मंदिर काढा..
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.
अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.
अशा ष्टोर्या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.
दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)
एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
💬 प्रतिसाद
(165)
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:05
नवीन
आयला खरंच की!
सगळे सगळे आहेत. काढाच येक मंदिर आता! शिलालेखांचे नमुने देईन म्हणतो. श्लोक पाडून झाले की ब्राह्मी किंवा खरोष्ठी लिपीत कोरायची व्यवस्था करू, म्हणजे बाय डिफॉल्ट मंदिर सातवाहन काळात जाणार.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 09/02/2014 - 14:08
नवीन
ते जरा सहावाहन नायतर पाचवाहन करता येईल तर बघ ना जरा तेव्ह्ढच मंदिर जरा पुरातन वाटेल अजुन ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:12
नवीन
नाही नाही. सातवाहनच प्राचीन वाटेल.
एक प्यारलल उदा. देतो. नौवारी अगोदर, मग सहा/पाच (चूभूदेघे) वारी आली. तद्वतच अगोदर सातवाहन, मग सहा मग पाच आलं. ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 09/02/2014 - 14:17
नवीन
हो आता "नो-वारी" आलीय...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:19
नवीन
अगदी अगदी ;)
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/03/2014 - 08:31
नवीन
चुकुन प्यारे लाल असे वाचले
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/02/2014 - 14:20
नवीन
शिलालेखात सिंधू संस्कृतीची अक्षरे जास्त सोईची पडतील... त्यांचा आजपर्यंत पुरेसा अर्थ लागलेला नसल्याने "हे नक्की काय?" हे समजेपर्यंत भरपूर कथा = भरपूर माया करता येईल. किंबहूना चार नोकरदार संशोधक आपल्याला हवा असलेला अर्थ लावायला १% समभागावर ठेवता येतील... मग काय जगात सर्वात प्राचीन १०,००० वर्षांपासूनचे जागृत देवस्थान आपल्याच हाती =))
(स्वगत : मिपावर कल्पनेचे मजले रचणार्यांची कमी नाही. संमं ला त्यांची एक स्पर्धा घ्यायला सांगायला हवे. :) )
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:23
नवीन
हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) =)) =)) =))
सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेख लिहून पार फॅरो रामसेसपासून सर्वांनी मंदिराला देणगी दिल्याचे सिद्ध करता येईल =))
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 09/02/2014 - 14:29
नवीन
अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या नावाने वाँरट निघालय.
अतिअवांतर -ट्रॉय चा पुढचा भाग जुन मध्ये टाकणार होतास,अजुन आला नाय.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:35
नवीन
अवांतर- आयला मी नाय काय केलं मी नाय नाय नाय...
अतिअवांतरः अडचणी....वेळ मिळाला की टाकेन.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/02/2014 - 14:37
नवीन
सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन असा त्रैभाषिक लेखाचा प्रयोग करून पहावा असा आहे ;)
"रामसेस म्हणजे इजिप्शियन लोकांनी केलेला राम शब्दाचा अपभ्रंश आहे" हे त्या शिलालेखात सिद्ध करता येईल. "सद्याच्या थायलंडच्या राजाला नववा राम (रामा द नाईंथ) म्हणतात नाही का ? तसेच ते होते" हा सज्जड आत्ता आस्तित्वात असलेला पुरावा ठासून सांगता येईल. भाविकांना इतरांना आलेल्या (पक्षी, पसरवलेल्या) जाज्वल्य अनुभवांच्या कथांच्या पार्श्वभूमीवर पूर्व-पश्चिम, रामसेस-राम असे क्षुल्लक फरक महत्वाचे वाटत नाहीत असा अनुभव आहे. :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:40
नवीन
हाहाहा, अगदी अगदी ;)
विशेषतः प वि वर्तक आणि पु ना ओक यांची विचारमौक्तिके लावली तर अजून फेमस होण्याची ग्यारंटीच!!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/02/2014 - 15:08
नवीन
सिधम | रञो सातवाहननं सिरिसालाहणो
सव ८ हेम २ दिव १
प्रथमस भविसस महामंडलिकस्स गंडरादितस जनपदे मिरिञ्जनिहारे
गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं वथवेन गहपतिकेन वेनकुले ब्रुसस्स
मंदिरस तळकं खानितं
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 09/02/2014 - 16:20
नवीन
वा वा वा.देवाला वाल्गुदेश्वर म्हणायचे का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/02/2014 - 16:35
नवीन
खी खी खी.
गोमिकस म्हणजे म्होरक्या.
पूर्ण अर्थ.
सिद्धी असो.
सातवाहन कुळातील राजा सालाहणाच्या कारकिर्दीतीच्या ८ व्या संवत्सराच्या हेमंत ऋतूच्या दुसऱ्या पक्षाच्या प्रथम दिवशी भविष्यात होणार्या गंडरादित्याच्या मिरज प्रांताचा म्होरक्या असणार्या वाघळाच्या गोथम गावात वेन कुलातील ब्रूस याने मंदिराच्या पुढ्यातिल तलाव खोदवला आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/03/2014 - 07:30
नवीन
ॐ स्वस्ति |
सालाहणकुलोत्पन्नो राजते अश्मके नृपः |
विदर्भकुन्तलौ चापि राज्ये स्तः खलु तस्य च ||
पुणकविषये वल्लिर्नाम लोको पुरातनः |
शिल्पज्ञानी चलप्रेमी सहाय्ये तत्परो सदा ||
सातवाहनकोशो सः इति सर्वत्र ख्यातितम् |
मन्दिरं चापि मूर्तिं च खलु सूचितवान् अहो ||
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/03/2014 - 08:54
नवीन
आणि वर ज्याची संस्कृत, सातवाहनी आणि मराठी भाषांतरे आहेत तो केवळ माझ्याकडेच्च्च असलेला मूळ खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा शिलालेख...

- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/03/2014 - 08:59
नवीन
पाय लागू सरजी... _/\_
हडप्पा संस्कृतीच्या तिसर्या, चौथ्या अगर नवव्या शतकातला असावा असे अनुमान तूर्त वर्तवण्यात येत आहे. ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/03/2014 - 09:18
नवीन
छे, छे ! हा शिललेख १०,००० वर्षांपूवी आकाशमार्गे आलेल्या देवदूतांने हराप्पाच्या मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीवर बसवला होता असे असे परवाच त्या देवदूताने मला स्वप्नात येऊन सांगीतले आणि वर तुमच्या घराच्या लाद्या बदला असेही सांगून गेला. लाद्या तश्या जुन्या झाल्या होत्याच, म्हणालो बदलूया, वो भी क्या याद करेगा. जुन्या लाद्या उचकल्या आणि काय राजे... हा शिलालेखाच समोर आला की हो एकदम (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *).
आता आठवतंय, तो देवदूत त्या कुठल्याश्या मालिकेतल्या नारदमुनीसारखा दिसत होता... तेव्हा नाही लक्षात आलं, पण आता स्पष्ट दिसतोय त्याच्या चेहरा, अंतःचक्षूंना (_/\_/\__/\_, ह्याबरोबर कपाळासमोरून हात वरखाली करणारी स्मायलीचीही कल्पना करा *).
(* आपन्तर ह्या एक्शनच्या प्रॅमात पड्लोय बाsssबा !)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/03/2014 - 09:25
नवीन
पुरातन वैदिक संस्कृतीचा अजूनेक पुरावा हाती आला की ओ!! पु ना ओकांच्या आत्म्यास शांती मिळाली असेल आता =)) =)) =)) =)) =))
बाकी इंद्रकालीन शिलालेख म्हणून 'पत्थर बाबा' नावाने नक्कीच फेमस करू शकतो. शिवाञ 'आमच्या ब्रँचेस जगभर आहेत' हेही दाखवू शकतो. कृष्णनीती, वेदवटी, इ.इ. ;)
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/04/2014 - 16:22
नवीन
वर एक्कासाहेबांनी जो मूळ खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रा शिलालेख दिलाय तो खर्रर्रर्रर्रर्ररंतर मीच आमच्या गुहेत प्रागैतिहासिक काळात रंगवून ठेवलेल्या भित्तीचित्राचे वर्णन आहे.
हे बघा!
पहा, ते डावीकडे गुहेतील घाटदार शिल्पे पाहून 'युरेका! युरेका!' करणारे वल्लीशेठ आणि उजवीकडे तो ब्रूस वेन आणि त्याचा तेव्हा उलिसाच असणारा अंगरखापण दिसतोय...
म्हणूनच आजपर्यंत ह्या हरप्पावाल्यांची लिपी वाचता आलेली नाही. भयंकर म्हणजे भयंकर अशुद्ध लिहायचे हो तेव्हापण. आणि अक्षरपण काय ती गिचमिड. स्वतः दिवसातून चारचारदा अंघोळ करीत बसायचे सार्वजनिक ठिकाणी. पण अक्षर काही सुधारणार नाहीत शिंचे. ;-)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 16:36
नवीन
तरीच ! मी हेच म्हणत होतो की अजून शास्त्रज्ञांनी (की मिपासंमंने) प्राचीन गुहांत सापडलेल्या जीवाश्मांतल्या डीएनए पासून अजून एखादी आयडी बनवण्याची आयडिया कशी नाय केली ? =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/04/2014 - 16:40
नवीन
वरच्या रांगेतले २रा आणि शेवटचा जरा जास्तच "उत्तेजीत" आहेत =))
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/04/2014 - 16:45
नवीन
ते शेपूट आहे. उत्क्रांती होत असतानाही काहीकाही जणांची शेपटं तशीच राहिली होती, याचे पुरावे. मग त्यांनी त्यांचे स्वतंत्र कंपू - आपलं टोळ्या बनवल्या आणि सुखेनैव बागडू लागले. :-))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/04/2014 - 16:58
नवीन
_/|\_
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/04/2014 - 17:38
नवीन
अगागागागा =))
पार अश्मयुगात पोचलात की रे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 17:50
नवीन
इतका गंभीर धागा आणि त्यावर हे असे अवांतर पाहून एक मिपाकर म्हणून आज शरम वगैरे वाटली.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/04/2014 - 19:56
नवीन
बाकी शरम वगैरें वाटण्यासाठी आधीं मिंपाकर वैग्रें व्हायला लागतें असें पितळ्यांच्या दुकानात रांगेत हुभे असतानां कानांवर पडलें काल! आमच्या अश्मयुगात असें काहीं नव्हतें हों. कलयुग आहें कलयुग तुम्हांला सांगतों बघा.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 20:05
नवीन
बरोबरे तं मं. वाटलंच अश्मयुगाच्या गोष्टी करताय म्हणजे पुण्यपत्तनातले पेठीय दिसताँय. तेव्हाचे नमुने अजून आहेत तिथे.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/04/2014 - 20:15
नवीन
तेव्हासुद्धा शाखा कुठेच नसायच्या आणि तांब्यापितळेची भांडीसुद्धा रांगेत उभी राहूनच घ्यायला लागायची माहितीये का! ;-)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 17:26
नवीन
मला वाटलं ते आईस बकेट च्यालेन्ज वगैरे काही सुरु आहे की काय!
बादली डोक्यावर घेण्याची अॅक्शन आहे की नै!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/04/2014 - 19:59
नवीन
फक्त तेव्हा अंगावर बाल्दी ओतून हाः हूः हॅः हहहोः असे हुडहुडून झाल्यावर लगेच "कोण होता रे तो च्यालेंज करणारा मला?" अशी डरकाळी फोडून हातात धनुष्यबाण घेऊन च्यालेंजरच्या मागे लागत असत. ते पहा, ते खाली दिसतंय बघा.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 09/02/2014 - 14:23
नवीन
म्हणजे वल्लीच्या काळात ना ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/02/2014 - 14:25
नवीन
ऊप्स... वल्लीच्याच काळात म्हणायचे होते पण ते असं होतं बगा.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/02/2014 - 14:41
नवीन
वल्ली एवढा जुना आहे?????? ;)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 09/02/2014 - 14:20
नवीन
छ्या! मनाबिनाचा विचार नै करायचा! तो केला की निम्मी कामं रखडतात.
मी भोळ्या भक्तिणीचा रोल करायला तयार आहे. ज्यांना भक्ताचा रोल करायचाय व भोळा भाव चेहर्यावर आणता येत नाही त्यांना अपर्णाकडून मेकपून घ्यायचं.
सानिकेकडून प्रसादाची रेशिपी मिळेल. मृणालिनीला प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. उदा. प्रसादाची उकड इन कुकी कप विथ अ डॉलप ऑफ बटर. माझ्याकडील आजोसासूबाईंची पितळ्याची मोठी समई जमिनीत पुरण्यापासून ते पुन्हा जमिनीतून काढेपर्यंत मी देईन. त्याची काळजी करू नका. काही मिपाकरणी मस्त कपडे शिवतात. त्यांना देवळाबाहेर बसणार्या साधूंचे भगवे कपडे शिवण्यास सांगावे. बघता बघता मंदीर मोठे होईल.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 09/02/2014 - 14:56
नवीन
मीपावर मला संपादक मनुशान घेत नाय.किमान मिपामंदिरात विश्वस्त मनुन घ्या.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 09/02/2014 - 15:16
नवीन
नक्कीच! विश्वस्तांना व्हॉलंटीअर वर्क म्हणून रुद्राक्ष माळा (एका मिपाकारांच्या प्ल्याष्टीकच्या कारखान्यात तयार केलेल्या) घालून अठवड्याला किमान ३ तास भजन करायला लागेल. वर्क अवर्स फ्लेक्सीबल आहेत.
भजनाच्या चाली य शिनेमाच्या गाण्यावरून तयार केलेल्या असतील. काही मिपाकवींना भजने पाडण्यासाठी बशीवले आहे. नुकतेच तयार होऊन आलेल्या भजनाच्या दोन ओळी ऐकवते.
चाल: टू स्टेटस शिनेमातील इसकी उसकी गाणे. गणपतीचे भजन.
शिवजी का पुत्तर, है नाम लंबोदर,
दुष्टांना देतो, मार लै लै,
हे गाताना हसू आल्यास कामाच्या वेळात १५ मिनिटांनी वाढ केली जाईल. हसू न येण्यासाठी वर्कशॉप्स वेळोवेळी घेतली जातात त्यांना हजेरी लावणे बंधनकारक नसले तरी कामाच्या दृष्टीने उपकारक आहे.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 09/02/2014 - 15:26
नवीन
अजून एकः
चढ गया उपर रे
प्रसादमें उकडीका मोदक रे
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Wed, 09/03/2014 - 16:33
नवीन
=)) देवा !!
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 09/03/2014 - 19:01
नवीन
बघा हं, इथल्या प्रसाद आणि मोदकांना राग यायचा तुमचा. ;-)
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Tue, 09/02/2014 - 15:27
नवीन
रेवती, मी काय करु..? अंगात आणवून सांगु का की देवी म्हणतेय मला वर काढा...हां, आता डोईवरचे केस थोडे वाढवावे लागतिल.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/02/2014 - 15:37
नवीन
हे बघा, अभ्यास वाढवा.
अंगात येणारी स्थानं असतील तर तुम्हाला हायक्लास, आयटी आणि श्रीमंत परप्रांतीय ह्यांना मुकावं लागेल.
दे डोण्ट अटेण्ड सच प्लेसेस यु सी. दॅट्स सो ग्रोस.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/03/2014 - 18:19
नवीन
मग आपण मा-देवीला कडेवर घेणे वगैरेसारखे यकदम मॉर्डण प्रकार आरेंज क्रू ना ! ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/03/2014 - 18:31
नवीन
आता मला अभ्यास वाढवायची गरज आहे. ;)
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
गुरुवार, 09/04/2014 - 23:21
नवीन
ग्रेट..!! मला तो 'तोते, तोते..' चा डान्स पण येतो... *DANCE*
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 09/02/2014 - 15:47
नवीन
एकतर तुम्हाला नाव बदलावे लागेल स्वराताई!
नाव, जे अम्मा, माता, देवी याला जोडल्याल भक्तीरसात बुडवून वाळवायला घातल्यासारखे वाटेल ते चालेल. किटीपार्टीजमध्ये आपल्याला हल्ली दृष्टांत होतो, अध्यात्मिक विचार वगैरे बोलून दाखवावे. त्याने वातावरण निर्मीती होते. आपल्या घरच्या किटीपार्टीत फक्त फळांचे तुकडे, वेगळाली ज्युसेस हाच आहार ठेवावा. इथपर्यंत पोहोचलात की आपण कतारमधील एका हाटेलात पुढील चर्चेला भेटू.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/03/2014 - 18:18
नवीन
हायला ! रेवती तैंची ऑलरेडी सीईओ म्हणून नेमणू़क झालेली दिसतेय ! ;)
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 09/03/2014 - 18:24
नवीन
होय तर! या प्रॉजेक्टात पदे पटकन भरली जातात. एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. ;)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 09/04/2014 - 07:47
नवीन
एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते.
आणी त्याबरोबरच आपल्या साथीदाराला असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आणतापण येते नी मग जबर्दस्त लॉबी पण बनवता येते ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »