Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पैसा येतो आणिक जातो

ग — गंगाधर मुटे, Mon, 08/11/2014 - 11:50
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

                           - गंगाधर मुटे ’अभय’
--------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
2799 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कविता१९७८ Mon, 08/11/2014 - 13:17 नवीन
मस्तच ; वास्तव .
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 08/15/2014 - 14:50 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
ग
गौरी लेले Tue, 08/12/2014 - 06:22 नवीन
सुंदर विडंबन !
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 08/15/2014 - 14:50 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
त
तिमा Tue, 08/12/2014 - 07:43 नवीन
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 08/15/2014 - 14:51 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Sun, 08/17/2014 - 15:32 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा