मिस यू बाप्पा ...
आज तुझ्या मूर्तीच आम्ही विसर्जन केल ..अगदी मिरवणूक काढली ,फटाके फोडले,मंत्रजागर केला ,जागरणाची रोजची सवय लावलीस तू ,बघ ना देवा ,आज झोप पण येत नाहीये,खर तर दरसाल आम्ही तुझा उत्सव साजरा करतो, तुझ्या दर्शनाला येणारे अनेक लोक नवस करतात, एवढी वर्ष मलापण काही न काही हव असायचं,आणि मी मागायचो तुझ्याकडे,पण यंदा मी काहीच नाही मागितल आणि हे मला आता आठवलं..उगाच छान छान वाटत ...मी तुझ्याकडे काहीच मागितल नाही आणि तू मला छान छान असं काहीतरी अदृश देऊन टाकलस....भारीच आहेस हा तू...पण ज्यांनी ज्यांनी मागितलंय त्यांना दे रे ...फारच उदास करतोस रे तू जाताना...हल्ली तुझ्या मूर्तींचे किनाऱ्यावरचे अस्ताव्यस्त पडलेले असतानाचे फोटो पाहून अजूनच उदास व्हायला होत...लवकर त्याचा फैसला लाऊन टाक ...आरास पण एको फ्रेंडली वगैरे करायची बुद्धी दे...ज्यांना ज्यांना या उत्सवाचा त्रास होतो तो होऊ नको देऊस..असा उत्सव साजरा करायची बुद्धी दे आम्हा सगळ्यांना...कारण मला तू हवा आहेस रे बाप्पा....माझ्या मनातून कधीच दूर नको जाउस ....
💬 प्रतिसाद
(3)
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 09/08/2014 - 06:59
नवीन
परि तू जागा चुकलासी....
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
गुरुवार, 09/18/2014 - 16:41
नवीन
फारच मुक्तपणे लिहिलंय बुवा तुम्ही.
तरी आवडलं....
- Log in or register to post comments
फ
फुंटी
गुरुवार, 09/18/2014 - 18:37
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments