बोले तो ...!!!
काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते.
त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका..
1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही.
2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे..
3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव...
4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून...
5) ह्या..!! रोज रोज काय italian खायचे म्हणून आज Indian food च बनवले..
6) चार्ली रेड का !!! छान वास आहे. मला आता अरमानीचा कंटाळा आला आहे.
7) मला ईमेल कर मी घरी जाऊन वॉश घेतला की निवांत पाहीन माझ्या आय-पॅडवर...
8) आजकाल रिक्षावाले फार माजूरड्यासारखे चालवतात. कालच माझ्या होंडा सिटीला एकजण धडकणार होता..
9) खूप काम आहे राव...घरनं पण ऑफीसची भांडी घासतोय...उगाच प्रमोशन accept करून मॅनेजर झालो. त्यापेक्षा सिनीयर टिममेट होतो तेच बरे होते.
10) आमची ही फारच भारी बिर्याणी बनवते. परवा कमिशनरसाहेबांनी तर चारदा मागून खाल्ली.
11) अय्या किती मोठी झाली ग ही...!! शी बाई...!! उगाच यांच्याबरोबर स्वीडनला राहीले. त्यामुळे तुझ्या मुलीचे बालपण मिस केले ना मी...
12) काल अण्णांचा आवाज बरोबर नाही लागला मैफीलीत...त्यापेक्षा राहूल देशपांडे बरेच उजवे गायला. अण्णा स्वतः मला म्हणाले की आता त्यांना रिटायर व्हायला हरकत नाही.
(नेहमीप्रमाणे हे एक गंमत म्हणून घ्या... कोणालाही टारगेट केलेले नाही येथे...).
'सेँट फ्रॉम आईफोन'सगळ्याच कुम्पण्या करतात असं. "सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.