Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोंधळ

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 08/26/2014 - 11:12
सखे तू जवळ नसतांना तुझे डोळे फार गोंधळ घालतात सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं ------ गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र आणि थंड पडलेल्या इवलाश्या खिडकीतून दिसणारी ती लोभस चंद्रकोर... तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात आणि मग फार गोंधळ होतो... सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते झरझर लेखणी शब्द पाझरते... कविता तुझे वर्णन करायला लागते तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते मग तिचाच गोंधळ होतो, आणि सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते नुसताच गोंधळ, आणि मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना माझा सगळाच नाईलाज असतो कधी अचानक एखादा चुकार अश्रु पापण्यांची सिमारेषा ओलांडतो तर कधी एखादा उसासा निसटतो अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही असा सगळा गोंधळ होऊन बसतो... अन् मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (एक जुनीच रचना, जुनी आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही ;) )

प्रतिक्रिया द्या
3867 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ए
एस Tue, 08/26/2014 - 11:14 नवीन
आणि मग ना घेणं ना देणं, फुकाचे कंदिल लागणार... मस्तच! आणि मी पयला!
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/26/2014 - 11:18 नवीन
छान आहे रे..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/26/2014 - 11:20 नवीन
अलभ्य लाभ!! गविंची प्रतिक्रिया आली... कविता सार्थकी लागली... द्येवा __/\__!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 08/26/2014 - 11:25 नवीन
चढवू नको मेल्या उगाच.. जमली नाहीसे वाटले की तसेही लिवतोच की.. येऊ दे दिवाळीसाठीही एकदम फटाका कविता एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
स्पा Tue, 08/26/2014 - 11:30 नवीन
अश्या डबडबलेल्या अवस्थेत चुकुन आरशाकडे लक्ष गेले तर परत तुझे डोळे... माझी समजूत काढत असतात तेव्हा तर मी अजूनच बावरतो मला तर ती नजर चुकवायची असते पण त्या डोळ्यांवरुन नजर हटतही नाही
कातिल __/\__
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 08/26/2014 - 12:10 नवीन
मस्त रे मिका, फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 08/26/2014 - 12:49 नवीन
खूप आवडली कविता!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/26/2014 - 12:56 नवीन
आवडली हेवेसांनल
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 08/26/2014 - 12:58 नवीन
इतका गोंधळ माजत असेल तर आपलं त्या डोळ्यांसमोरच रहावं ना नेहमी ! मुक्त कविता मस्त आहे !
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 08/26/2014 - 13:27 नवीन
वा वा वा! काय सोप्पं करून टाकलंन् तुम्ही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पैसा Tue, 08/26/2014 - 13:30 नवीन
वाचायची मागे ठेवली होती. धन्याबाबांच्या किरपेमुळे आधी वाचावीच लागली! कविता झक्कास!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 08/26/2014 - 17:56 नवीन
खरोखरच उत्कट होत जातेय कविता... :)
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 08/26/2014 - 19:13 नवीन
मस्त रे! एकदम आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 08/27/2014 - 08:57 नवीन
मस्तच रे मिका! माझी मस्जिदची दौड : विनाकारण ऐवजी दुसरा कुठला शब्द वापरता येईल का? तेवढाच 'जास्त' गद्य वाटतोय. गद्यच हवाय हे ठाऊक आहे. 'अकारण' शोभेल?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 08/27/2014 - 09:27 नवीन
खरय तुझं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2014 - 10:31 नवीन
'उगाच' किंवा 'उगीचच' चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
इ
इनिगोय गुरुवार, 08/28/2014 - 02:47 नवीन
+१४३ उगीचच उत्कट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विवेकपटाईत Wed, 08/27/2014 - 11:40 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 08/28/2014 - 02:43 नवीन
मिका...बेश्ट बेश्ट.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2014 - 03:00 नवीन
सखे तू जवळ असतांना माझा सगळाच नाईलाज असतो. :) -दिलीप बिरुटे (उत्कट)
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 08/28/2014 - 10:45 नवीन
ठसका लागला! :-)) शेमशेम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Sat, 08/30/2014 - 04:26 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}
  • Log in or register to post comments
र
रुमानी Sat, 08/30/2014 - 08:57 नवीन
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं:) कविता आवडली..!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा