वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो. मिपा म्हणजे माझ्या कुटुंबातला एक भाग झाला आणि मी मिपाच्या कुटुंबाचा. मिपानं मला अनेकदा मुड व्यवस्थित नसल्यावर लेखांच्या माध्यमातुन मानसिक आधार दिला. कधी खो खो हसवलं, कधी रडवलंही, कधी विचार करायला लावला, काही गोष्टी शिकवल्या, काही विसरायला लावल्या. आज असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत.
मिपानं एक ओळख नसलेला मोठा मित्र परिवार दिला. कधी कोणाशी खूप बोलावं वाटलं. कधी कोणाच्या लेखनातला अनुभव आपला वाटला. माझे आणि मिपापरिवाराचं एक ऋणानुबंध निर्माण झाले. आभासी जगाशी फ़ारसा संबंध ठेवू नये, विश्वास टाकु नये, नेट डिसकनेक्ट केलं की संपलं, अस समजणारा मी मिपाच्या जगात रुमुन गेलो आहे. आणि आज खुप आनंदी आहे.
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
काय आपणही असाच विचार करता ? :)
!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा!