Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंदिर काढा..

स
समीरसूर
Tue, 09/02/2014 - 10:41
🗣 165 प्रतिसाद
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

प्रतिक्रिया द्या
35517 वाचन

💬 प्रतिसाद (165)
स
सुहास झेले Tue, 09/02/2014 - 10:48 नवीन
हा हा हा ... मागे मी आणि एक मित्र ह्याचा सिरीअसली विचार करत होतो. एक प्लॉट घ्यायचा आणि मस्त मंदिर बांधायचे... बाकी सगळे आपोआप चालून येते, बघितलाय अश्या अनेक मंदिरांचा प्रवास.. असो !! अजूनही आयडिया हिट आहे हेवेसांनल... बोला करायची का सुरुवात? :D ;-)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 09/02/2014 - 12:18 नवीन
छ्या... विकत घेतलेल्या जमिनीवरचं कोरंक्रिंग स्टार्टप मंदिर काय पैसे खेचणार नाही. त्यापेक्षा कुठल्यातरी गल्लीबोळातलं जुनाट मंदिर टेकओवर करणं सोपं पडेल. त्या देवळाला "कोपर्‍या गणपती" वगैरे नाव असलं तर त्यावरून ष्टोर्‍याही रिवर्स एंजिनियर करता येतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
प
पैसा Tue, 09/02/2014 - 12:22 नवीन
नाहीतर "मला रात्री दृष्टांत झाला, मला जमिनीतून बाहेर काढ!" टैप श्टोर्‍या आधी पसरवायच्या. मग गाजावाजा करून शोध आणि मग जमीन खणून मूर्ती सापडेल अशी व्यवस्था करायची. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सुहास झेले Tue, 09/02/2014 - 13:59 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Wed, 09/03/2014 - 02:45 नवीन
असा प्रकार खरोखर घडला आहे कळव्यामध्ये. एका उत्तर भारतीय महिलेला स्वप्न पडले.… दुसऱ्या दिवशी ती पारसिकनगर च्या एका टेकडीवर एका दगडाला शेंदूर फासून बसली. नेहमीप्रमाणे लोकांची रीघ लागली. शेवटी पोलिसांनि हस्तक्षेप केला. अजूनहि लोक जात असतील. देर्देकरांना हा प्रकार माहित असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रमोद देर्देकर Wed, 09/03/2014 - 06:08 नवीन
नाही रे क खटपट्या पण विचारुन बघतो. मला वाटतं आजच्या सगळ्या छोट्या मोठया देवस्थानांबाबतीत असे प्रकार होत आहेत. जसे जो पर्यंत मनोजकुमारचा पिक्चर आला नव्हता तो पर्यंत साईबाबा तरी कुठे फेमस होते. तसेचा वैष्णवदेवी , शनी शिंगणापुर या देवतांबद्दल बोलता येईल. ताजं उदा. म्हणजे अगदि १९९० पर्यंत मुंबईतल्या लालबागचा गणेश गल्लीतला गणपती मोठा म्हणुन प्रसिध्द होता आम्ही तोच पाहायला जायचो तेव्हा लालाबागच्या राजाचं नाव सुध्दा नव्हतं. फक्त एक आश्चर्य वाटतं की कोट्यावधी रुपये खर्च करुन बिर्ला मंड्ळींनी भारतात सर्व ठिकाणी मंदिरे बांधली अगदि सगळ्या सोयी सुविंधांसकट मग समीरसुर यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकडे भक्तगण म्हणावे तसे का गर्दी करत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 09/03/2014 - 07:44 नवीन
चमत्काराशिवाय नमस्कार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
पगला गजोधर Wed, 09/03/2014 - 11:03 नवीन
या मंदिरात जो कोणी फक्त फक्त १११११ रु चा अभिषेक करतो, त्याला ऐका देशाचा ह१ब प्रकारचा विसा लगेचच मिळतो, असे पिल्लू सोडून द्यायचे… देवाचे नाव विसा-मारूती/गणेश वै ठेवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
शिद Wed, 09/03/2014 - 11:24 नवीन
Chilkur Balaji Temple (Telugu: చిలుకూరు బాలాజీ దేవాలయము) popularly known as Visa Balaji Temple or Visa God is an ancient Hindu temple of Lord Balaji on the banks of Osman Sagar Lake near Hyderabad, India.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/02/2014 - 11:14 नवीन
हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? च्च्च्च्च्च ! असा विचार केलात तर मग तुम्ही चलाख आस्तिक कसे बनणार ? आणि ते नाही बनलात तर आस्तिकतेच्या आधारे धनदंडगे कसे बनणार ?? मला तर तुमची काळजी वाटायला लागलीय ;) :)
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 09/02/2014 - 11:16 नवीन
आपण आयडियाज द्यायच्या. तेवढं काँट्रिब्युशन चोख द्यायचं. अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना! ;-) आणि एकदा नोटांची बंडलं दिसायला लागल्यावर आणि सोनं-चांदी चमकायला लागल्यावर कसलं मन आणि कसलं काय्...फिर रुकने का नही, बस गिनते रहने का...और सबसे बडी बात, सोचने का भी नही...जो ज्यादा सोचता है, वो अक्सर पीछे रह जाता है... मग काय, जमिनीवर जमिनी घेत रहायच्या. भक्तीमार्गातले सगळे बिझनेस सुरु करायचे. आता मिटली काळजी? शेवटी मिपावर कुणीतरी म्हणतंच ना 'देवाक काळजी'. तसंच आहे हे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 11:17 नवीन
अंमलबजावणी करण्यासाठी 'चलाख आस्तिक' असतीलच ना!
अंमलबजावणीसाठी चलाख नास्तिकच हवा. तो प्रसंगी देवालाही विकुन पैसा कमावेल. कारण त्याला असेही देवाशी काही घेणेदेणे नसते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/02/2014 - 11:55 नवीन
चलाख आस्तिक आणि चलाख नास्तिक यांच्यातील सीमारेषा फार धूसर असते... "ती कशी ?" यावर मागच्या माझ्या "आस्तिक-नास्तिक" धाग्याचा उत्तरार्ध लिहायचे मनात आहे. वेळ मिळाला की पाडून टाकावा म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कवितानागेश Tue, 09/02/2014 - 11:20 नवीन
आता आधी जुनी समई शोधणं आलं.. ;)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/02/2014 - 11:26 नवीन
खोदा म्हणजे सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/02/2014 - 14:10 नवीन
पितळेची समई चिखलात लोळवा आणि आठवडा दहा दिवस त्याचच्याच बुड्वून ठेवा. मस्त प्राचीन "लूक" येइल. ।हाकानाका ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सर्वसाक्षी Tue, 09/02/2014 - 11:23 नवीन
मला वाटल 'वैद्य पाटणकर काढा' सारखा 'मंदिर काढा'. प्या आणि सुखी व्हा.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 09/02/2014 - 11:24 नवीन
ग्यारंटी देतो कुणी ही फिरकणार नाही, पैसा व्यर्थ जाईल.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/02/2014 - 11:28 नवीन
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विवेकपटाईत गुरुवार, 09/04/2014 - 07:21 नवीन
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही या निष्कर्षाप्रत आलात? उत्तर : मराठी लोकांना धंधा जमत नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
समीरसूर गुरुवार, 09/04/2014 - 08:19 नवीन
अनिरुद्ध बापू मराठीच! चितळे मराठीच. डीएसके मराठीच. नरेंन्द्र महाराज मराठीच. पर्सिस्टंटचे देशपांडे आणि केपीआयटीचे पंडित मराठीच. देसाई बंधूवाले देसाई मराठीच. दगडूशेठ गणपतीवाले आणि सिद्धिविनायकवाले भक्तीमार्गातील व्यवसायी मराठीच. ;-) आम्हाला पण जमेल! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/02/2014 - 11:54 नवीन
हल्ली नविन धंदा चालू करणे ह्याला 'स्टार्ट-अप' म्हणतात असे ऐकलय.मंदिर स्टार्ट-अप ही संकप्ल्पना फायदेशीर वाटते. तुमच्या त्या इन्व्हेस्टर का काय लोकांना सांगून पहा. (येथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.) (दर्गा स्टार्ट-अप बर्यापैकी चालेल असे मानणारी सेक्युलर्)माई
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/02/2014 - 14:12 नवीन
मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल. तुम्ही कोठून (कुठल्या देशातून) पैसा खेचू शकाल त्यावर हे अवलंबून आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गवि Tue, 09/02/2014 - 12:24 नवीन
यावरुन व्यंकटेश माडगूळकरांची "एका नवीन देवस्थानाचा जन्म" ही अफलातून कथा आठवली. माणदेशी अन हेलदार शब्दांत त्यांनी कथाकथनही केलंय तिचं..
  • Log in or register to post comments
प
पोटे Tue, 09/02/2014 - 13:12 नवीन
खड्डा खणुन त्यात भरपुर कडधान्ये घालावीत. त्यावर समै मूर्ती ठेवावी. माती घालुन बुजवावे. मग दृष्टान्त झाला म्हणुन कोकलावे. ऱोज खड्ड्यावर पाणी घालावे. कडधान्ये फुगुन मुर्ती वर येते. याला स्वयम्भु मुर्ती म्हणतात
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 09/02/2014 - 13:25 नवीन
फक्त मूर्तीवरचा प्राईस ट्याग काढायला विसरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
ब
बॅटमॅन Tue, 09/02/2014 - 14:03 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
इ
इरसाल Tue, 09/02/2014 - 13:32 नवीन
त्यात तुळशीचे बी टाकायला इसरु ने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
म
मंदार दिलीप जोशी Tue, 09/02/2014 - 13:25 नवीन
एका रिकाम्या जागेवर हिरवी चादर अंथरायची मग काही दिवसांनी तिथे चौथरा बांधायचा मग लाईट मीटर मग हलू हळू टोलेजंग मशीद होतेच.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Tue, 09/02/2014 - 16:14 नवीन
एवढे करण्यापेक्षा दाढी करणे बंद करावे ,तीन महीन्यानंतर नावामागे स्वामी वा श्रीश्रीश्री वा महंत योगीराज वगैरे जोडावे, आश्रम, भक्तगण( यात सुंदर ललनांचा जास्त भरणा असतो ),पैसा ,इंम्पोर्टेड गाड्या, गेलाबाजार परदेशात एखादे बेट व आश्रम. कशाला हिरव्या चादरीला पैसे खर्च करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 09/04/2014 - 07:08 नवीन
सुंदर ललनांचे ISIS काय करत आहे पहावे ही विनंती. च.फु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/04/2014 - 08:53 नवीन
नित्यानंद,आसारामने काय केले ते पण लिवा...जोशीबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 09/04/2014 - 09:29 नवीन
तुम्ही काय केले ते पण तुम्ही लिवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
व
विलासराव Sun, 09/14/2014 - 18:46 नवीन
मला काही रोल आहे का रेवतीताई; हे पहा अनुभव: Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ट
टवाळ कार्टा Sun, 09/14/2014 - 18:49 नवीन
"पहुंचे हुए बाबा" म्हणुन मंदिरात बसाल का? ;) (क्रु. ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
व
विलासराव Sun, 09/14/2014 - 18:50 नवीन
हे तर राहीलंचः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
र
रेवती Sun, 09/14/2014 - 22:46 नवीन
सगळे फोटू भारी आहेत! तुम्ही आमच्या मंदिर संस्थानासाठी 'काम के आदमी' आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/15/2014 - 06:01 नवीन
नक्कीच ! दाढीवाले आणि बिनदाढीवाले असे डबल-ट्रिपल (किंवा जास्तही) रोल देता येतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 06:43 नवीन
म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले कॉपीटीशन नको म्हणुन. आता पाठवा नेमणुक लेटर पॅकेजसह********. दिसणे जास्त महत्वाचे या रोलमधे त्यामुळे वाटाही तसाच असावा. भक्ताच्या सोयीस्कर प्रश्नांना उत्त्रे देउन इतर वेळी मौन. चुकुन काही उत्त्र गेलेच तर अवलीया म्हणुन प्रसीद्धी आहेच. फोटोत दिसत नाहीत पण अजुनही बर्याच पुरक कला आहेत आपल्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
काळा पहाड Mon, 09/15/2014 - 14:26 नवीन
"सिनीयर अ‍ॅडव्हायजरी बाबा" या पोस्टचं म्हणून लेटर पाठवलंय. प्रोबेशन मध्ये १० लाखाचं टार्गेट आहे. २ भक्त आणि १ भक्तीण अनुयायांचा जत्था तुम्हाला देण्यात येईल. ६ महिन्यांपर्यंत प्रोबेशन, त्या नंतर "व्हाईस प्रेसिडेंशियल बाबा" या पदावर कायम्स्वरूपी नेमणूक करण्यात येईल व अनुयायांची संख्या जरूरीप्रमाणे वाढवण्यात येईल. अपॉईंटमेट लेटर च्या पहिल्या पानावर आपला "हॅलो" असलेला आणि पद्मासनातला फोटो (पूर्ण कपडे घालून आणि शक्यतो चिलिम घेवून) आणि शेवटच्या पानावर आपल्या डाव्या पायाचा ठसा उमटवून स्पीड पोस्टाद्वारे मंदिराकडे पाठवावा (उगीच मनातल्या मनात फॅक्स केलाय अस्लं आमाला सांगू नये, ते पब्लिक साठी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
र
रेवती Mon, 09/15/2014 - 14:39 नवीन
पर्फेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/15/2014 - 14:40 नवीन
चला विलासराव ! काय म्हणता ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/15/2014 - 14:41 नवीन
मी विचारता विचारता CEO ची संमती पण आली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विलासराव Mon, 09/15/2014 - 16:58 नवीन
शुभकार्याला मुहुर्ताची गरज नसते. हा घ्या फोटु: लगेच कामाला लागा आता...... Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Mon, 09/15/2014 - 17:13 नवीन
आइईशप्पत...आता १ मौलवी पण बोलावु...सर्व धर्म समभाव मंदिर होउन जैल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
क
काळा पहाड Mon, 09/15/2014 - 18:10 नवीन
ज्यास्त करू नका.. खेड्यातले लोक सर्व धर्म समभाव वगैरे नस्तात. आहे ते पण यायचे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 09/15/2014 - 18:17 नवीन
मग जरा बाजुला बसवु...मार्केट वाढेल की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/04/2014 - 13:44 नवीन
हा सेफ मार्ग आहे. इन्वेस्टमेंट फार नाही. आणि आपले सगळे भाई कसे एका हाकेसरशी मदतीला येतात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ज
जेपी Tue, 09/02/2014 - 13:35 नवीन
कोण पुढाकार घेणार आहे ते सांगा? श्याला 2 टक्के भागीदारी करीन.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 09/02/2014 - 13:56 नवीन
मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि वुमन) पावर देखील आहे. गुरुजी आहेत, हुकमी संस्कृत श्लोक-स्तोत्रं रचून देणारे आहेत, पाहिजे त्या स्केलवर उत्तम प्रसादाच्या पाकृ देऊ शकणारे बल्लव आहेत, व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, "तमक्या चौल राजाच्या शिलालेखात या मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख आहे" हे शाबीत करणारे आहेत, कमाल ष्टोर्‍या रचणारे आहेत, ग्राफिक डिज्जायनर आहेत. बोलभांड लोकांची तर ददातच नाही...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा