Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे मन सैरभैर....!

फ — फिझा, Mon, 08/11/2014 - 07:56
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत ……. दिसे बुडणारा सूर्यही कुठलासा ,इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. ठाव मनाचाच घेण्यासाठी रोखले श्वास आज उरात ……. पण श्वासातील अंतर ऐकावी फक्त धडधड जी हृदयात …… भासे !!! सापडले मन कुठलेसे …… इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. ............फिझा ……

प्रतिक्रिया द्या
1546 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 08/15/2014 - 05:39 नवीन
कमाल केली आहेस!!! __/\__!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 08/15/2014 - 05:40 नवीन
कमाल केली आहेस!!! __/\__!!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 08/15/2014 - 06:28 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 08/15/2014 - 06:30 नवीन
"पण श्वासातील अंतर ऐकवी" अस आहे का ते? सुंदर!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा