Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सल आठवांचा...

म — मूकवाचक, Sun, 08/17/2014 - 22:18
(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद) सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे... दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे... मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्या गोष्टीवर आज माझा तीळमात्रही हक्क उरलेला नाही.... बेगडी व्यक्तित्वाचे जोखड झुगारून देत क्षणभर मोकळा श्वास घेउ पाहतो आहे पण पद, पैसा, प्रतिष्ठा आणि विकत घेतलेल्या पुरस्कारांच्या दागदागिन्यांनी सजलेले या कलेवराचे ओझे आज त्रिखंडात कुणाला पेलणार नाही इतके बोजड होउन गेले आहे ... तुझी एक झलक पाहण्यासाठी आसुसलेल्या माझ्या नजरेशी सतत जीवघेणा लपंडाव खेळत असलीस तरी अश्वत्थाम्याच्या भाळी असलेल्या चिरंतन जखमेसारखी काळजात कायमची घर करून बसली आहेस सखे,शालीनतेचे कुळाचार जपण्याची तुझी ही अजब तर्‍हाच माझ्यासाठी अभिशाप ठरली आहे ... मूळ प्रेरणा:

प्रतिक्रिया द्या
1706 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Tue, 08/19/2014 - 07:12 नवीन
मुक्तक आवडलं.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 08/19/2014 - 07:47 नवीन
क्या बात है!!!!!!!! मस्त.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 08/19/2014 - 20:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Mon, 08/25/2014 - 16:03 नवीन
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी छानच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा