Welcome to misalpav.com
लेखक: मर्फी | प्रसिद्ध:
आम्ही भेटलो जेव्हा काय माहित होत मला कि हीच ती मुलगी जी रडवणार मला ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात दुख एवढच मला मी एकटाच होतो ह्या भ्रमात प्रेमाच्या फंद्यात मी एकटाच का फसलो तिला जिंकण्याच्या नादात मी सगळाच गमवून बसलो ती मित्र म्हणून प्रेमाने बोले मी चुकीचा अर्थ काढत बसे तिच्या बरोबरच्या भविष्याचे स्वप्न मी रंगवत असे सांगितला मी जेव्हा तिला करतो तुझ्या वर प्रेम जीव तोडून तुच माझा सर्वस्व कधी जाऊ नको मला सोडून हसत म्हणाली मला नाही जाणार सोडून तुला तू फक्त माझा मित्र आहेस मैत्रीला वेगळं वळण तू देत आहेस माझ्या बरोबर तू होण कठीण आहे माझा सर्वस्व कारण आणखीनच कोणी आहे कल्पना नौती तू अडकत होतास तू गोष्टी वेळच्या का सांगत नौतास नशीबच फुटलेला होत मेल का म्हणून मी प्रेम केल जिची संगती माझ्या साठी स्वर्ग तिनीच आयुष्याला नर्क बनव्ल तिच्या स्वप्नांचा राजा भलताच कोणी होता तिला माझी गरज कारण तो इथे नौता तिच्या वरचा सगळा राग गिळला डोकं शांत केल चूक झालेली पण धडा शिकवायला देव हा कसला खेळ खेळला अभ्यास पाठी राहिलेला आवडी निवडी बदलल्या डोक्याने हैराण केल, ती नाही आता तर मग आहे की विचार करायला शेवटी रडणार मीच तिच्या साठी मी सगळं केल तिच्या साठीच हसलो, तिच्याच साठी भांडलो तिच्या साठी दिवसातनं कितीदा मी मेलो कितीदा मानाने ह्रिदयाला सम्जव्ल नको अडकत जाऊस ह्या जंजाळात नकोस करू गैरसमज तू अति विचार करतोस तू शुद्धीत राहा हृदया प्रेमाच्या ह्या मायाजालात का सारखा अडकतोस गांभीर्य हे समजत नाही तुला थोड थोड करून असाच मरशील हे सार कशा साठी करायचं हृदय इतक्यांदा तुट्वून पुढे काय करशील पण हृदया ने उत्तर दिला प्रेम केलेलं हृदय तर तुटायचच तुटलेल्या तुकड्यांना एकत्र करून मी पुन्हा एकदा प्रेम करीन ह्या रटाळगाण्य आयुष्यात पैश्यान साठी भावनाशुन्य होणार्या ह्या जगात मी आज काही तरी वेगळं करून दाखवलं मी प्रेम केल, मी प्रेम केल मी प्रेम केल !!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रेम करे दुःख होय. मग कशाला रे बाबा प्रेमात पडला (प्रेमात पडणे कशाला म्हणतात हे तरी कळले असेलच). बाकी तुझ्या सारखी अवस्था सर्वच तरुणाची होते. आमच ही हृदय कितीदा तुटलं सांगता येणार नाही. बाकी प्रेम म्हणजे काय, हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी केला होता वाचून थोड बर वाटेल. प्रेम म्हणजे काय ?

अरारारा… काय लिवलंय…. नौतास??? *lol* मी प्रेम केल, मी प्रेम केल मी प्रेम केल !!!>>> मी खूपच कॉमेडी स्टाईल मध्ये वाचलं…. एक मोठ्ठा कडा असावा, सिंहगडचाच…. शर्टाच्या सगळ्या गुंड्या काढून (शर्ट असा छानपैकी वार्यावर उडतोय) आणि SRK सारखं हात पसरून वगैरे….