माझे कुणा म्हणावे ...
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना
माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना
जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना
ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना
जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना
सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना
(हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे.+१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.