Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 08/27/2014 - 13:45
🗣 91 प्रतिसाद
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो. गेल्या कित्येक वर्षांपासून माझीही पुण्यातला गणेशोत्सव याची देही अनुभवायची इच्छा आहे परंतु आमच्याच घरी बाप्पा मुक्कामाला येत असल्यामुळे ते काही केल्या जमत नाहीये. परंतु ह्या वर्षी मात्र मी ठरवलंच आहे की कसंही करून पुण्याला यायचंच त्यामुळे घरच्या बाप्पांना जड अंतकरणान निरोप देऊन मुंबईहून पुण्यनगरीचा रस्ता धरावा असा विचार आहे !! तरी समस्त पुणेकरांना (आणि इतरांनाही ) ही नम्र विनंती की त्यांनी कृपया पुण्यातल्या गणपतींबाबत आणि दर्शनाबाबत मार्गदर्शन करावे म्हणजे कुठे आणि कसे जावे ,काय काळजी घ्यावी वगैरे वगैरे …. मानाचे गणपती एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत का ही माहिती सुद्धा हवी आहे. तसेच अजून कुठचे गणपती आवर्जून पाहावेत हेही जाणून घेण्यात रस आहे .गौरींच्या विसर्जनानंतर आणि अनंत चतुर्दशीच्या आधी दर्शन घेण्याचे ठरवले आहे . ह्या निमित्ताने समस्त मिपा परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया !!

प्रतिक्रिया द्या
21000 वाचन

💬 प्रतिसाद (91)
स
स्पा गुरुवार, 08/28/2014 - 10:20 नवीन
बासुंदीचा विषय निघालाच आहे तर विचारून बघतो, पुण्यात फक्कड अशी गरमागरम बासुंदी कुठे मिळते?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/28/2014 - 10:23 नवीन
अर्थात, चितळे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 10:32 नवीन
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची. चितळे वगैरे म्हणजे पुणेरी पाणीदार बासुंदी देणारे. पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 10:43 नवीन
काळ्या पहाडाचा निषेध असो. फुक्कट जळजळ वाढवल्याबद्दल. आता मिरजेस जाणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सौंदाळा गुरुवार, 08/28/2014 - 10:50 नवीन
पुण्यात कुरुंदवाडची बासुंदी बर्‍याच ठिकाणी मिळते.
कुठे मिळते सांगा की राव आम्हाला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कपिलमुनी गुरुवार, 08/28/2014 - 11:39 नवीन
आम्हाला तर वाडीचीच आवडते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 14:07 नवीन
सहमत, आम्हालाही वाडीचीच आवडते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
स्पा गुरुवार, 08/28/2014 - 14:08 नवीन
आम्हाला वाडी लाल ची आवडते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/28/2014 - 14:41 नवीन
फारच लालची बा तू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 14:35 नवीन
खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचं होतं पण उगीच ती प्रसिद्ध झाली तर हे मुंबै पुणे वाले त्या गोष्टी महाग करतात. म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आसिफ गुरुवार, 08/28/2014 - 20:10 नवीन
बासुंदी चांगली फक्त कुरुंदवाडची>>> या वाक्याला प्रचंड सहमत .. एकदा पाहुण्यांना बासुंदी दिली जाताना, दुसर्‍या दिवशी त्यांचा फोन्..तक्रारीच्या सुरात बोलले 'बासुंदी चांगली होती हो पण फारच घट्ट' आम्हाला हसावे की रडावे कळेना. ~आसिफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मृत्युन्जय Mon, 09/01/2014 - 09:09 नवीन
कुरुंदवाडची बासुंदी पुण्यात कुठे मिळते? वाडीची मिळते. तीच आवडते देखील. एरवी आठवल्यांकडे आणि पुरोहितकडे चांगली बासुंदी मिळते. चितळ्यांकडे बरी मिळते. पण चांगली म्हणवत नाही. त्याला पुणेरी पाणीदार बासुंदी म्हणणे म्हणजे मात्र निव्वळ आकस आहे. अर्थात सणासूदीला कधीतरी त्यांनी तसे केले असल्यास मला माहिती नाही. मी काही चितळे बासुंदीचा मोठा भोक्ता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बाळ सप्रे गुरुवार, 08/28/2014 - 10:32 नवीन
भांडारकर रोडवरील सान्यांकडेही छान असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
श
श्रीगुरुजी Fri, 08/29/2014 - 08:32 नवीन
गणेश पेठेत गुरूद्वाराजवळील एका हलवायाच्या दुकानात गरमागरम बासुंदी खूप चांगली असते (म्हणे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ गुरुवार, 08/28/2014 - 11:06 नवीन
चितळ्यांकडे मिळते ती भिलवडीची बासुंदी असते
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 08/28/2014 - 14:37 नवीन
चितळ्यांकडे मिळते तो बासुंदीचा झी सारेगमप असतो. कुमारांचं गाणं माहीत असणारे त्याला चांगलं म्हणत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/28/2014 - 14:25 नवीन
चुकलो...बासुंदी झाली आहे :)
  • Log in or register to post comments
स
सखी गुरुवार, 08/28/2014 - 15:03 नवीन
गणपतीचा धागा आहे फारतर मोदकाचे सतरा प्रकार होतील असं कुणालाही वाटेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
स
स्पा Fri, 08/29/2014 - 08:45 नवीन
बुवा कडुन अता बासुंदी उकळणे आले
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 08/29/2014 - 12:17 नवीन
उकळत्या बासुंदीने तोंड पोळू शकते, सावधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 08/29/2014 - 13:11 नवीन
बुवा मस्तानी/ बासुंदी दील , तो सुदिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 08/30/2014 - 07:11 नवीन
@बुवा मस्तानी/ बासुंदी दील , तो सुदिन>>> :-/ हा हल कट माणूस Image removed. पुण्याला यील..तो(च) सगळ्या अखिल विश्वातला सूऊऊऊऊऊउदीन! :p बिन कामाचा ये एकदा(तरी!) हवी-ती मस्तानी देइन. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Sat, 08/30/2014 - 07:52 नवीन
हवी ती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 08/30/2014 - 16:30 नवीन
बघा..हराम्याला कसं हसू आलं मनापासून! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस Sat, 08/30/2014 - 16:37 नवीन
तुम्हालाही अगदी गदगदून हसू आलंय बघा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/01/2014 - 18:52 नवीन
@तुम्हालाही अगदी गदगदून हसू आलंय बघा की.>>> काय करणार? आंम्हाला (तुमच्या..सारखं!) मनातल्या मनात हसता नै येत ना!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :p =)) :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Sat, 08/30/2014 - 06:49 नवीन
मानाचे गणपती काय प्रकरण आहे? बिनमानाचे गणपतीही असतात का? मानाचा गणपती ठरवण्याचे निकष काय असतात? की पाच मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत आणि आता त्यात बदल होणार नाही?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 08/31/2014 - 12:04 नवीन
धन्या लेका एक काठ पकडत जा की. सदानकदा कसा काय गोंधळलेला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
आ
आदूबाळ Mon, 09/01/2014 - 10:58 नवीन
मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत. आता त्यात बदल होणे नाही. निकषच शोधायचे झाले तर: १. कसबा गणपती - पुण्याचे ग्रामदैवत २. तांबडी जोगेश्वरी - पुण्याची ग्रामदेवता ३. गुरुजी तालीम - (कारण माहीत नाही) ४. तुळशीबाग - पुण्याचे "केअरटेकर" सरदार तुळशीबागवाल्यांचा गणपती ५. केसरीवाडा - सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लो. टि़ळकांचा गणपती आता यात शंका काढायच्याच झाल्या तर पुष्कळ आहेत. उदा. पहिला सार्वजनिक गणपती "भाऊ रंगारी" मानाचा का नाही? गुरुजी तालमीपेक्षा प्रसिद्ध असलेली साखळीपीर तालीम मानात का नाही? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
सुहास.. Mon, 09/01/2014 - 14:44 नवीन
सगळे टिळकांनीच सुरु केलेले आहेत , मानाचा पहिला याचा अर्थ त्या वेळी दहा दिवस पहिल्यांदा ठेवण्यात आला तो , दुसरा आणि तिसरा ही त्याच वर्षी ठेवण्यात आले होते, पण गुरुजी तालीमीमध्ये सत्यनारायण नव्हते घातले ...पुढे टिळकांनी अजुन दोन सुरू केले मण ...गणोशोत्सव सार्वजनीक झाला ...असो बासुंदीच्या कथा चालुच आहेत ...चितळे पेक्षा गणेश पेठेतील बासुंदी सदैव आवडत आलेलीच आहे ....खाण्यापिण्याची चंगळ असते डेक्कन चौपाटीला ..सध्या नदीला पाणी च पाणीच असल्याने फील ही चांगला येतो, आयडिया चेंज केल्यामुळे ..बाईक डेक्कन ला पार्क करुन लक्ष्मी रोडच्या दिशेने हल्ली दर्शन करत जातो ..स्वारगेट पर्यंत आणि म्ग येतान पुन्हा, कुंभारवाडा कॉर्पोरेशन करत परत येतो...रात्रभर डिजे जा गोंगाट ई. असतो हे ज्या गाढवाने सांगीतले त्याला आमच्या सांष्टांग दंडवत सांगा ...रात्री दहा नंतर अर्ध्या डेसिबल च्या वर आवाज जात नाही ...ज्यांनी रोषणाई केली त्यांची ती लायटिंग अगदी जवळ जावुन पहावी लागते ...यावर्षी पुर्ण आवाजात एकायची असेल तर सराफ बाजारात १० च्या आधी सराफांचाच अष्ट विनायक मित्र मंडळाचा फारिन वरुन मागविलेला संच नक्की बघुन या !! शिवाय टिंबर मार्केट ला कामगारांचा एक गणपती असतो ..तिथे रोज जेवण असते ..साधेच ..शाक , पुरी आणी मसाले भात ...उभ्या उभ्या खायला !! कसबेत शिरायच्या आधी कुभारवाडा गल्लीच्या शेवटच्या टोकाला, सात-तोटी हौद चौकातला एक नक्की बघा , दर वर्षी लांबलचक लाईन असते देखावा बघण्यासाठी ...किमा पंधरा ते वीस मिनीटे असतो आणि ठराविक संख्याच आत मध्ये सोडतात ...अजुन राहिलेतच ...घालेन भर हळु हळु ...कंसामध्ये एकदा गणेशौत्सवाविषयी लिहाव वाटत पुण्याच्या :) खायचं ठिक आहे ...पण प्यासा आणि सरगम दोन्ही एतिहासिक वास्तु रात्रभर ( पश्चिम दिशेच्या गेटवरुन ) उघड्या असते ..हेच काय ते दुर्दैव पुण्याचे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कवितानागेश Mon, 09/01/2014 - 19:50 नवीन
चांगला प्रतिसाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
व
विजुभाऊ Sun, 08/31/2014 - 17:11 नवीन
मानाचा गणपती म्हणजे खरेतर गणपती चा आणि मानाचा संबन्ध नाही. गणपती बसवणारी जी मंडळे आहेत त्यानी काही क्रमानुसार विसर्जन मिरवणूकीत सामिल व्हावे असे अभिप्रेत आहे. या क्रमात काही मंडळाना अगोदरचे क्रम दिले आहेत. कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते. यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही. अर्थात पुण्यात कशाला काय म्हणतील हे साम्गता येत नाही. अवांतरः "नागझरी " असे सुंदर नाव ऐकुन काही पहायला जावे तर ते चक्क दारुवाला पुलाखालचे गटार निघावे अशा पुण्या ला काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 08/31/2014 - 17:30 नवीन
विजुभौ आगे बढो हम तुम्हारे साथ है. :P तुमच्या पुणेप्रेमाची ;) कीर्ती दिगंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अनुप ढेरे Sun, 08/31/2014 - 18:38 नवीन
कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते.
यात कोतेपणा कुठे आला ते समजलं नाही.
यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही.
तुम्हाला समजलं नाही तर लगेच तो कोतेपणा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सह्यमित्र Mon, 09/01/2014 - 09:00 नवीन
अहो नागझरी नावाचा ओढाच होता तो काही शतका पूर्वी पर्यन्त. आता वाढत्या लोकसंख्ये च्या विळख्यामुळे नदीचेच गटार झाले आहे तिथे छोट्या नागझरी ची काय कथा. इथे पुण्यात कशाला काय म्हणतील असे म्हणायची काहीच गरज नाहॆ. हे पुण्यातच नवे तर थोड्याफार फरकाने बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
कवितानागेश Mon, 09/01/2014 - 12:30 नवीन
शेवटी दर्शनाबद्दल मार्गदर्शन मिळतच नाहीये. लोक्स बासुंदीच्याच मागे! :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/01/2014 - 12:58 नवीन
@ अनूप काका : डॉक्टरकडे जाताना अपॉईंटमेंट मिळाली याला जर एखादा मान किंवा सन्मान समजत असेल तर त्याला कोणत्या मनाचे म्हणावयचे ? केवळ विसर्जन लवकर करायला मिळणे हा मान आहे असे म्हणवत नाही. इतका क्षीण विचार करने हा कोतेपणाच झाला .त्यापेक्षा समाजकार्य केले म्हणून काही गौरव प्राप्त झाला तर त्याला "मान" म्हणणे हे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/01/2014 - 19:45 नवीन
काय अडचण आहे ?? धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ?? मै क्या बोल रहा है …तुम सब लोक क्या बोल रहा है …. पुणे के गणपती के बारे मे बोल रहा है मै…उसके दर्शन के बारे मे पुछ रहा है मै !!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 09/01/2014 - 20:11 नवीन
धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ??
पत्रकं फुकट जातील हो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्यारे१ Mon, 09/01/2014 - 20:18 नवीन
असं कसं असं कसं? कागदाचे विविध उपयोग कसे करावेत ह्याचा परामर्श (लई दिवसांनी वापरला बगा) घेतला जाईल की ह्याच्च धाग्यावर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 09/07/2014 - 16:47 नवीन
मिपाकरांनी मनापासून केलेल्या सूचना आणि सल्ले लक्षात घेऊन आम्ही सरतेशेवटी कालच्या विकांताला पुण्यनगरीत पोहोचलोच ! शनिवारवाडा पाहून सुरुवात केली आणि कसबा पेठ , दगडूशेठ हलवाई ,गुरुजी तालीम, तुळशीबाग , तांबडी जोगेश्वरी , केसरीवाडा आणि त्याच बरोबर रस्त्यातले इतर मंडळांचे गणपती असे सगळ्या गणेशांचे दर्शन घेऊन जीवाचे पुणे केले. गर्दी अशी विशेष वाटली नाही कारण मुंबईमध्ये राहून यथायोग्य सराव झाला आहे. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दर्शनासाठी नसलेली कुठलीही आडकाठी मनाला सुखावून गेली. सगळ्या गणपतींचे मनसोक्त दर्शन घेऊन पुण्यनगरीत आल्याचे सार्थक झाले. पुण्याच्या ट्राफिक ने मात्र जीव नकोसा केला. सगळे गणपती झाल्यानंतर पोटपूजा ही उरकली आणि सगळ्यात शेवटी बाजीराव रस्त्यावर असलेल्या वाड्यात पुणे मनपाने आयोजित केलेलं पुनवडी ते पुण्यनगरी हे प्रदर्शनही पाहिलं आणि पुण्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला. सगळ्या मिपाकरांचे मनापासून आभार !! आता दर वर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याला फेरी मारायची ठरवलेली आहे !! गणपती बाप्पा मोरया !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा