Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अवशेची कविता बिविता....

फ — फुंटी, Sat, 08/23/2014 - 21:45
फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना.... सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना .. मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ... कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ... अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात... शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट.... मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत .... काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे.... कोण कुठले अनामिक आहोत आपण.... एका अद्वैताने बांधलेले... (अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)

प्रतिक्रिया द्या
2697 वाचन

💬 प्रतिसाद (18)
क
कवितानागेश Sun, 08/24/2014 - 06:08 नवीन
मुक्तक वाटतय. अजून जरा प्रयत्न करुन कवितेचा बाज आणता आला असता. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/24/2014 - 08:36 नवीन
'अमवाश्येच्या काळात' भटकणार्‍या त्रस्त समंधाचे मनोगत ?! ;) (हघ्या)
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 08/24/2014 - 18:52 नवीन
समंधाचे मनोगत संमंलाच कळत असावे का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/25/2014 - 13:54 नवीन
अवसेच्या रात्री बाहेर पडून पहा, मग नीsssट समजावतो. ही ही ही... हा हा हा... *DIABLO* :biggrin:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 08/26/2014 - 10:27 नवीन
येत्या आवशेला तोरण्यावरती कट्टा करू. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पैसा Tue, 08/26/2014 - 11:36 नवीन
इस्पीकचा एक्का हा आयडी अत्रुप्त आत्म्याने झपाटलाय का काय अशी शंका आली आधीची प्रतिक्रिया बघून! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 08/26/2014 - 11:40 नवीन
उगाच भुताभुतांमध्ये भांडणं लावून देता आणि मग मजा बघत बसता. असेच असतात काय हो संमंध? :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धन्या Tue, 08/26/2014 - 11:44 नवीन
अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो येस्पट हाय. भ्येट घ्यान्यासाठी यात्या आमोशेला शिंव्वगड रोडवरच्या ढोसा क्यांद्रावर भ्याटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पैसा Tue, 08/26/2014 - 12:14 नवीन
आनी त्याच्या प्रतिक्रियांवर एक अग्यावेताळ पण यायचा प्रतिक्रिया द्यायला फ्रीमधे! @स्वॅप्स, संमंध म्हटलं का ते सगळं आलंच की वो! भुतांसारखेच झाडं शोधत फिरत अस्तात बघा मिपावर! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मनीषा Sun, 08/24/2014 - 14:50 नवीन
कवितेवर अमावस्येचा प्रभाव जाणवतो आहे .
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 08/24/2014 - 15:31 नवीन
आज पोळा आहे. अमावस्येलाच दिवाळी असते. अंधारातच आशेचा उजेड शोधायचा असतो.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 08/25/2014 - 11:47 नवीन
>>अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी. हायला!! सेम पिंच!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 11:49 नवीन
पहिले २ शब्द वाचून एकदम दचकले होते. नंतर हे मुक्तक समष्टीसाठी नसून व्यष्टीसाठी आहे हे लक्षात आले. (म्हणजे काय ते विचारू नका.)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 08/25/2014 - 12:12 नवीन
अमावस्या झाल्यावर, चांगल्या डागदरला...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/25/2014 - 14:02 नवीन
मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा .
ह्या कडव्यावर ठेचकाळलो ना राव ...म्हणलं यमक जुळवताय की काय आता *biggrin*
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Tue, 08/26/2014 - 11:14 नवीन
प्रगो राव,तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांची यादी पाहिली आणि तुमच्या 'ठेचकाळत सरकणाऱ्या यमकाची' कल्पना आली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अजय जोशी Mon, 08/25/2014 - 15:53 नवीन
कविता. अजून जरा व्यवस्थित करता आली असती. पण बहुतेक तुम्ही घाईत लिहिली असावीत.
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Mon, 08/25/2014 - 19:44 नवीन
धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय जोशी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा