Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राम गोपाल वर्माने लावलेली आग!

ह
हुप्प्या
Sat, 08/30/2014 - 17:38
🗣 64 प्रतिसाद
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे. ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे. काही नमुने इथे आहेत. http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.) ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा. हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल. आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.

प्रतिक्रिया द्या
16065 वाचन

💬 प्रतिसाद (64)
ट
टवाळ कार्टा Wed, 09/03/2014 - 16:34 नवीन
वर्तमानपत्रे चिकटवणे
यात गलिच्छ काय आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आशु जोग गुरुवार, 07/09/2015 - 20:27 नवीन
पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आशु जोग गुरुवार, 07/09/2015 - 20:29 नवीन
हे आपण स्वतः लिहीलंत हे बरं झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
क
काळा पहाड Mon, 09/01/2014 - 14:29 नवीन
आता फटके खायची तयारी ठेवावी अशा लोकांनी.
ही धमकी वगैरे आहे का?
पराचा कावळा करायची गरज आहे का? की पेपर वाचत नाही तुम्ही? ते वाक्य 'केलं तर निस्तरलं पाहीजे' अशा अर्थाचं होतं. बाकी इथं साध्या साध्या घटनेवरून दंगे होतायत. मागे फेस्बुक वरून उसळलेला दंगा विसरला की काय? आम्ही (प्रथमवचनी एकवचनी) फटके ही देत नाही आणि धमकी सुद्धा. फक्त एक शक्यता व्यक्त केली की कदाचित काही संघटना आता हे वाढवतील आणि वर्मा बाबू ना फटके बसतील (कायदेशीर किंवा शारिरिक - जसा त्या संघटनेचा वकूब असेल त्या प्रमाणे). बाकी असं काही झालं तरी सेक्यूलर नसल्यामुळे याचा निषेध काही आम्ही करणार नाही, कारण तसं न करणं हा काही गुन्हा नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Wed, 09/03/2014 - 09:12 नवीन
राम गोपाल वर्मा विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. कायद्याने जो निर्णय व्हायचा तो होईल. पण ह्या घटनेचा फायदा घेवून काही संघटना हिंसाचार करण्याचा जर प्रयत्न करत असतील प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील,तर त्यांना मोदी सरकारने वेसन घातली पाहिजे.कायदा हाती घेणार्यांना जरब बसवली पाहिजे.देशात न्याय करण्यासाठी न्यापालिका यंत्रणा आहे त्यांच्यापलीकडे जर काही संघटना स्वताला समजत असतील तर त्यांना त्याची जागा दाखवून देण्यास मोदी सरकार समर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/04/2014 - 07:41 नवीन
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो तो इच्छाशक्तीचा अभाव. या इच्छाशक्तीच्या अभावापायीच सरस्वतीची मुर्ती फोडणारे मोकाट सुटतात. असो. अजुन तरी रामूच्या वक्तव्यामुळे काही हिंसाचार घडल्याचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचित मोदी सरकारला काही करावे लागणार नाही. बादवे काही दंगा झालाच तर तो निस्तरणे राज्य सरकारचे काम असेल ना? नाही म्हणजे रामू च्या वक्तव्यामुळे देशव्यापी आंदोलन घडण्याची शक्यता कमीच म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव गुरुवार, 09/04/2014 - 09:34 नवीन
बरोबर आहे राज्य सरकारच काम राहील. रामू दक्षिणेकडचा आहे तेथे काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता कमी वाटते. कारण तेथे करुणानिधी नि जयललिता ह्यांची चलती आहे. करुणानिधी स्वताच त्यांच्या श्रीरामा बद्दल केलेल्या वक्तव्यांनी वादग्रस्त आहेत. त्यात जयललिता ह्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पक्षाचे संस्थापक पेरियार इ वी रामास्वामी होते त्यांचे देवाबद्दलचे विचार इतके जहाल होते कि रामूचे वक्तव्य म्हणजे मामुली वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/01/2014 - 15:11 नवीन
कंटाळा आलाय फार ... ह्या धाग्यावर बॅटींगला उतरावे काय असा विचार करत आहे सध्या ....पण तुर्तास आमच्या कडुन पास !
  • Log in or register to post comments
प
पोटे Mon, 09/01/2014 - 15:17 नवीन
पण रामु बोलल्ल ते खरेच होते की ! खरे बोलणे हा गुन्हा झाला की
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/01/2014 - 15:19 नवीन
मग माफी का मागितली? ट्विट का उडवली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
क
काळा पहाड Mon, 09/01/2014 - 20:15 नवीन
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू खरा बोल्ला वगैरे दोन तीन येळा बोलून काडी टाकाया बग्तंय. फाट्यावर मारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
त
तुडतुडी Mon, 07/13/2015 - 11:27 नवीन
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही.>>> बरोबर बोललात . हिंदू धर्माची , देवांची चेष्टा आणि बदनामी करायला दुसरं कोणी कशाला हवंय ? हिंदूच ते उत्तम रित्या पार पाडतात . उगीच का इतर धर्मीय त्यांना काफिर , मूर्ख समजतात का ? पुराणातील बहुतेक कथा बुद्धीच्या निकषावर टिकणे कठिण आहे.>>> होय . सामान्य बुद्धीच्या लोकांना काही आशय समजावून सांगण्यासाठी ह्या कथा रचलेल्या आहेत . कारण त्यामागचं खरं तत्व कळणं अवघड होतं . नंतर त्यामागचा खरा उद्देश किवा ते तत्व लोप पावून ह्या सुमार बुद्धीच्या लोकांनी केवळ कथांनाच जिवंत ठेवलं . आणि अति शहाण्या लोकांनी त्यामगे सत्य काय आहे हे शोधण्याचं सोडून पुराणातली वांगी म्हणून त्याची टिंगल केली . मला वाटते आता सोशल मिडीयाचा वापर करताना तिथे तुमचा हेतू काय असा एक कॉलम टाकावा म्हणजे नंतर त्रास नको.>>> हा हा हा … सहमत एखादी व्यक्ती धार्मिक असेल आयुष्यभर देवाचे गुणगान गाणारी असेल परंतु समाजातील ज्या अन्यायी गोष्टी आहेत त्याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसेल तर त्याला अर्थ नाही>>> समाजातील अन्यायी गोष्टींच्या विरोधात लढण्याचा ठेका फक्त धार्मिक व्यक्तींनी घायाय्चाय का ? समाजाला हात , पाय , बुद्धी लढण्याची ताकद दिलीये ती काय फक्त स्वार्थीपणा करण्यासाठी ? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी ? हरामीपणा, व्यभिचार करण्यासाठी , काहीही कामधंदा न करता फुकट खाणा साठी ? लायकी आणि ऐपत नसताना खंडीभर पोरं काढून पोरांना दुर्दैवाचे दशावतार बघायला लावण्यासाठी ?तसं असेल तर कशाला काही अर्थ नाही . बरं ह्याची शिक्षा भोगायला लागल्यावर तथाकथित बुद्धिवादी 'देव काही करत नाही' म्हणून गळे काढतात. धार्मिक लोकांनी इतरांवर चिखलफेक केलेलं ह्यांना चालत नाही . पण इतरांनी देवा , धर्मावर चिखलफेक केलेली ह्यांना खुशाल चालते .
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Mon, 07/13/2015 - 11:28 नवीन
समाजातल्या वाईट , गलिछ चालीरीती , दुसर्यावर अन्याय करण्याच्या नवनवीन युक्त्या ह्या so called ब्राह्मणांनी आणल्यात . त्यासाठी इतर धार्मिक लीकांवर , देवा वर कशासाठी आगपाखड करायची . देवाचा आणि धर्मातल्या चांगल्या वाईट चालीरीतींचा संबंध का लावला जातो ? देवाचा धर्माशी काय संबंध ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/13/2015 - 11:54 नवीन
आत्ता ट्रॅकवर आलात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा