Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोविंदा आहे.....म्हणूनच

व — वेल्लाभट, Mon, 08/18/2014 - 09:12
श्रीकृष्ण आमचा देव आहे दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे आज तरुणाईला चेव आहे म्हणूनच आयोजकांचा धंदा आहे सामान्यांचा वांदा आहे वर चढणारा गोविंदा आहे म्हणूनच जोश थोडा मनात आहे उसन्या नशेची साथ आहे ही संस्कृतीवर मात आहे म्हणूनच टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे ट्रकमधून ओसंडते विकृती आहे ही मुळी न आपली संस्कृती आहे म्हणूनच डीजेचा ठणाणा आहे गोविंदांचा धिंगाणा आहे आयोजकांचा ताठ बाणा आहे म्हणूनच थरावर लावायचा थर आहे समोर पैशाचा डोंगर आहे वाट बघणारं घर आहे म्हणूनच ही आयोजकांची स्पर्धा आहे गोविंदांची त्रेधा आहे बघ्यांचा जीव अर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही नशा आहे आता, केवळ गोडी नाही काळजी आहे तुमची, तीही थोडी नाही म्हणूनच नाही असं कोण म्हणतंय? कुणी म्हटलं तरी कोण ऐकतंय? 'सांभाळून!' इतकंच सांगावं वाटतंय म्हणूनच - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
2631 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विअर्ड विक्स Mon, 08/18/2014 - 09:32 नवीन
आवडली......
  • Log in or register to post comments
न
नूतन Mon, 08/18/2014 - 09:34 नवीन
आवदली
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 08/18/2014 - 09:41 नवीन
मनापन आवदली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन
प
प्यारे१ Mon, 08/18/2014 - 09:57 नवीन
आवल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Mon, 08/18/2014 - 12:49 नवीन
आवलेंनी आवल्ली की आवलेंना आवल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
वेल्लाभट Mon, 08/18/2014 - 09:54 नवीन
:) थँक यू!
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 08/18/2014 - 12:46 नवीन
सद्यस्थिती पाहता कविता जास्तच आवडली.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 08/18/2014 - 16:46 नवीन
संस्कृतीच्या नावावर गल्लोगल्ली धटिंगण माजलेत गोविंदाच्या भविष्याचे मात्र बारा वाजलेत जे काल थरावर होते तेच आज फोटोत जाउन बसलेत म्हणूनच….
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 08/18/2014 - 16:49 नवीन
ये बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
स
सुहास.. Mon, 08/18/2014 - 16:59 नवीन
वेल्लाबद ..आवदली क्विता ;) (हा डॉल्बी डि़जीटल चा शोध कोणी लावला रे , मला भेटला तर मी मारुन टाकेन.... मायचा भोपळा त्याच्या )
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 08/19/2014 - 06:59 नवीन
आभार! सुहास, शिद, मामलेदार...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/22/2014 - 09:17 नवीन
कविता आवडली. बेवडे आणि मुजोर पोर आणि गोविंदा ? साला बाईक वरुन जाताना हॉर्नचा कर्कश्य आवज करुन जातात ही मवाली मुले आणि हे गोविंदा म्हणुन फिरतात म्हणे, त्यांच्या बरोबर माजलेले सांड नेते सुद्धा तेव्हढेच जवाबदार आहेत या विकॄतीकरणाला. ठाण्यातले पोलीस बहुतेक कोमात असावेत कारण कारवाईची भाषा करत होते त्याचा अजुन काही पत्ता लागला नाही.बहुधा त्यांना "सघर्ष" टाळावा असे वाटले असावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 08/22/2014 - 13:03 नवीन
कैक वर्षांपूर्वी गिरणगावतल्या कामगारांचा तो एक मर्दानी खेळ होता. काही संघ अस्सल व्यायामपटूंचे होते. ते थर रचणं अजूनही खूप थरारक वाटतं. हळूहळू सणाचा इव्हेंट झाला, जी काही थोडीफार शिस्त निवडक संघांमध्ये होती, ती ही कुठे दिसेनाशी झाली. आजकाल दिसणारं विद्रुपिकरण तुमच्या कवितेत पुरेपुर उतरले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा