कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…
मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ).
मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील? किती विविध प्रकारच्या संकटांना तोंड देत , जगाचे डोळे चुकवत, अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य अशी कोणतीतरी गोष्ट करतोय असा भाव मनात आणि चेहऱ्यावर आणत गपचूप मिपा पाहत असतील तेव्हा कशी त्यांची तारांबळ उडत असेल ? ( ह्यात अस्मादिकही आहेत ) तरी मला बरेच प्रश्न पडतात ते असे :
१) चोरून दूध पिणाऱ्या मांजराचे भाव त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर उमटत असतील का?
२) मिपा पाहताना अचानक बॉस किंवा सहकाऱ्यांची धाड पडल्यास तो हल्ला कसा परतवून लावावा(काय योगायोग आहे बघा…. हे लिहित असताना आमचाच बॉस माझ्या मागे उभा राहिला !! चला…) ?
३) दिवसरात्र मिपाची चटक लावून "मिपाधीन" झालेल्या माणसांकडे पाहून त्यांचे सहकारी (किंवा घरचेही ) काय विचार करत असतील ?
४) जर सगळे लोक असे कार्यालयात मिपा पाहत असतील तर त्या कार्यालयाच्या कामाचे काय होत असेल (मला नका विचारू !! )?
५) सगळ्या कार्यालयांना मिपाचे सभासद करून घेतले तर ह्या प्रकाराला सी एस आर खाली प्रोत्साहन देता येईल काय?
६) बौद्धिक भूक भागवण्यासाठी मिपाच्या हाटेलात आलेली गिऱ्हाईक इतरही मराठी संस्थळांच्या ठिकाणी लेखनकला दाखवत असतात. इतका वेळ त्यांच्याकडे कुठून येतो?
अवांतर : कार्यालयातून मिपा पाहिल्यास त्याचा वास आयटीला लागतो का ?
.. त्यासाठी शनिवारी काम काढलय हापिसात!!वा... वा ! =))