Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाची कहाणी

म — माम्लेदारचा पन्खा, Mon, 08/11/2014 - 07:26
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होवो काही । अनुभूतीला पर्याय नाही । प्रेमात पडता देही । वाटे हवाहवाई ।।५।। वाचणे नुसते प्रवासवर्णन । त्याहुनी प्रत्यक्ष फिरणे छान सकल जगाचे ज्ञान । अंगी येई ।।६।। म्हणून म्हणतो लोकहो । एकदा तरी प्रेम करा हो । पुढचे पुढे पाहो । जे नशिबी येई ।।७।। जो जिंकतो ह्या जुगारात । त्याचे दाखले दिले जातात । तिचे नाव त्याच्या शिधापत्रिकेत । दाखल होई ।।८।। काही न झाले तर बसावे शांत । समजावे हा आपुला न प्रांत । पुढील जन्मी असेल नशिबात । जाणावे ठायी ।।९।। अशी ही प्रेमाची कहाणी । ऐकावी मास श्रावणी । आठवणींचा गंध मनी । दरवळत राही ।।१०।।

प्रतिक्रिया द्या
2272 वाचन

💬 प्रतिसाद (7)
फ
फिझा Mon, 08/11/2014 - 08:34 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 08/11/2014 - 13:06 नवीन
स्वसंपाद्नासाठी मदत दुवा हवा आहे….
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 08/11/2014 - 17:18 नवीन
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!
  • Log in or register to post comments
म
मार्क ट्वेन Mon, 08/11/2014 - 19:42 नवीन
'मामलेदारचा पंखा' असं बिरुद मिरवणार्‍याला मिसळीऐवजी जिलबीचं रुपक सुचावं? अरे अरे... ;)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/12/2014 - 05:50 नवीन
आम्हाला नाही ब्वा मिसळीसारखं तिखटजाळ प्रेम करता येत …आम्ही आपले गोग्गोड प्रेम करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्क ट्वेन
स
सुधीर Tue, 08/12/2014 - 08:23 नवीन
श्रावणातलं पारायण चांगलं जमलय!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 15:12 नवीन
छान, आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा