Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता समजुन घेतांना- भाग १

ग
गुल-फिशानी
Sat, 09/06/2014 - 20:07
🗣 3 प्रतिसाद
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत. पण ती फ़ीलींग कडुन थींकींग कडे नकळत सरकु लागली. मग मात्र ठरवल आपण समीक्षा वाचायची पुर्ण बंद करायची कुठलीही कविता अनकंडीशनल अनप्रीज्युडाइज्ड होउन वाचायची. आणि मग केवळ आपला स्वत: चा विचार त्यावर करुन बघायचा. अर्थात पुर्ण स्वतंत्र विचार करण कधीच शक्य नाही शेअरींग हवीच पण अगोदर तरी आपण बेसिक विचार करुन बघण्याचा प्रयत्न केला तर एकुण आकलन वाढण्यास मदतच होते. व ते एका अर्थी चांगलच आहे. मला आता एक फ़ार तीव्रतेने जाणवते की कुठल्याही कविता च नाही गोष्टीवर आपण स्वत: मुळातुन आपली जी काय पातळी असेल त्यावरुन जर प्रामाणिक चिंतन केल वा शेअरींग व चर्चा केली तर त्यानंतर जी क्लॅरीटी येते ती. आपल्याला वाचनाचा आनंद अनुभव अनेकपटीने वाढवुन देते. आपल्या आकलनाशी जितके आपण प्रामाणिक राहतो स्वत: चा ओरीजनल विचार वा चिंतन जितक आपण करतो तितक कलाकृती आपल्यासमोर छान उलगडायला लागते तर कविता कवि व चांगली कविता आणि तीची प्रोसेस या विषयी मला जे काय वाटतं ते मी समीक्षा निरपेक्षतेने म्हणजे (कींवा मला काय वाटते पटते उमजते असे ) मांडण्याचा प्रयत्न करतो. विचार विस्कळीत च आहेत. पण हेतु असा आहे की तुमच्या बरोबर शेअर करता करता माझ्या विचारांमध्ये क्लॅरीटी येइल आणि त्याहुन महत्वाच म्हणजे तुमच्या विचारांतुन नविन काही मला मिळेल. कारण इथे बहुधा व्यावसायिक समीक्षक नसतीलच. तर रसिकच बहुतांशी आहेत, अशा रसिकांचे विचार वाचायला जाणुन घ्यायला फ़ार आवडेल. तर कुठल्याही भाषेतील कविता म्हणजे नेमकी काय असते ? तर जो कवि म्हणुन माणुस असतो तो त्या विशिष्ट भाषेतील शब्द घेउन ( आता कविचा आपल्या भाषेतील शब्दसंग्रह नॉर्मल माणसापेक्षा संख्येने मोठा असावाच लागतो अगदीच प्राथमिक गरज कवि होण्याची ) म्हणजे शांतता आपल्यासाठी फ़क्त शांतता असेल मात्र कवि साठी ती निरव वा भयाण सिच्युएशन प्रमाणे असेल. वा तो वापरेल. अजुन एक म्हणजे कवि नेहमी शब्दाचा रुढ अर्थ च वापरेल असे नाही. किंवा तो रुढ अर्थ टाळण्याचाच अधिक प्रयत्न चांगल्या कवितेत करेल. कधी कधी अगदी साधा शब्द घेउन त्याला अगदी युनिक ट्रीटमेंट देउन आपल म्हणण मांडेल. उदा. अरुण कोलटकर आपल्या परंपरा कवितेच्या शेवटी परंपरा हा शब्द अनेक वेळा रीपीट करुन जवळपास पानभर मांडुन जसे ( प्रंप्रंप्रंप्रं परंपरं जशी लहान मुल एखादा शब्द तोंडात कधी कधी घोळवतात) करुन त्यांना अपेक्षीत असलेले परंपरा कशी निरर्थक रीपीटेशन असते माइंडलेस असते हा मुद्दा ते छान जोरकसपणे वाचकाच्या मनावर ठसवतात. तेव्हा तो परंपरा असा साधा शब्द च असतो पण कविच्या हातात लागल्यावर तो त्याला पुर्ण फ़िरवुनच टाकतो. आणखी एक म्हणजे कवि प्रतिकं वापरतो. म्हणजे एखादी गोष्ट तो सरळ नाही सांगणार की अशी अशी घटना घडली. तो अस वास्तव जसच्या तस कधी नाही मांडत. तस जर मांडणच पुरेस असत तर वर्तमानपत्रे जशी एखादी घटना वास्तव सरळ सोट मांडतात तेच ग्रेट साहीत्य झाल असत. पण सुदैवाने वर्तमान पत्र वा बातम्या हे काही ग्रेट साहीत्य मानल जात नाही व ते असतही नाही. जरी कीतीही वास्तव वा सत्य ते मांडत असले तरीही. चांगल्या कवितेने नेहमी सत्य वा वास्तव च मांडल पाहीजे हा आग्रह चुकीचा वाटतो. तर मग कवि एखाद वास्तव मांडतो त्यात वेगळ काहीतरी असत ते नेमक काय असत. तर तो ते वास्तव थोड तिरप करुन मांडतो. थोडा. इनडायरेक्टली थोड सुचवतो म्हणजे हिंट दिल्यासारख तुम्हाला थोड कामाला लावतो. तर तो शब्दांच सिलेक्शन करतो त्यांना एक सुंदर रीतीने अरेंज करतो. आणि जनरली नेहमीच नाही एक सिम्बॉलिकली तेच वास्तव प्रेझेंट करतो. आता काही सिम्बॉल्स अनेक वेळा अनेक कविंकडुन वापरले गेल्याने घासुन घासुन त्यांची धार पार बोथट होउन जाते. हा गुळगुळीत प्रतिकांचा अनुभव उर्दु शेरो शायरी त सतत येतो. शमा-परवाना, रकीब महफ़िल साकी इ. पण परत कुठलेही ठोस विधान कवितेविषयी करता येत नाही. पार गुळगुळीत झालेल प्रतिकं उदा. शमा जर एखाद्या गालिब च्या हातात आल तर तो त्याच सोनं करुन टाकतो. ( शमॉ हर रंग मे जलती है सहेर होने तक ) असच एक खलिल जिब्रान च कोट आहे ज्यात तो म्हणतो ज्या माणसाने सर्वप्रथम आपल्या प्रेयसीच्या ओठाला गुलाबाच्या पाकळी ची उपमा दिली तो खरच महान कवि होता त्या नंतर ती रीपीट करणारे सगळे बिनडोक आहेत अस काहीतरी तो म्हणतो.तर यात आता फ़रक कसा करावा एक न्युजरीडर वा बातमीदार जे वास्तव मांडतो व कवि जे कवितेच्या माध्यमातुन तेच वास्तव मांडतो त्यात फ़रक असतो. तो थोडा असा असतो की दोघे जरी समान वास्तव मांडत असले तरी कविच्या मांडणी त त्याची पर्सनल कॉमेंट देखील असते. त्याची टीप्पणी व्हॉट ही फ़ील्स अबाउट इट इन्टेन्सली हे असत. आता हा चांगल्या कवितेचा आणखी एक घटक वा कविचा म्हणुया ही इज इन्टेन्स अबाउट व्हॉट ही वॉन्ट्स टु एक्स्प्रेस म्हणजे आग्रही या अर्थाने नव्हे वा फ़ार शोरशराबाच करुन नव्हे. एखादा तर अगदी उदास अगदी रेलक्टंट ही असेल काही सांगण्याविषयी पण पण त्यात ही अगदी त्या सांगण्या व्यक्त होण्याप्रतीच्या उदासीनतेतही एक इन्टेसीटी डेफ़ीनेटली असते. जसे. विलास सारंग यांच्या कवितेत कमालीचा अलिप्तभाव असतो पण त्यात ठासुन भरलेली इन्टेसीटी शब्दाशब्दांमधुन जाणवत असते. त्यांची निरुद्देशिका नावाची सुंदर कविता या संदर्भात वाचण्यासारखी आहे. आणखी एक चांगला कवि हा जीवन इनफ़ भोगलेला हवा वा तो तसा असतो यात वयाचा संबंध नाही काहींना अगदी लहान वयातही प्रचंड जीवनानुभव येतो. वा मोजकेच अनुभव ही असतील व तरी ते एखादा कवि त्यातील एखादाच अनुभव ही छान व्यक्त करु शकतो. तस कवितेच्या बाबतीत खर म्हणजे कुठलेच ठोस विधान करता येत नाही. वा एखाद्या फ़िजीकल सायन्स प्रमाणे नियम लावता येत नाहीत. पण तरी कुठे न कुठे समजण्याच्या प्रयत्नात जनरलाय्जेशन टाळता येत नाही. त्या मर्यादेत वरील विधान घ्यावे की चांगला कवि हा जीवन इनफ़ भोगलेला असतो. मग या अनेक अनुभवातुन त्याला “ भिडलेला “ अनुभव तो विशिष्ट शब्द विशीष्ट रीतीने विशीष्ट प्रतिकांतुन आणि विशीष्ट शैलीतुन व्यक्त करतो. तो अनुभव जितका युनिक असेल तितका तो अनुभव जितका तीव्र असेल तितका तो व्यक्त करण्याची शैली जितकी युनिक असेल तितकी त्या प्रमाणात ती कविता मनाला भिडते. कवि हा तसा मॅन ऑफ़ फ़्यु वर्ड्स असतो. म्हणजे बघा तो अगदी थोडक्यात अगदी कमीत कमी शब्दात आपल म्हणण पोहोचवतो. हे म्हणजे इतर फ़ॉर्म च्या तुलनेत म्हणतोय. म्हणजे बघा एखाद्या पुरग्रस्त भागावर तेथील लोकांच्या लढाउ वृत्तीवर एखादा दिर्घ लेख वा रीपोर्ट लिहीता येउ शकतो वा एखादी कथा किंवा कादंबरी ही होउ शकते. पण एखादा कुसुमाग्रज अगदी थोड्या शब्दात तेथील लोकांच स्पीरीट पकडु शकतो ( पाठीवर हात ठेउन फ़क्त लढ म्हणा ) अर्थात मला कवितेची यात एक मर्यादाही जाणवते कविता म्हणजे कविने एखादी गोष्ट मोजकाच अनुभव हायलाइट केलेला असतो म्हणजे कादंबरी जसा विस्तृत अनुभव कवेत घेउ शकते ( तिच्या अंगभुत अवकाशा मुळे ) तसे कवितेच्या बाबतीत होत नाही. जास्त ताणली तर मग कविता आपला इम्पॅक्ट घालवुन बसते. म्हणजे कविता एकेक अनुभव वा मोठ्या अनुभवाचा एखादा कंगोरा वा तुकडा हायलाइट करते. जस एखाद जंगल आहे रात्रीचा गडद काळोख आहे. तर कवि आपल्या चॉइस ने आपल्या प्रतिभेचा सर्चलाइट टाकुन एखादीच गोष्ट एखादाच प्राणी पक्षी वा झाड वा फ़ुल आपल्या प्रतिभाप्रकाशझोतात उजळवुन टाकत असतो.मग ते रसिकानेही तेवढ्याच संदर्भात घ्यायला हवं नाहीतर मग त्यांना हे कुठे माहीत आहे ते कुठे माहीत आहे अशी विनाकारण कुरकुर सुरु होते. आणि मला एक वाटते की कुठलीही कविता अगदी कीतीही रुक्ष जरी भासत असली अगदी पराकोटीच्या उदासिनतेने अलिप्ततेने व्यक्त होत असली तरी ती इमोशनल असतेच असते. तीचा जन्म हा इमोशन्स मध्येच होतच असतो व अपीलही इमोशनल च असते. चांगली कविता अभावनिक असु शकत नाही. उदा. रेग्यांची ही ड्राय कविता बघा ( शेवटी सर्व वस्तुमात्र पुसुन टाकल तरी शेवटी हात उरलेच नि हातातलं हे फ़डकं ! ) कीती इन्टेन्स इमोशन्स आहेत यात. चांगला कवि हा इमानदार असण फ़ार महत्वाच असत. म्हणजे प्रत्येक पातळीवर हे इमान जर तो पाळु शकला जस अनुभव घेतांना तो मांडतांना त्याने कुठल्याही कविताबाह्य हेतुने तो प्रभावित व्हावयास नको. आपल्या कवितेशी तो डॅम ऑनेस्ट असलाच पाहीजे. म्हणजे त्याच कवितेतुन व्यक्त होण ही त्याची खरीखुरी आंतरीक गरज असली पाहीजे.मुव्हींग फ़िंगर्स राइट अस व्हायला हवं आता व्यक्त झालो नाही तर गुदमरुन जाउ अस वाटल पाहीजे मात्र जर तो इतर हेतुंनी वा प्रभावांनी प्रेरीत होउन लिहीत असेल तर चांगली कविता निपजणे अवघड होउन बसते.अस का होत तर समजा तो इम्प्रेस करण्यासाठी वा पैशासाठी लिहत असेल वा आणखी अशा कारणासाठी तर मग तो त्याला आलेल्या जिवंत अनुभवा ला न्याय देणार नाही तो प्रेशर फ़्रॉम आउटसाइड हीज सोल खाली येइल. मग तो इम्प्रेस करण्यासाठी लिहिणार एक्सप्रेस करण्यासाठी नाही. यात त्याचा मुळ अनुभव तो डागाळुन टाकण्याची शक्यता वाढेल. तो अनुभव मग तो मागणी प्रमाणे मॉडीफ़ाय करण्याची शक्यता वाढेल. जस एखादा विनोदी अभिनेता अनेक टाळ्या मिळवल्यानंतर हॅबिच्युअली मॅनरीझम्स प्रतिसादाच्या अपेक्षेच्या दबावात करत जातो तसे होते. दबाव कविवर नकोच नको. इन्फ़ॅक्ट कुठलीही चांगली कला ही स्वान्तसुखाय च परस्यु होत असेल तर च तिची क्वालिटी टिकुन राहते. आणि कविता मुळात इमोशन्स चा च मामला असल्याने जर या बाहेरील भावना हावी झाल्या तर तो सिलेक्टीव्हली वा डीसऑनेस्टली च व्यक्त होणार. तो शो करणार त्यात कॅल्क्युलेशन्स येतील. उदा पाडगावकर जेव्हा एक जिप्सी आहे माझ्या मनात दडुन म्हणतात तेव्हा आणि लिज्जत पापड साठी गाण लिहीता तेव्हा एक फ़रक पडत जातो. एक क्वालिटी कुठेतरी डॅमेज होत जाते. अशावेळी मग पुर्वपुण्याइ व क्राफ़्ट्समनशिप कामी येते. याची अजुन एक बाजु देखील आहे. राजेंद्र यादव त्यांच्या एका अप्रतिम कांदबरीत ( नाव आठवत नाही ) जिचा सारांश असा आहे की कुठलाही कवि वा लेखक जो स्वत:च्या सर्जनशीलतेशी एकनिष्ठ असतो त्याच्यासाठी कुठलाही अनुभव हा सेंकंडरी होउन जात असतो.म्हणजे अस की त्याच्यासाठी प्रत्येक अनुभव नकळतपणे ( नेणीवेच्या पातळीवर ) स्वत:च्या कलेतुन व्यक्त होण्यासाठीचे रॉ-मटेरीयल होउन जात असते. त्याने निर्माण होणारी आत्मवंचना व वेदना ही त्या कादंबरीत अप्रतिम रीतीने दर्शवलेली आहे. म्हणजे एक माणुस म्हणुन अनुभव त्याच्यासाठी नितळ कोरा राहत नाही कविची मुद्रा त्याला डागाळुन टाकते. उष्ट करुन टाकते. त्यामुळे कवितील माणुस कोरडाच राहुन जातो. असे काहीसे त्यात होते. क्राफ़्ट्समनशिप कारागिरी वा तंत्रावर पकड असणे ही पण एक आवश्यक बाब च आहे. पण मला वाटत चांगल्या कविच्या बाबतीत जस त्याच व्यक्त होण हे अतिशय नैसर्गिक असत तस च क्राफ़्ट्समनशिप जरी त्याने अर्न केलेली असली तरी तिचा वापर हा त्याच्या हातन नैसर्गिकरीत्या होत असतो. म्हणजे गरजेप्रमाणे त्याची कारागिरी त्याला कामी येत असते. आज अमुक एका वृत्तात वा मीटरमध्ये कविता बसवुनच टाकतो अशा जिद्दीने चांगला कवि दिवसाची सुरुवात करत नाही. मात्र दिवसाअखेर त्याच्या कवितेसारखच त्याला तिला अनुरुप असलेलं वृत्त वा छंद त्याला गवसतोच. कविता ही त्या त्या भाषेचं तिच्या सौंदर्याच सेलिब्रेशन असतं चांगली कविता ही आपल्या भाषेचा सर्वात सुंदर अविष्कार करत असते. कविता ही त्या त्या भाषेची सर्वात सुंदर अभिव्यक्ती असते. वा भाषेचा सर्वात सुंदर वापर कवितेत होत असतो. कवितेतुन भाषा हायएस्ट पॉसिबल कम्युनिकेशन करत असते. कविची नजर ताजी असते. चांगली कविता नेहमी फ़्रेश असते. आजपावेतो पेक्षा वेगळा अनुभव वा दृष्टीकोण एखाद्या घटने भावने कडे बघण्याचा कविता देत असते. चांगली कविता अर्थातच इफ़ेक्टीव असतेच असते. म्हणजे असे की मुलभुत मानवी भावना भय आनंद लज्जा इ. या सर्वांतच असतात. प्रत्येक माणसाच्या नेणीवेत अनेक भाव भावना खोलवर दडुन बसलेल्या असतात. प्रत्येक जण एक लाइफ़ इनसाइड लाइफ़ कॅरी करतच असतो. कधी कधी होत काय की कवि त्याच्या कवितेतुन सरळ वाचणारयाच्या आदिम भाव भावनांना वृत्तींना च हात घालतो. आवाहन करतो हलवुन सोडतो. यातली गंमत म्हणजे काही कवितांचा अर्थ अजिबात कळत नाही पण परीणाम त्या अगदी खोलवर करतात. आपल्या अगदी आतील अंतर्मन कविच्या शब्दांना अशावेळी प्रतिसाद देत असत तेही स्व च्या नकळतपणे. आदिम भयाची भावना जागवणारी ही सिल्व्हीया प्लाथ ची ही कविता बघा.

प्रतिक्रिया द्या
3606 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2014 - 07:16 नवीन
आपल्याला आवडलेली कविता लेखनात टाका म्हणजे ती का वेगळी वाटली, वाटते ते आम्हा वाचकांनाही समजेल. पुलेशु. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/07/2014 - 07:47 नवीन
लेख खूप विचार करून लिहिला आहे हे जाणवले. तुमच्या आवडीच्या कवितांचे थोडक्यात रसग्रहण केले असते तर लेख अजून छान झाला असता.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/08/2014 - 08:39 नवीन
शान्ताबाई शेळ्के यान्चि "पैठ्णी " वाच्ल्यावर नेहमी आजीची आठवण येते !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा