Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पोरं vs मुलं

व
वेल्लाभट
गुरुवार, 09/11/2014 - 07:26
🗣 88 प्रतिसाद
नमस्कार! मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे. 'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही. विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
21389 वाचन

💬 प्रतिसाद (88)
स
सुनील गुरुवार, 09/11/2014 - 07:31 नवीन
आपलं ते मूल; दुसर्‍याचं ते पोर!! ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 08:28 नवीन
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 09/11/2014 - 09:53 नवीन
लई वेळा सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ए
एस गुरुवार, 09/11/2014 - 10:09 नवीन
आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
क
कवितानागेश गुरुवार, 09/11/2014 - 08:42 नवीन
पोरवडा या शब्दामुळे कदचित पोर हा शब्द हीन झाला असावा.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 09/11/2014 - 08:44 नवीन
मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 08:48 नवीन
यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 11:24 नवीन
असं? मग मी एखाद्याला भो*** म्हटलं तर त्याला शिवी म्हणून जज करणं चूक आणि अज्ञानमूलक आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यसवायजी गुरुवार, 09/11/2014 - 11:36 नवीन
चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात. स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 12:13 नवीन
एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :) पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 12:50 नवीन
माफ करा; माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग
पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे
असं म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
काउबॉय गुरुवार, 09/11/2014 - 18:46 नवीन
इट्स प्रोनाउन्स्ड अस प्वार आट मोस्ट ऑफ़ धी प्लेसेस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 09/11/2014 - 08:58 नवीन
पोरंबाळं कशी आहेत असे खेड्यात सहज विचारले जाते. त्याच खेड्यात एखादीला मूलबाळ आहे कि नाही असेही विचारले जाते.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 09/11/2014 - 10:00 नवीन
पोरकीडे (धान्यात असतात काळ्या रंगाचे) त्यांचा आणि पोरांचा याचा काही संबंध आहे का? ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/11/2014 - 10:04 नवीन
आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सूड गुरुवार, 09/11/2014 - 10:59 नवीन
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आसिफ गुरुवार, 09/11/2014 - 19:14 नवीन
>>> सीताफळात सीता हे राह्यलं. सिताफळावरुन उगाचच सिताफळ ईडली (मुक्तपीठ फेम)आठवली. पाककृती आहे का कुणाकडे ? :D ~आसिफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एस गुरुवार, 09/11/2014 - 10:05 नवीन
काय पोरकट प्रश्न आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 10:30 नवीन
मूलकट पण नाय बसत. हलकट वाटतं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुहास.. गुरुवार, 09/11/2014 - 11:52 नवीन
मूलकट >> =)) विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यसवायजी गुरुवार, 09/11/2014 - 10:19 नवीन
"हा काय मूलखेळ वाटला काय?" कुछ जमेगा नही. पोरखेळच बराय.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 09/11/2014 - 10:24 नवीन
बरेच प्रश्न पडतात तुम्हाला हल्ली ब्वा
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 10:31 नवीन
दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो. उदा. १. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल. २. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 09/11/2014 - 13:19 नवीन
पालक आमच्या वेळी भाजी होती हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 13:24 नवीन
ठ्ठो =)) "आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव
P
psajid गुरुवार, 09/11/2014 - 10:45 नवीन
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही. प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 11:22 नवीन
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 12:17 नवीन
मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा. आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो. आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
आ
आदूबाळ गुरुवार, 09/11/2014 - 12:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 12:52 नवीन
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही. मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 11:00 नवीन
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/11/2014 - 11:01 नवीन
लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर 'ज्याचे आईवडील जिवंत नाहीत त्याला असं म्हणतात' हे ऐकलेलं आठवतंय. बाकी माहीत नाही.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 11:20 नवीन
तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सस्नेह गुरुवार, 09/11/2014 - 13:52 नवीन
लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर
अहो, ते पोरका/पोरकी असे असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/11/2014 - 14:19 नवीन
हा गैरसमज या गैरसमजूतीच्या मागे असावा असेच वाटते आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 11:19 नवीन
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग. शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/11/2014 - 13:48 नवीन
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत. उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 11:21 नवीन
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 09/11/2014 - 11:37 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.
ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यसवायजी गुरुवार, 09/11/2014 - 11:39 नवीन
+ मोदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 12:23 नवीन
असेच म्हणतो. या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 12:56 नवीन
हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय ! प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण. (याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 13:08 नवीन
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला. मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल. तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 13:13 नवीन
अहो मग हे असंच तुम्ही आधी सांगू शकला असतात. आक्रस्ताळेपणा कशाला उगीच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/11/2014 - 13:16 नवीन
वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास... तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=molesworth&display=utf8 पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 09/11/2014 - 13:55 नवीन
सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
भ
भिंगरी गुरुवार, 09/11/2014 - 15:41 नवीन
म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
P
psajid गुरुवार, 09/11/2014 - 12:22 नवीन
मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही. असो !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/11/2014 - 12:54 नवीन
अच्छा आवडीचा विषय! ब...र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid
स
स्पा गुरुवार, 09/11/2014 - 12:48 नवीन
चला अध्तम संपलं णी शहरी गावठी वाद सुरु झाला कलाकार तेच =))
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा