Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमी असंच का होतं ?

म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 07/31/2014 - 12:26
🗣 29 प्रतिसाद
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? २) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात? ३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते? ४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ? ५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ? ६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं ? ७) आपण मरमरून दूध आटवतो आणि मलई कोणीतरी दुसराच सोम्या गोम्या खाउन जातो? ८) आपण कॉलेजच्या दिवसात ज्या कुणा मुलाच्या/मुलीच्या एका नजरेसाठी तडफडायचो तीच /तोच पुढे कधीतरी अत्यंत सुमार दिसणाऱ्या माणसाशी लग्न झाल्या नंतर आपल्याला का दिसतो/दिसते ? ९) आपण अति विचार करणे आपल्या मनाला घातक आहे हे माहित असूनही पुन्हा पुन्हा आपण विचार का करतो? १०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?

प्रतिक्रिया द्या
21453 वाचन

💬 प्रतिसाद (29)
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/31/2014 - 12:33 नवीन
यालाच जीवन ऐसे नाव.
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 07/31/2014 - 12:55 नवीन
आपण ज्या रांगेत उभे असतो त्यापेक्षा बाजूची रांग पटापट पुढे सरकत असते. :)
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 13:32 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Murphy's_law
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
स
सूड गुरुवार, 07/31/2014 - 13:02 नवीन
>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते? ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 13:26 नवीन
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 13:29 नवीन
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.) याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 13:28 नवीन
हे असमाधानी असल्याचं लक्षण आहे. :P
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 13:49 नवीन
वाह! क्या बात! झटके पकडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
च
चाणक्य गुरुवार, 07/31/2014 - 18:56 नवीन
एक नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
त
तिमा गुरुवार, 07/31/2014 - 13:30 नवीन
हे भोट असल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/01/2014 - 06:34 नवीन
अर्ध्यावरती डाव सोडला …… नाडीपरीक्षण केलेत तर मात्र सुद्धा सुचवा की काहीतरी ह्यावर …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
मितान गुरुवार, 07/31/2014 - 15:33 नवीन
आपल्या विचारपद्धतीत काही गतिरोधक आहेत याचे हे लक्षण आहे. माऊताईशी अंशतः सहमत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/01/2014 - 06:27 नवीन
विचारपद्धतीचा संबंध येतोच कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
र
रेवती गुरुवार, 07/31/2014 - 15:36 नवीन
घाब्रू नका......तुम्हे एकटे नाही. ;)
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 07/31/2014 - 15:38 नवीन
बाकी तुमच्या कडे कुदळ आणि फावडे दोन्ही आहे आणि ते तुम्ही भरपूर वापरताय असं दिसतंय ;)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/01/2014 - 12:01 नवीन
कुदळ आणि फावडं नक्की कुठं ,कधी आणि कसं वापरायचं तेच पाहायला मिपावर येत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
च
चित्रगुप्त गुरुवार, 07/31/2014 - 16:54 नवीन
दहा प्रश्नांना एकच उत्तर: अपेक्षा ठेवल्याने.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/01/2014 - 06:25 नवीन
कसं क्काय ब्वा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 18:52 नवीन
भोग असतात हो एकेकाचे! नो ऑप्शन. भोगायचे.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/31/2014 - 18:53 नवीन
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
You are not in the traffic, you are the traffic :-)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 08/01/2014 - 06:31 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
य
योगी९०० Fri, 08/01/2014 - 08:32 नवीन
आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? हे बर्‍याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एक स्पष्टवक्ता.. Fri, 08/01/2014 - 11:24 नवीन
काय कर्णार...??
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sat, 08/02/2014 - 22:03 नवीन
http://www.chemteam.info/Humor/Gumpersons-Law.html आपण दिलेली उदाहरण बहुधा या भौतिक शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतात मोडतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sun, 08/03/2014 - 20:38 नवीन
2.चे उत्तर- कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 08/04/2014 - 03:39 नवीन
प्रश्न क्र १०..साठी. नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात. (स्वानुभव) *lol*
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 08/04/2014 - 03:45 नवीन
उसवतात म्हणायचे का तुम्हांला? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/06/2014 - 22:06 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 08/04/2014 - 04:25 नवीन
मर्फीचे नियम.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा