध कारणांसाठी मलाही अगदि अस्साच अनुभव आहे.. बिलामध्ये गडबड तर नेहमी करतात.. कितीही कंप्लेट टाकल्या तरी त्यावर कारवाई नाही.. म्हणुन मी आता मेल करते.. त्यात शेवटी "जोवर ही समस्या सुटत नाही तोवर बिल भरणार नाही..आधीच सांगते..आणि जास्त त्रास झाला तर ग्राहक कोर्टात जाईन" असा बोल्ड मध्ये लिहीते (मोबाईल ते गाडी.. सगळीकडे हा उपाय हमखास उपयोगी पडतो.. मेल करणे जास्त सोपे आहे..) कामं नक्की होतात..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 12:53 नवीन
प्रीपेड वापरणे हां उत्तम पर्याय. पोस्टपेड तसंहि लै महाग जातं. बाकी आमचं परवाच आकाशवालीशी झालेलं बोलणं आठवून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/29/2014 - 15:59 नवीन
@आकाशवालीशी झालेलं बोलणं>>> Image removed. आगोबा नेहमीच्या दुष्ट शैलीत Image removed. बोलत होता! त्यातले एक वाक्यः- तुम्चं प्रॉडक्ट टुकार आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 13:01 नवीन
=)) =)) अशा प्रसंगी जेवढं शांत राहून काम करता येईल तेवढं बघायचं. फ्रस्ट्रेट होऊन आपणच आपली मनःशांती गमावून बसतो. समोर बोलणार्‍या मुलाला किंवा मुलीला त्याने काहीही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/29/2014 - 13:06 नवीन
येप!! शक्य तितक्या शांत आवाजात एक-दोन शालजोडीतले हाणावेत. त्यांना कळले की नाही यापेक्षा आपण ते दिले याचं आपल्याला समाधान असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
न
नानासाहेब नेफळे Tue, 07/29/2014 - 13:16 नवीन
खात्रीने सांगतो, ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार ,2G इंटरनेटची सेवा अशी देतात की ह्यांची....... करावी वाटते.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 13:22 नवीन
होय. एयरलेटच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 14:19 नवीन
यरटेल नि आयड्यात काडीमात्रही फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 14:25 नवीन
थोडयाफार फरकाने सार्‍या सर्वीस प्रोव्हायडर्सची हीच कथा असणार आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याईतका वेळ आपल्याकडे नसतो. कस्टमर केअरमध्ये फोनवर बोलणारी मुलं निर्ढावलेली असतात. त्यांच्य स्वयंचलीत उत्तर प्रणालीत दाबादाबी करुनच ग्राहकाचे अर्धे त्राण निघून जाते. उरलेले त्राण ही कस्टमर केअरमधली मुले/मुली घालवतात. "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 14:36 नवीन
सध्याचं काम करण्याचं ठिकाण तेच आहे, त्यामुळे हे असे अनुभव रोज येतात. ”अरे भोत बकबक कर रहा था, दिमागकी माभेन एक हुई." एखाद्या 'गरम' संवादानंतर हेडसेट काढून तो पोरगा बाजूच्या पोराला सांगत असतो. काहीजण निर्ढावलेले काॅल म्युटवर टाकून तोंडावर रुमाल ठेऊन खूखू हसत असतात समोरच्याला चिडलेला पाहून. रोजच्या फ्लोर राऊंडला हे असं काही ना काही ऎकायला, बघायला मिळतंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 14:36 नवीन
>>>> "हा कॉल गुणवत्तेच्या कारणास्तव मॉनिटर केला जात आहे" असं नुस्तं म्हणायला. ग्राहकानं श्या घालू नयेत म्हणून केलेलं एक नाटक ते. तुम्ही 'जास्त' बोलू नका, तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय अशी गर्भित धमकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
आ
आतिवास Wed, 07/30/2014 - 08:12 नवीन
"बाबा रे/बाई ग, तू याबद्दल काही करू शकत नाहीस, हे मला माहिती आहे. पण कॉल रेकॉर्ड होतो आहे म्हणजे सिनीअर मंडळी हा संवाद ऐकण्याची शक्यता आहे. मी आता पुढे जे बोलणार आहे, ते सिनीअर लोकांसाठी आहे, कृपया तू त्याला उत्तर देत बसू नकोस" असं म्हणून शांतपणे ऐकवते मी - अर्थात फक्त आपल्या मनाचं समाधान ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
शिद Tue, 07/29/2014 - 13:41 नवीन
ही" एअरलेट" नावाची कंपनी असणार
लेख वाचून हाच प्रतिसाद देणार होतो. सेम टू सेम अनुभव आले आहेत. १ दाबा...२ दाबा...प्रकरण जाम डोक्यात जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Tue, 07/29/2014 - 14:32 नवीन
तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी नेटवर्क आहे, आमचा एशिया आणि आफ्रिक्येच्या १९ देशात कारोबार आहे ,एअरलेट निवड्याबद्दल आपला धन्यवाद....." एकाच वेळी कस्टमर आणि मराठी दोघांची करुन टाकतात... रिसेप्शनिश्ट बाया तर फार म्हातार्या ठेवल्यात ,गेंगाण्या आवाजात' मागील मेन्युत परत जाण्यासाठी १दाबा, तिकडे जाऊन ५ दाबा, हे दाबा ते दाबा, फक्त दाबतच रहा... एकदा तर टोमणा मारायचा मोह झाला होता ,परंतु गाढव आडवा आला... कस्टमर एक्झ्युकेटीवला फोन म्हणजे तर एक मोठाच व्याप असतो,लाईन जोडल्यानंतर आपला कॉल आम्ही रेकाँर्ड करत आहोत, हे आधी ऐकावे लागते. मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... |ईति एअरलेट कथा सुफळसंपुर्ण|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
म
मृगनयनी Tue, 07/29/2014 - 17:31 नवीन
मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ डुऽऽ ऊऽऽऽऽ आँऽऽ हाँऽऽ हाँऽऽ आहाँऽऽ हाँऽऽऽ चालू रहाते ,मग आपल्याला वाटते कॉल कनेक्ट झाला. परंतु फक्त भूऽऽस्सऽऽ फस्सऽऽऽऽ असे अजब आवाज ऐकायला येतात ,एखाद्या बुडणार्या जहाजावरचे संदेश ऐकतोय असे वाटायला लागते ,मग चिरपरीचीत पू ऽऽपूऽऽ पूऽऽ असा आवाज ऐकायला येतो(फोन मधून) व कॉल कट होतो, कस्टमरला लाईनवरुन एक्झीट करायला लावणारा तो कस्टमर एक्झीटक्युटीव अशी नवी व्याख्या एअरलेटने प्रचलीत केली आहे, आपण भानावर येतो तेव्हा अर्थातच ह्युमन एनॉटॉमीची उजळणी करत असतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 11:19 नवीन
नेफळेबुवा रॉक्स =)) =)) =)) =)) एक नंबर _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2014 - 13:24 नवीन
अरे यार ! धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता. बाकी, तुम्ही काहीही काम सांगा फक्त कष्ट्मर केअर वाल्यांशी बोलायला नका सांगू !
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 13:27 नवीन
धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात तर घेतला होता.
तो फोन आहे सर. हापिसात क्यामेरावाला फोन वापरता येत नसल्यामुळे एक साधा फोन वापरत होतो तो हरवला. दु:ख एकाच गोष्टीचं त्या फोनमध्ये माझा प्रायमरी नंबरवाला सिम होता. दहा ठीकाणी रजिस्टर्ड केलेला. आता त्यांच्या गॅलरी किंवा तत्सम कार्यालयात जाऊन डुप्लिकेट सिम घ्यावे लागनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नगरीनिरंजन Tue, 07/29/2014 - 13:30 नवीन
फार हार्डवर्किंग आहात; शॅडोवर्कही चिकाटीने करता.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 07/29/2014 - 13:41 नवीन
हा हा हा .... सहानभूती ;-)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 07/29/2014 - 14:20 नवीन
लहानपणी आपला राग व्यक्त करायचं आमचं एक वाक्य होतं . " असे मला एक रायफल व पाच गॉळ्या दिल्या ना तर मी अमुक अमुक ला उडवीन पयल्या छूट " असे ते वाक्य होते. भारतातील " शिक्षण" विषयातील तथाकथित तज्ञ , आपली निवडणूक पद्धतीचे निर्माते , व हे कॉल सेंटर वाले माझ्या हिटलिस्टवर त्या लहानपणीच्या वाक्याच्या धर्तीवर आहेत.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 07/29/2014 - 14:48 नवीन
अशा वेळेला चार शिव्या घालून मोकळेे व्हावे. आपला राग व्हेंटआउट होतो.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 14:59 नवीन
प्रतिसादाचा उपास सुटला समजायचा का हो विमे सर? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
स
सुहास झेले Tue, 07/29/2014 - 18:46 नवीन
ऑ... ऐकावे ते नवलंच. हे कुठले व्रतवैकल्य आहे की काय किसनद्येवा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/31/2014 - 09:44 नवीन
खरड केली आहे. बघुया किती दिवस राहते तुमच्या वहीत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
त
तुमचा अभिषेक Tue, 07/29/2014 - 15:12 नवीन
सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल. सहसा विनोदी वा आगाऊ कुठल्याही सदरात मोडणारी उत्तरे ते लोक देत नाहीत. आणखी एक शंका (कोणीही दूर करा) - आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 07/29/2014 - 15:17 नवीन
फोन एकाच व्यक्तीकडे जात नाही. त्यावेळी जो मुलगा 'आॅन'काॅल नसेल त्याच्या सिस्टमवर जातो. काल फ्लो जास्त असेल तर वेटिंग ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 15:18 नवीन
आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
च
चौकटराजा Tue, 07/29/2014 - 15:58 नवीन
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. आणि आपली रामकहाणी आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून सांगावी लागते. हे असं सातवाहनाच्या काळात नव्हतं ! एका शिळेवर एक कके आणि धवा यांचे पॅनेल आहे. त्यात धवा च्या चेहर्‍यावर समाधान सपस्ट दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 16:01 नवीन
सातवाहन काळातील गोष्टच वेगळी होती काका. तेव्हा कस्टमर केअरला दर्पण सुंदरी असायच्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 16:14 नवीन
दर्पण सुंदरी ह्या सातवाहनकाळात नव्हे तर नंतरच्या राष्ट्रकूट, चालुक्य काळात सुरु झाल्या. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 16:16 नवीन
नाही? मग सातवाहनकालीन सुंदर्‍या नट्टापट्टा करताना चेहरा कशात पाहायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्यारे१ Tue, 07/29/2014 - 16:18 नवीन
चाहनेवाले की आँखो में ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 16:13 नवीन
ती शिळा वीरगळ होती का गधेगाळ ओ काका? नाय, समाधान दिसतंय म्हणून म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 07/29/2014 - 16:27 नवीन
शिळेत संदेश असा मिळत आहे की धवाने मोबाईल घेतला हे मोठे वीराचे लक्षण आहे असे शिल्पकाराला म्हणायचे आहे. व त्याने तो हरवला हा गधे पणा केला आहे असा शिल्पकाराचा निष्कर्ष आहे. शिल्पकार देखील आध्यात्म व व्यवहार यांची कशी मस्त सांगड शिल्पात त्याकाळी घालत असत पहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 16:29 नवीन
प्रणाम घ्यावा काका. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 16:32 नवीन
मग धवांच्या चेहर्‍यावर निर्विकार भावच हवेत ओ. समाधान का दिसतंय म्हणतो मी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 07/29/2014 - 16:38 नवीन
आध्यात्माचे वैशिष्ट्य हे असते की सुखासीनते पासून अलग होतानाही काही चान चान दिसले की चर्येवर समाधान दिसते. सातवाहनाच्या काळात व्हिडू फोन फोन होता. तिच्या दर्शनाने धवा यांच्या तील दार्शनिक जागा झाला. परिणाम समाधान ! अगदी सर्वार्थाने दिव्य अनुभव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 07/29/2014 - 16:42 नवीन
अगागागागा _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कवितानागेश Wed, 07/30/2014 - 07:04 नवीन
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे जातो. >> आपण सगळ्यात आधी ज्याच्याशे बोललो त्याचे नाव विचारुन ठेवायचं, लक्षात ठेवायचं आणि फोन त्याच्याकडेच ट्रान्सफर करा. माझं बोलणं झालय. 'अमुकामुक' माझाच प्रॉब्लेम सॉल्व करतोय' अशी माहिती आपण त्यांना द्यायची. ते फोन देतात. परत परत रामकहाणी सांगत बसावी लागत नाही. मी नेहमी हेच करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
य
यशोधरा Tue, 07/29/2014 - 15:16 नवीन
अरेरे! एक फोन सांभाळता येत नाही तुम्हांला!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 15:21 नवीन
फोनचं कै नै हो तै. ती सारी मोहमाया आहे. फक्त सिमचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो ब्लॉक करण्यासाठी सारा खटाटोप. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/29/2014 - 15:28 नवीन
LOL! सिम नाही का मिथ्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 07/29/2014 - 15:34 नवीन
सिमही आहेच मात्र ते जर "सत्य का ग्यान" न झालेल्या माणसाच्या हातात पडलं तर ते त्रासदायक ठरू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 07/29/2014 - 15:39 नवीन
अहो मिथ्या वस्तू काय ग्यान करवून देणार? तुमचा (मिथ्या) भ्रम तर नाही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
द
देशपांडे विनायक Wed, 07/30/2014 - 07:08 नवीन
अस कस अस कस MOBILE हरवलाय आणि खटाटोप चाललाय सिम BLOCK करण्याचा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
शाली Tue, 07/29/2014 - 15:21 नवीन
मी: मला अनवाँटेड नंबर वरून मेसेज येतायत कके: मेसेज डिलिट करू नका मी: ठिके, पुढे? कके: मेसेज बाॅक्स फुल झाला की आपोआप मेसेज थांबतील, धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 07/29/2014 - 15:26 नवीन
वेड लावतात हे कके वाले. त्यांच्या काही डोक्क्क्यात जाणा-या गोष्टी. १ नेमकं बोलत नाहीत. पाल्हाळ लावतात २ (गाईडलाईन्स नुसार) उसनी औपचारिकता आणून बोलतात. उदा: जी क्या मै अमूक जी से बात कर रहा हू? क्षमा चाहूंगा की आप को होल्ड पे रखा... जी क्या मै क्रिपया आपका मोबाईल नंबर जान सकता हूं? (सखाराम गटणे ची आठवण होते... म्हणव्वंसं वाटतं साल्या माणसासारखं बोल ना) ३ ठरल्याप्रमाणे प्रश्न विचारत जाताना लॉजिक सोडतात. वरील पोस्ट मध्लं उदाहरण. सिम हरवलंय; तर त्या नंबर वरून कसा बोलेल तो माणूस???? ४ मराठी सिलेक्ट करूनही समोरचा माणूस हिंदीतच बोलतो. इथे मात्र मी फुल उतरवतो त्यांची. सोडत नाही. 'क्षमा चाहूंगा मै मराठी नही बात कर सकता' असंही म्हणायला लावलंय एकाला. ५ मुळात चालता बोलता कके वाला वाली लाभणं हेच दुर्मिळ असतं. औटोमेटेड व्हॉईस रिस्पॉन्स इज सो फ्रस्ट्रेटिंग
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Tue, 07/29/2014 - 18:09 नवीन
ईंग्रजीच आंधळेपणाने मराठीकरण ( किंवाहिन्दीकरण)केल्यामुळे आपल्या हे असे संवाद ऐकावे लागतात. हे भाषांतर कोण अ करते हेशोधाअवे लागेल. या लोकांना हिन्दी किंवा मराठीचे जुजबी माहिती असणारे लोक मिळत नाहीत का? शेवटी अश्या लोकांना सुधरवायला राज ठाकरे सारखे पार्श्वभागावर चटके देणारेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा