Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन रे .....

स — सुहास.., Mon, 08/04/2014 - 08:28
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

प्रतिक्रिया द्या
1855 वाचन

💬 प्रतिसाद (6)
य
यशोधरा Mon, 08/04/2014 - 08:32 नवीन
!
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 08/04/2014 - 08:38 नवीन
रूपके चपखल वाटली नाहीत. बाकी भापो. मस्त!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 08/04/2014 - 08:40 नवीन
थोडी गुढ.. पण सुंदर रचना... येउ द्या अजुन.. *good*
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 08/04/2014 - 11:50 नवीन
गढुळल्या मनाची गूढ कविता
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 08/10/2014 - 18:35 नवीन
क्रियापदांच्या बाबतीतला प्रयोग आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 08/10/2014 - 19:49 नवीन
ह्याला चांगलं म्हणावं तरी वाईट आणि नाही म्हणावं तरी... तुला सरळ लिहीता येत नाय का बे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा