Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

व — वेल्लाभट, Mon, 09/01/2014 - 10:40
पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी. गणपती बाप्पा काय काय सांगू आलोय आम्ही मागायला ते ते सगळं, जे जे लागतं, प्रिमियर लीग मारायला ||धॄ|| कोच आहे विद्वान खरा आहे जरा निराळी त-हा मात्र सगळ्या प्लेयर्सना शिकवा त्याचं ऐकायला ||१|| संघ टाकतोय कात जरी नेहमीचीच ही बात जरी नव्या जुन्याची सांगड तेवढी मदत करा घालायला ||२|| बुद्धी पास द्यायला आणि ताकद किक मारायला जोर थोडा पायांमध्ये बॉक्स टू बॉक्स धावायला ||३|| संघ जरासा गळपटलाय विश्वास थोडा डळमळलाय एकच तगडा विजय हवाय ती आग पुन्हा लागायला ||४|| हार जीत होतेच नेहमी जाणतो जरी सारे आम्ही विजयाचीच वेसण हवी बोलणा-यांना थांबवायला ||५|| गणपती बाप्पा काय काय सांगू आलोय आम्ही मागायला ते ते सगळं, जे जे लागतं, प्रिमियर लीग मारायला ||धॄ||

प्रतिक्रिया द्या
1792 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Mon, 09/01/2014 - 12:53 नवीन
:D नव्या युगातली नवी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/01/2014 - 19:24 नवीन
"येऊ कशी तशी मी नांदायला हो"ची चाल मस्त आहे ह्याला !!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 09/02/2014 - 03:14 नवीन
आय्ल्ल्ला हो !!!! हे माझ्या लक्षात्त्तच नाही आलं की राव ! वा वा ! काय शोधलंयत !
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 16:46 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा