Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सायकलींग... (भाग १)

म
मोदक
Tue, 09/09/2014 - 18:12
💬 72
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली. या दरम्यानच एकदा सायकलींग सुरू करावे असा विचार डोक्यात आला. काही मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर "उत्साहात सायकलींग सुरू करणारे पुढे कितपत नियमीत सायकलींग करतात हा विचार कर." असा सल्ला सगळीकडून मिळाला (थोडक्यात म्हणजे, "तुझे हे वेड किती दिवस टिकेल सांगता येत नाही..!!") सायकलींग करायचे म्हणजे नक्की काय करायचे हे मलाही नेमके स्पष्ट नव्हते. सायकल चालवायची, ओके. पण कुठे..? किती लांब चालवणे शक्य होईल..? सायकल कोणती घ्यावी? कोणत्या प्रकारची घ्यावी? वगैरे प्रश्नही होतेच. माहिती काढण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक ठिकाणच्या अनेक सल्ल्यांमुळे गोंधळ आणखी वाढला. शेवटी या मुद्द्यावर आणखी जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम एक सायकल विकत घेवून चालवायला सुरू करू आणि बाकीचे नंतर बघू असा विचार केला व सायकल विकत घेण्याच्या दृष्टीने शोधाशोध सुरू केली. अनेक शोरूम्स आणि दुकानांना भेट दिल्यानंतर "फँटम सी रॉक" हे मॉडेल पसंत पडले. आता ही सायकल विकत घ्यायची असे ठरल्यानंतर दिलीप या मित्राने या पूर्वीही मिळालेला सल्ला आणखी एकदा दिला, "आधी एक सेकंड हँड सायकल घे.. चालव आणि जर नियमीत सायकलींग केलेस तरच नवीन घे." आता सेकंड हँड सायकल कुठून आणायची असा प्रश्न उभा राहण्याआधीच त्याने त्याची स्वत:ची माळ्यावर पडलेली सायकल दाखवली व आपण दुरुस्त करून घेवू अशीही ऑफर दिली. त्या सायकलचे प्रथमदर्शन फारसे उत्साहवर्धक नव्हते. सायकल अक्षरश: धूळ खात पडली होती. लहान टायर साईझ (२४"), गिअर्स नाहीत आणि सीटही नाही..! पण त्या सायकलवर दिलीपने १९९० साली (होय १९९० साली..!!) चिंचवड ते गोवा ट्रीप केली होती. __/\__ दुरुस्त करून घेतल्यानंतर ही सायकल अशी चकाचक झाली. . उत्साहात सायकल हातात घेतल्यानंतर पहिली राईड केली - चिंचवड ते धायरी. (सायकल घरी आणण्यासाठी!) त्यानंतर नियमीतपणे या सायकलने खडकवासला मार्गे डोणजे किंवा डेक्कन, विकांतादरम्यान जास्त भटकणे, नियमीतपणे अंतर वाढवणे असे सुरू केले. ट्रेकींगसह बाकी सर्व उद्योगांना विश्रांती दिली व आठवड्यातून किमान दोन / तीनदा २० ते ३० किमी अंतर कापणे सुरू केले. ही सायकल चालवताना अनेक गोष्टी लक्षात आल्या - चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या. सायकलला गिअर्स असणे गरजेचे आहे, टायर साईझ मोठा हवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सायकल वजनाला हलकी हवी, या दृष्टीने चांगल्या सायकलचा शोध सुरू झाला. या दरम्यान वैभव नामक आणखी एका मित्राची पीअरलेस कंपनीची सायकल माझ्या ताब्यात आली. सेंट्रल सस्पेंन्शन, १८ गिअर्स आणि कमी वजन वगैरे हव्या त्या गोष्टी होत्याच. पीअरलेस सायकल . या सायकलने डोणजे - अतकरवाडी (सिंहगड पायथा), कात्रज नवीन बोगद्यातून खेड शिवापूर वगैरे नवीन रूट धुंडाळणे सुरू केले. इतर माहिती काढताना आपला पिंगू सायकल चालवतो हे कळाले व त्याचे डोके खाणे सुरू केले. पहिली लांबची राईड केली ती पिंगू आणि मायबोली ग्रूपसोबत पुणे ते कामशेत. (२७ एप्रिल २०१४) पिंगू, केदार दिक्षीत, केदार जोशी, अमित, किरण ही मंडळी सोबत होती. केदार जोशी माझ्या सायकलवर बसला आणि पुढच्या क्षणाला सायकलचे नामकरण झाले होते. "र ण गा डा" :D मी त्याची बर्गमाऊंट कंपनीची सायकल चालवली आणि माझ्या सायकलचे नवीन नाव रणगाडा का आहे हे नीऽऽऽट समजले. ती सायकल एकदम हलकी होती आणि आपण जितकी शक्ती पेडलींग मध्ये लावतो तितकीच शक्ती रस्त्यावर लागू पडत होती. माझ्या सायकलप्रमाणे "पावर लास" वगैरे भानगडीच नव्हत्या, आणि गिअर्स अत्यंत स्मूथ होते. टिपीकल भाषेत सांगायची तर "मख्खन" होती ती सायकल. याउलट रणगाड्यावरून ९० किमी अंतर कापणे भरपूर थकवणारे होते. यानंतर अचानकच एकदा अमितसोबत पुणे सातारा हे ११० किमी अंतर सायकलने पार केले. सातारा राईड खर्‍या अर्थाने पहिली लांबवर केलेली राईड होती. सोबत एक बर्गमाऊंट कंपनीची हायब्रीड आणि श्नेल कंपनीची MTB अशा सायकल्स होत्या. टेललाईट पडणे, सायकल पंक्चर होणे, उन्हामुळे शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होणे, प्रचंड थकवा येणे वगैरे प्रकारांचा व्यवस्थीत अनुभव घेत आम्ही संध्याकाळी सातार्‍याला पोहोचलो. . परतताना मी एकटाच श्नेल MTB घेवून आलो. थोडे अंतर सायकल चालवत आणि थोडे अंतर एखाद्या गाडीत सायकल टाकून असे पार केले. सायकल कशी घ्यावी याहीपेक्षा कशी नसावी याचे अनेक धडे हळूहळू मिळत होते. सायकल संदर्भात आतापर्यंत मिळवलेली माहिती निरूपयोगी असल्याचे लक्षात आले होते आणि इम्पोर्टेड साईकल्सची माहिती मिळवण्यास सुरूवात केली. इम्पोर्टेड सायकलच कशाला लागते..? अरे सायकलच्या वजनाने असा किती फरक पडणार आहे..? मी सायकलमध्ये ३० / ३५ हजार रूपये घालवणार नाहीये. कशाला पण..?? - ही ठीक आहे की.. ही सगळी माझीच मते मुकाट गिळून इम्पोर्टेड सायकलचा शोध घेण्यास सुरूवात केली. गिअर्स, शिफ्टर्स, शिमानो अॅसेरा, अॅडजेस्टेबल स्टेम, वगैरे नवीन नवीन संकल्पना कानावर पडत होत्या आणि मी त्याची माहिती काढत होतो. ...शेवटी मे महिन्यात हिय्या केला व इम्पोर्टेड सायकल घेतली. मेरीडा क्रॉसवे १५. . मोठा टायर साईझ - २८", फ्रंट सस्पेंशन, सीटखाली एक सस्पेंशन, २४ गिअर्स (शिमानो अॅसेरा), वजन फक्त १३ किलो आणि चालायला एकदम स्मूथ.. एकदम मख्खन..!! या सायकलवरची पहिली राईड होती - पुणे ते महाबळेश्वर. रोहित आणि किरण - हायवेवर.. . वाई कडे.. . पसरणी घाटात - पिंगू आणि किरण . महाबळेश्वरला पो हो च लो ..!!!!! . किरण, मी, पिंगू, अमित, रोहित. पुणे महाबळेश्वर राईड ही आमच्या पुढच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा "पुणे-गणपतीपुळे" राईडची पूर्वतयारी होती. कारण पुढच्याच वीकांताला आम्ही पुणे-माणगांव-श्रीवर्धन मार्गे संपूर्ण समुद्रकिनार्‍यावरच्या रूटने गणपतीपुळे गाठणार होतो. प्रमाणाबाहेर यशस्वी झालेल्या महाबळेश्वर राईडमुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच मूडमध्ये आम्ही पुणे गणपतीपुळे राईड सुरू केली.. मात्र पहिल्याच दिवशी तीन अपघात झाल्याने आम्ही दुसर्‍या दिवशी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. पहिला अपघात अत्यंत विचित्र पद्धतीने झाला. आम्ही एका पुलावरती थांबून पराठे वगैरे खादाडी सुरू असताना किरणची सायकल वार्‍यामुळे चक्क पुलावरून खाली पडली. सुदैवाने सायकलला काहीही झाले नव्हते. . दुसरा अपघात - पिंगूचा. सायकलचा ब्रेक न लागल्याने त्याची सायकल त्याच्यासह कोसळली व दोघांनाही थोडेफार खरचटले. तिसरा अपघात माझाच झाला. ताम्हिणी घाटाचा उतार सुरू झाल्यानंतर वेगाचा अंदाज आला नाही आणि एका वळणावरती सायकल कंट्रोल न झाल्याने मी रस्त्याशेजारच्या काचा आणि दगड असलेल्या खोल खड्ड्यात सूर मारला.. . वरील ब्रेकमार्क दिसत आहेत त्या मार्गाने मी गेलो पण रस्त्याने उजवीकडे वळण घेतले होते. ;) सुदैवाने मला व सायकललाही खूप जास्त लागले नव्हते. मात्र गॉगल फुटला होता व सायकल हेल्मेटला क्रॅक गेला होता. एवढं झाल्यावर मात्र सर्वांनी माणगांव मार्गे इंदापूर गाठले व दुसर्‍या दिवशी सर्वजण पुण्याला परतलो. या अपघाताने बर्‍यापैकी शॉक बसला होता... तीनेक आठवडे पूर्ण बरे होण्यात गेले आणि पुन्हा नव्या जोमाने सायकलींग सुरू केले. सिंहगड पायथा हा आवडीचा रूट होताच. आणखीही अनेक मार्ग सायकलने पार करण्यास सुरूवात केली. पुणे-खेड शिवापूर-कोंढणपूर-सिंहगड घाट-पुणे (७० किमी) पुणे - वारजे - पानशेत - डोणजे - पुणे (७० किमी) पुणे - पानशेत - कादवे घाट - वेल्हे - पाबे घाट - डोणजे - पुणे (८० किमी) पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) एव्हाना पावसाळाही सुरू झाला होता.. वीकांत आणि अनेकदा रोजच सायकलींग सुरू होते. पावसाळ्यातले काही फटू.. कादवे घाट.. (या फटूमध्ये डावीकडे माझी सायकल दिसत आहे.. आणखी एक रायडर सापडतो आहे का..?) . कादवे खिंड . ताम्हिणी घाट . . ३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले... (क्रमशः)
  • सायकलींग (भाग २) - BRM - पुणे-पांचगणी-पुणे

Book traversal links for सायकलींग... (भाग १)

  • सायकलींग (भाग २) - BRM - पुणे-पांचगणी-पुणे ›

प्रतिक्रिया द्या
48525 वाचन

💬 प्रतिसाद (72)
भ
भिंगरी Tue, 09/09/2014 - 18:13 नवीन
वा! सायकल बहाद्दर!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 09/09/2014 - 18:24 नवीन
झक्कास. :)...
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 09/09/2014 - 18:52 नवीन
अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता. या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे. एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे. सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 09/09/2014 - 18:53 नवीन
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>> लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/10/2014 - 11:45 नवीन
:) खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत. बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते. Image removed. घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ए
एस Tue, 09/09/2014 - 19:16 नवीन
अभिनंदन. मस्त सुरुवात.
  • Log in or register to post comments
र
रवीराज Tue, 09/09/2014 - 19:52 नवीन
पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/09/2014 - 20:45 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/09/2014 - 20:57 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 09/09/2014 - 21:17 नवीन
मी आपली सायकल टांगून ठेवली आहे बॉ!! तुमच्या हिमतीला दाद देण्यास यापेक्षा जास्त वजन माझ्याकडे नाही आहे :D
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 09/09/2014 - 21:32 नवीन
मोदकभाव - वेलकम ब्याक आणि लईच भारी. पुढील भागाची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Tue, 09/09/2014 - 21:38 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 09/10/2014 - 01:31 नवीन
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे? गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे. काय एकेक थेर तरी? आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 09/10/2014 - 04:31 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ख
खटपट्या Wed, 09/10/2014 - 06:23 नवीन
हो आणि उगा तंगड वगैरे तुटलं तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
मोदक Wed, 09/10/2014 - 11:47 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
क
कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 12:11 नवीन
स्मार्टफोनवर एखादी सायकल तेसिंग गेम डाउनलोड करुन खेळायची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पैसा Wed, 09/10/2014 - 05:48 नवीन
झकास चालू आहे! कळीचा मुद्दा. वजन किती कमी केलंस?
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 09/15/2014 - 08:20 नवीन
फारसे नाही. वजन राखून आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/10/2014 - 06:05 नवीन
मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त. सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा. रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे. पैजारबुवा
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 09/10/2014 - 16:52 नवीन
कुतुहलापोटी हा प्रश्न. दिवसभर सायकल कुठे ठेवता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/11/2014 - 04:44 नवीन
ते स्वतः दिवसभर सायकलवर असतात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/13/2014 - 10:49 नवीन
नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे. बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
पिलीयन रायडर Wed, 09/10/2014 - 06:21 नवीन
खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!! खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 09/10/2014 - 06:28 नवीन
मोदकरावांचे पुन्हा एकदा स्वागत (होऊन जाऊ दया जोरदार टाळ्यांनी) :)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 09/10/2014 - 07:00 नवीन
+१ वेलकम ब्याक फोटु मस्तच पुभाप्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
न
नाखु Wed, 09/10/2014 - 11:29 नवीन
ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
मोदक Wed, 09/10/2014 - 11:56 नवीन
काकानु.... कस्काय.? :) चौरा काका कुठे आहेत..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चौकटराजा गुरुवार, 09/11/2014 - 05:25 नवीन
शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे. @ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
समीरसूर Wed, 09/10/2014 - 07:03 नवीन
आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-) बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-) आपल्याला अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 09/10/2014 - 08:46 नवीन
मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 09/10/2014 - 09:08 नवीन
वेलकम ब्याक मोदक. सायकलगाथा लय म्हणजे लयच भारी!!!! मान गये _/\_
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 09/10/2014 - 09:35 नवीन
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ... There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living. You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो. अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 09/10/2014 - 10:07 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 09/10/2014 - 10:34 नवीन
मस्त रे मोदका पुभाप्र
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 09/10/2014 - 10:38 नवीन
छान!! बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो.. या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/10/2014 - 12:14 नवीन
BRM = Brevet des Randonneurs Mondiaux. Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace. The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long. The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights ! Riders are self-reliant (they don’t have a support vehicle). A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal. Participants are called randonneurs.
आज नवीन शब्द कळला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मदनबाण Wed, 09/10/2014 - 10:41 नवीन
मादक... स्वारी स्वारी मोदक परत आला ! ;) सायकल प्रवास जबरदस्त वाटला...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 09/10/2014 - 10:48 नवीन
भारी आहेस. __/\__
  • Log in or register to post comments
न
निखळानंद Wed, 09/10/2014 - 11:11 नवीन
हे प्रेरणादायी आहे आणी कौतुकास्पदही.. ! *good*
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 09/10/2014 - 11:54 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स.. पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :) बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 09/10/2014 - 12:19 नवीन
'सायकल छंद' आवडला. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. लेख वाचून 'परत सायकलिंग सुरु करायला हवं' - असं प्रकर्षाने वाटलं!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/10/2014 - 13:09 नवीन
याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/10/2014 - 13:10 नवीन
पुभाप्र!! लवकर येऊ देत पुढला भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कवितानागेश Wed, 09/10/2014 - 14:13 नवीन
बघतंय हां मी.... :)
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/10/2014 - 18:13 नवीन
शुभेच्छा. ध्यास घेउन पाठपुरावा करत आहात. आवडले.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 01:47 नवीन
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !! Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/11/2014 - 06:34 नवीन
मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. हिकडं का तिकडं ? बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले... मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 09/11/2014 - 07:24 नवीन
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता ! तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मोदक गुरुवार, 09/11/2014 - 10:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा