वंगाळ !
साद झलकेची ,
मना मंदी चाळं,
शरावणातल बेडकं स्साल,
वंगाळ वंगाळ
गव्हाळ मानंखाली
तीळ मस्त काळं
चवचाल जीभ स्साली
वंगाळ वंगाळ
लाजुन पाठमोरी
बसली दातखीळं
कलिजा खल्लास स्साला
वंगाळ वंगाळ
पदराला पुरना कापड
अंगी रतीच मुळं
दमच निघना स्साला
वंगाळ वंगाळ
दोन चंद्राची रात म्हणं
गारवा आनं ढगाळं
सरना च आज स्साली
वंगाळ वंगाळ
💬 प्रतिसाद
(5)
इ
इनिगोय
गुरुवार, 08/28/2014 - 02:23
नवीन
क्या बात! अनपेक्षित.. मस्तच.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/28/2014 - 02:32
नवीन
मस्तच..रे..
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 08/28/2014 - 02:44
नवीन
भारी. एकदम कसदार
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 08/28/2014 - 04:49
नवीन
मस्त जमलंय, वंगाळ प्रकर्ण..
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/28/2014 - 08:18
नवीन
लईच बेक्कार...
- Log in or register to post comments