Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंदिर.....

म
मुक्त विहारि
गुरुवार, 09/04/2014 - 21:06
🗣 18 प्रतिसाद
"काय हो, आज जेवायचे आहे ना?" "अगं.थांब जरा.तिथे कं. ईंटरनेट ब्लॉक करते म्हणून कुठे जाता येत नाही.अन इथे तू.एक-दोन चार तासांचाच काय तो उशीर झाला आणि व्य.नि.ला उत्तर वेळेवर न दिल्याने घोळ झाला.आता परत तसे नको व्हायला." "अहो.तिथे तुम्ही न जेवता, त्या वेळात बघताच ना?मग आता इथे तरी शांत पणे जेवा." "तुझे म्हणणे बरोबर आहे.पण अज्जुन माझे "थायलंड" पुर्ण झाले नाही.निदान ते तरी पुर्ण बघू दे.म्हणजे मग मी उद्या "पेरूला" जायला मोकळा." "तुमचे आपले हे नेहमीचेच.अहो, मी काय म्हणते, थोडे खावून तर घ्या.बघा तरी हा "तवा पुलाव" कसा झाला आहे?" "अगं, मघाशी तू करत होतीस तेंव्हा नुसत्या वासानेच पोट भरले.शिवाय अद्याप तो सकाळचा "मटण कलिया" तर पचू दे.शिवाय परत तू, मी नको-नको म्हणत असतांना देखील चार-पाच चुरम्याचे लाडू खायला घालतलेस की." "पण मी म्हणते, इतके काय ते मेले वाचायचे? मी तर मोजींच्या लेखावरचे प्रतिसाद वाचते आणि मनसोक्त हसून बंद करते." "ओके.आज तू मंदिरात गेली होतीस का?" "हो तर.मी रोजच जाते.एक दहा मिनिटे ध्यान लावून बसले की एक्दम मस्त वाटते.का हो?" "मग मी पण आत्ता मंदिरातच बसलोय, ध्यान लावून.माझे वाचून संपले की येतोच जेवायला." "आग लागो या सवतेला" असे तणतणत बायको जाते. नवरा आपला परत मंदिरात शिरतो. =============================================================================== मित्रांनो, तुमचे पण ह्या "मिपा" नावाच्या मंदिरात स्वागत आहे.फक्त त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.इथे व्यक्तीगत असे काहीच नसते, पण दोषांना मात्र इथे थारा नाही.त्यामुळे निर्मळ मनाने आणि गर्व बाजूला ठेवून या.थोड्या फार चापट्या पण बसतीलच, पण त्या बसल्याशिवाय मंदिरातले देव दिसत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
4988 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 21:27 नवीन
चिमटेखोर लेख आवडला =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 09/05/2014 - 04:48 नवीन
मुविकाका रॉक्स \m/
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 09/05/2014 - 05:22 नवीन
हाहाहाहा बाकी दिलेल्या उपमा बदलून थोड्याफार फरकाने इतरांच्या घरीही असे संवाद/वाद घडत असणार.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/05/2014 - 05:42 नवीन
सकाळ संध्याकाळ मिसळ्पाव खातेस, 'अजीर्ण होईल', असे ऐकावे लागते..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 09/05/2014 - 05:50 नवीन
फक्त त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.
+१११११
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Fri, 09/05/2014 - 15:36 नवीन
तसले पब्लिक इथे फार नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Fri, 09/05/2014 - 06:08 नवीन
मस्तच लेखन. अवांतर-बराच वेळ आहे मोकळा? :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 09/05/2014 - 06:15 नवीन
स्फूट आवडले. या सवतीबाबत नेमकेपणाने ठाऊक झाल्यावर 'सवत माझी लाडकी' अशी परिस्थिती बहुतेक घरांत निर्माण होत असावी असा विश्वास वाटतो. बाकी मिपावर पडिक असणारे अविवाहित पण 'एकटे नसणारे' यांच्या कौशल्याला दाद द्यायलाच हवी :-).
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 09/05/2014 - 06:16 नवीन
मस्ताड
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Fri, 09/05/2014 - 06:18 नवीन
सकाळच्या कांदापोह्यांच्या फोडणीची तडतडच जणू...मजा आली.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 09/05/2014 - 08:05 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 09/05/2014 - 08:11 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 09/05/2014 - 08:15 नवीन
घरोघरी मिपाच्या चुली
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/05/2014 - 09:28 नवीन
हा हा आणि धरलं तर चावतंय सोडलं तर पुरोहिताचं भूत मानगुटीवर बसतंय. आमच्याकडे हेच चालायचं पूर्वी.आता दावणगिरीची कृती मिळाल्यापासून विनातक्रार मिपावाचन करायला आणि गिळायला मिळतंय.नवीन हिट पाककृतीची विचारणा असते.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 09/05/2014 - 09:36 नवीन
मंदिरातच आलो आहोत तर, लेखनप्रतिभा रुपी देवीस आमचा नमस्कार. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/05/2014 - 11:04 नवीन
त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.
अगदी अगदी !
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Fri, 09/05/2014 - 15:34 नवीन
मस्त लिहीलय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 09/05/2014 - 20:27 नवीन
प्रतिसाद देणार्‍यांचे आभार...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा