Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंगाई गीत

आ — आनंदमयी, गुरुवार, 08/21/2014 - 22:31
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला बघ चोरपावलांनी चालून रात्र येई निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही? इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ? © अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
2181 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पद्मश्री चित्रे Fri, 08/22/2014 - 06:20 नवीन
आवडली अंगाई
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 08/22/2014 - 10:00 नवीन
पण अंगाई गीत इतकं अवघड असू नये असं वाटतं.
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Fri, 08/22/2014 - 18:30 नवीन
ही फक्त अंगाई नाहीये.. अर्थात वाचकांना ती अवघड वाटणं हे माझंच अपयश म्हणायचं!! :( :'( .........................................
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 08/22/2014 - 19:41 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Sat, 08/23/2014 - 16:31 नवीन
हे अंगाई गीतच आहे. आणि फार अवघड वाटले नाही. शब्दरचनाही ठीक आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा