Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्या अंगणी

प — पद्मश्री चित्रे, Fri, 08/22/2014 - 06:45
तुझ्या अंगणी असेल बरसत असाच पाउस अबोल, हळवा टपटपत्या त्या थेंबांमधुनी ऐकशील  तू मंद मारवा.... तुझे ही डोळे येतील भरुनी मेघ जणु आकाशी आतुर सांग कसे मग लपवशील तू मनातले ते वेडे काहूर... कुठे लपवशील माझे हसणे कसे रोखशील माझे गाणे डोळ्यामधले आसू लपवण्या कितिक करशील खुळे बहाणे... तुला सान्गतील जुन्या वेदना आकाशातील मेघ सावळे पुन्हा नव्याने रूजून येतील आठवणींचे कोंब कोवळे...... ऋतु किती हे येतील जातील  पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील.....

प्रतिक्रिया द्या
2094 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सुहास.. Fri, 08/22/2014 - 07:01 नवीन
चांगला प्रयत्न !
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 07:20 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 08/22/2014 - 08:02 नवीन
उत्तम रचना ! आवडली.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 10:15 नवीन
कल्पना नव्या हव्या होत्या.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 08/22/2014 - 10:27 नवीन
छानच. :) नेहमीप्रमाणेच भावपूर्ण.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/22/2014 - 10:29 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/22/2014 - 10:29 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 08/22/2014 - 11:54 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 08/22/2014 - 12:19 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 08/22/2014 - 12:48 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Sat, 08/23/2014 - 16:25 नवीन
ऋतु किती हे येतील जातील पुन्हा पुन्हा तू मला शोधशील मनातल्या त्या मुक्या भावना पाउस होवुन नयनी येतील..... सुंदर. पहिले कडवेही आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा