Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सौभाग्य लेणी

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 08/22/2014 - 07:19
🗣 46 प्रतिसाद
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी नाही.. श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ... तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही .. त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत.. हे माझे सौभाग्य नाही का??... आज मी शांत पणे जीवन जगू शकते..ज्यांनी माझ्या साठी एवढे केले त्याच्या आठवणी मी का काढू.....व त्या आजही सौ सारख्या मंगळसूत्र बांगड्या,घालतात.. कुंकू लावतात... घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...

प्रतिक्रिया द्या
11896 वाचन

💬 प्रतिसाद (46)
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 07:38 नवीन
इतकाच मुद्दाये ना?
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
आता तुम्ही राहा उभे बाईंच्या पाठीशी. आणि रुढीवादी बायकांना म्हणावं, तुमचे मिस्टर गेल्यावर तुम्ही उतरवा ! या बाई उतरवतील नाही तर नवे मिस्टर आणतील !!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 08/22/2014 - 07:39 नवीन
सुंदर पाककृती
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 08/22/2014 - 07:45 नवीन
घाग्याच्या शीर्षकावरून वल्लींचा धागा असावा असं वाटलं
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 08/22/2014 - 09:13 नवीन
वल्लींनी धागा लिहिला असता तर त्याचे शिर्षक "सौंदर्य लेणी" असे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 09:45 नवीन
*mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/22/2014 - 07:49 नवीन
त्या बाईंचे बरोबर आहे. इतरांना त्यावर टिका करण्याचा काहीही हक्क नाही. जर करायचे तर त्यांचे बिनडोक प्रथांना फेकून दिल्या बद्दल अभिनंदनच करायला हवे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 08/22/2014 - 07:50 नवीन
पण मंगळसूत्र घालणे हीच बिंडोक प्रथा आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 08:00 नवीन
पण बाईंनी घातलंय आणि आता त्या काढत नाहीयेत हा पॉइंट आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/22/2014 - 08:02 नवीन
जी प्रथा ती पाळणार्‍याला जबरदस्तीची वाटत नसेल, उलट समाधानकारक अथवा आनंददायक गोष्ट वाटत असेल आणि तिचा दुसर्‍या कोणाला त्याचा विनाकारण त्रास होत नसेल तर ती कृती मला तरी बिंडोक वाटत नाही. मग त्याला प्रथा म्हणा किंवा व्यक्तीस्वातंत्र्य म्हणा... काsssही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/22/2014 - 08:07 नवीन
याउलट, कोणाही व्यक्तीवर आपले मत काही सबळ कारण असल्याशिवाय लादणे हे मला केवळ बिनडोकपणाचेच नाही तर जुलूमाचे वर्तन वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुहास.. Fri, 08/22/2014 - 07:51 नवीन
अविकाका , लयच रतीब लावलात ;) ( हम्म, बोंबला आता वैयक्तीक, वैयक्तीक म्हणुन )
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 08/22/2014 - 08:33 नवीन
होवु देत खर्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ध
धन्या Fri, 08/22/2014 - 09:14 नवीन
मिपा आहे घरचं !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ख
खटपट्या Fri, 08/22/2014 - 07:59 नवीन
रूढी राहिल्यात कुठे आज काल. सौ ना पाहिजे तसे जगुद्या. दुनीया गेली खड्यात. काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 08/22/2014 - 14:42 नवीन
काही लोकांमध्ये पतीचे अंत्यविधी होत असतानाच पत्नीच्या बांगड्या फोडतात. हे थांबवायला पाहिजे. बघून मन सुन्न होते.
+१११ माझे आजोबा गेले त्यावेळी त्यांची तिरडी उचलण्याआधी तेथे हजर असलेल्या सगळ्या बायकांनी आजीला हळदी-कुंकू लावून डोक्यात गजरे/वेण्या भरले व त्यानंतर तिच्या बांगड्या दगडांनी फोडल्या होत्या. मी आयुष्यात हे सगळं पहिल्यांदाच पहात असल्यामूळे मला क्षणभर कळेच ना की नक्की काय चाललं आहे पण मला ते बघताना खुपच रडू आलं होतं. विदारक होतं ते दृष्य. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 08:01 नवीन
ह्या सर्व प्रथा परंपरा, पुरुषप्रधान समाजाने ठरविलेल्या आहेत. कुंकवाबरोबरच केशवपन हा विधीही असायचा. त्या मागचा (त्या काळच्या पुरूषी मनोवृत्तीचा) उद्देश असा की विधवांची सर्व सौंदर्यलक्षणे काढून घेऊन त्यांना विद्रुप करावे जेणे करून परपुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये आणि ती स्त्री, व्यभिचाराला उद्द्युक्त होऊ नये. जसजसे समाज सुधारकांकडून प्रयत्न होत गेले तसतसा समाजाच्या विचारधारणेत बदल होत गेला. केशवपनाची क्रूर पद्धत बंद झाली तसेच विधवाविवाहसुद्धा समाजाने स्विकारले. पण अंधवृत्तीने चालू राहिल्या प्रथांमध्ये कुंकू, दागदागिने ह्याकडे दुर्लक्ष झाले. किंवा 'तेव्हढा तरी' फरक असू दे असा अविचार असू शकतो. हल्ली तसेही, जीन्सवर शोभत नाही म्हणून कुंकू न लावण्याची, मंगळसूत्र न वापरण्याची पद्धत आहेच. पण ह्या गोष्टी पती निधनानंतर वापारायच्या की नाहीत ह्याचे स्वातंत्र्य स्त्रिला असावे. तिने हे सर्व सौभाग्यलंकार(?), तिची इच्छा असेल तर, वापरावेतच ह्या मताचा मी आहे. विधवा स्त्री इतकीच, विनापत्य स्त्रियांचीही समस्या असते. आजच्या काळातील दूरदर्शन मालीकांमधूनही विनापत्य महिलेने नवजात बालकाला हात सुद्धा लावायची बंदी दाखविली जाते. एक स्त्रीच दूसर्‍या स्त्रीवर हे अत्याचार करीत असते. आपल्या मूळ लेखातही 'घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...' हे वाक्य महिलांनी आपले विचार बदलण्याची आत्यंतिक गरज आहे हेच दर्शविते. विचार बदला, देश बदलेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 08/22/2014 - 08:12 नवीन
मेल्या नंतर सुध्दा बाई नवर्‍याला मोकळं करायला तयार नाहीये *lol* अवांतरः अकु प्रचंड स्कोप आहे ह्या धाग्यावर टाईमपास करायचा पण सध्दा जास्तवेळ नाहीये ... संध्याकाळी परत येतो *pleasantry*
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 08:17 नवीन
उलट आहे, नवरा गेला तरी बाई मोकळ्या व्हायला तयार नाहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 08/22/2014 - 08:42 नवीन
पर्स्पेक्टीव्हवर आहे .... लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ? आमच्या मते तर बायकाच नवर्‍याला बांधुन ठेवतात लग्नाच्या बेडी मध्ये ... म्हणुन मी म्हणालो की बाई नवरा मेल्यावरही त्याला मोकळं करायला तयार नाहीये *new_russian* तुमचे मत ...बाई स्वतःला बांधुन घेते लग्नाच्या बेडीत ... बहुतेक हे असे असावे असा अंदाज आहे ... *DONT_KNOW* अवांतर : असो ,कसे आहात सर ? बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीयेत , आज गप्पा मारुयात *WRITE* *MAIL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 09:17 नवीन
आणि अकुंचा धागाच मौजेसाठी असतो!
लग्नाने नक्की कोण कोणाला बांधुन ठेवतं ?
कुणी कुणाला नाही ! किंवा ज्याला लग्न ही मान्यता आहे हे समजत नाही तो (किंवा ती). (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कविता१९७८ Fri, 08/22/2014 - 08:16 नवीन
सौभाग्य लेणी हा बायकांचा हक्क आहे आणी ती उतरवायची की नाही हे ठरविण्याचा हक्कही बायकांचाच आहे. आमच्या इथे बर्‍याच बायका सौभाग्य लेणी उतरवत नाही. माझ्या मावशीचे मिस्टर वारले होते तेव्हा विधवा झाल्यावर कुठ्ल्याही समारंभात विधवेने सहभागी होउ नये असा समज होता वडीलांकडच्या मंडळींचा पण आम्ही मात्र तिला प्रत्येक समारंभात पुढेच बसवले , बाकीच्यांना मान्य नव्हते पण आम्ही दुर्लक्ष केले. ज्यावेळी माणसाला माणसाची गरज असते त्यावेळी अशी अमानुष वागणुक देणे बरोबर नाही. विधवा होणं न होणं कुणाच्या हातात नसतं आणी कुणालाही त्याने आनंद होत नाही.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 08:31 नवीन
प्रशंसनीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
त
तुमचा अभिषेक Fri, 08/22/2014 - 08:32 नवीन
पुरुषांच्या वाकड्या नजरेपासून सुरक्षाकवच म्हणूनही मंगळसूत्र बरेचदा कामी येते. अर्थात पडणारी नजर पडतेच, पण रेंगाळायचा काळ बरेचदा तुलनेत कमी होतो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 08:41 नवीन
पुरुष हल्ली असा फरक करतांना दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
म
मदनबाण Fri, 08/22/2014 - 08:44 नवीन
अकु त्यांचा जिलब्या पाडण्यासाठी परत आले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 08/22/2014 - 08:48 नवीन
घरातल्या रूढिवादी बायकांना ते खटकते ...
बायका बदला की वो (साभार)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 08/22/2014 - 09:03 नवीन
ज्यांचे कुंकूराव हयात आहेत त्या आताच्या बायांनी सौभाग्यलेणी बासनात गुंडाळलेली आहेत………च्यामारी त्या बाईकडे बघूनही कळत नाही ही मूर्ती बुक झालीये का नाही ते (गणपती जवळ आल्याची खूण ) !! आणि बाईना अजूनही हौस आहे … कालाय तस्मै नमः !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 08/22/2014 - 09:07 नवीन
मूर्ती बुक झालीये का कळायला आजूबाजूला कुणी नम्रपणे उभायं का हे पाहावं लागतं. मालाय समदे नमः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
स
सुबोध खरे Fri, 08/22/2014 - 09:15 नवीन
आमच्या आईची मैत्रीण जिचे यजमान वयाच्या चाळीशीला दुर्दैवाने वारले. तिने मंगळसूत्र बांगड्या घालणे चालू ठेवले याचे कारण ती म्हणाली कि कार्यालयात किंवा रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा जास्त वेळ रेंगाळत राहतात. कार्यालयात किंवा घराबाहेर सुद्धा लग्न झालेल्या बाईशी लोक जपून वागतात. याच कारणासाठी माझे नौदलातील माझे दोन वैमानिक मित्र गेल्यावर त्यांच्या बायकांना विधवेचे पांढरे कपडे घालू नका असा सल्ला मीच दिला होता. (हि गोष्ट त्यांच्या उत्तरेतील सासू सासर्यांना पटलेली नव्हती.) आज त्या त्याबद्दल माझे आभार मानतात. लोकांची नजर आणी मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही. आणी मूळ मुद्दा कुणी काय घालावे हे समाजाने का ठरवायचे त्या व्यक्तीलाच ठरवू द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/22/2014 - 09:19 नवीन
रच्याकने ही मंगळसूत्राची प्रथा कधी सुरु झाली नेमकी? यादवकाळ संपेपपर्यंत नक्कीच नव्हती. इस्लामिक कालखंडात कधीतरी सुरु झाली असे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 08/22/2014 - 16:44 नवीन
मी अगदी हाच प्रश्न तुम्हांलाच विचारणार होतो. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कवितानागेश Fri, 08/22/2014 - 10:22 नवीन
अजूनही अशा रुढीवादी वगरै बायका समाजात शिल्लक आहेत हे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 08/22/2014 - 11:10 नवीन
रुढीवादी वगरै बायका खरंच डोक्याला शॉट असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
स्रुजा Fri, 08/22/2014 - 16:34 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
र
रेवती Fri, 08/22/2014 - 17:28 नवीन
वरील प्रतिसाद नंतर वाचते पण त्या बाईंना जे काय करायचे तो त्यांचा हक्क आहे हे आधी लिहिते. उगीच बाकीच्यांची लुडबुड कशाला? आणि कोणाला काय खटकेल हे सांगता येते का? त्या खटकू बायकांना काही त्रास देतायत का त्या बाई? की एवढी लेणी अंगावर लेऊन दुसर्‍यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत? तसं काही नसेल तर गप्प बसा म्हणावे. काये ना, माणसाला सुखाने जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 08/22/2014 - 17:32 नवीन
जगाची रीत म्हणून सौभाग्यलेणी घातली. मग जगाची रीत म्हणून ती उतरवायला काय हरकत आहे? या तो घोडा कहना या चतुर कहना.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 08/22/2014 - 18:01 नवीन
मधला एकत्र घालवलेला काळ, त्यामुळं वस्तूंना आलेलं (पक्षी कम्पॅनियन व्यक्तीला वाटणारं) जिवंतपण नि भावनिक गुंतवणूक ह्याबरोबरच सामाजिक महत्त्व आणि सुरक्षितता हे काही मुद्दे. ह्यांचं काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 08/22/2014 - 18:21 नवीन
सहमत आहे. भावनिक गुंतवणूक म्हटलं की अपील नाय. पणः
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत
हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा असेल तर तार्किकतेचे नियम लावायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दादा कोंडके Fri, 08/22/2014 - 18:31 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्यारे१ Fri, 08/22/2014 - 20:43 नवीन
>>> मटीरियलिस्टिक कोरडेपणा हे तुम्हाला वाटतंय. त्या बाईंना तेच 'सौभाग्य' वाटतंय. कदाचित कृतज्ञतेची भावना. (जनरल स्टेटमेण्टः लोक ब्रेक अप झालेल्या आपल्या गर्लफ्रेन्डचं नाव पासवर्ड म्हणून आयुष्यभर बाळगतात, तिच्या आठवणीत चेपुवर नाव घेतात, आणखी काय काय करतात ते चालतं काय? ;)) ह्या पेक्षा वाईट पण वास्तववादी विचार करायचाच झाला तर पाशवी शक्ती अंगावर येतील कदाचित पण दागिने 'सोन्याचे' असतात हा 'देखील' एक पैलू असावा. त्याबरोबरच झालेल्या गोष्टीला सामोरं जाण्या ऐवजीची एक सौम्य पळवाट देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/23/2014 - 19:04 नवीन
त्यांनी जाताना माझी सारी सोय केली आहे..त्यांची पेन्शन मला मिळणार आहे ..त्यांनी मला घर व निवा~याची सोय केली आहे..माझ्यावर कोणाच्याच जबाबदाऱ्या ठेवल्या नाहीत हा मटीरियलिस्टिक कोरडेपणा नाही तर "नवर्‍याने हे सगळं प्रेमापोटी / भावनेपोटी केलं" अशी भावना मनात ठेवून हे शब्द त्या बाई बोलल्या असतील हीच शक्यता जास्त वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/22/2014 - 17:34 नवीन
काका, असे लहान सहान प्रसंग येऊ द्या. छान वाटतात मिपाकर प्रतिसाद देतात ते वाचायला. काही दिवसापासून मला सारख्या उचक्या लागायच्या सालं कारण कळत नव्हतं, आपले लेख दिसले आणि उचकी थांबली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 08/22/2014 - 17:37 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सस्नेह Sat, 08/23/2014 - 18:58 नवीन
आपण आहात तरी कोणत्या गडावर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ध
धन्या Sun, 08/24/2014 - 10:27 नवीन
किसनजी मा. केव्हा झाले???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्यारे१ Sun, 08/24/2014 - 13:41 नवीन
मा. धनाजीराव वाकडे, किसन'जी' मा. थे, मा. हय, मा. रहेंगे! येनी आब्जेक्शन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा