Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जेवणाची चव

क
कहर
Wed, 09/17/2014 - 05:34
🗣 172 प्रतिसाद
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे. काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना" बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले bazar

प्रतिक्रिया द्या
53778 वाचन

💬 प्रतिसाद (172)
स
स्वप्नांची राणी Wed, 09/17/2014 - 06:35 नवीन
मी पयली....!!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 09/17/2014 - 07:08 नवीन
सैल टीशर्ट जीन नेलपोलिश, मोबाईल.. ही कसली आई.. छे.. छे.. छे.. ही आई नथी छे.. माता न ही वैरिणी. बिचारी ती चिमुरडी..
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/17/2014 - 08:05 नवीन
हाहाहा. च्यायला गवि तुम्ही कधीपासुन उपरोधिक लिहायला लागलात? *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 09/17/2014 - 08:10 नवीन
उपरोधिक ? स्त्रियांनी सैल टीशर्ट घालण्याच्या मी नेहमीच विरोधात आहे... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 08:51 नवीन
मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी. त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै. हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 09/17/2014 - 08:56 नवीन
आणि पेप्सी कोकाकोलातील कीटकनाशकेही तितकीच जबाबदार. एकूण मूल्यं घसरलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 09:16 नवीन
कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
रुमानी Wed, 09/17/2014 - 09:27 नवीन
काय हे काय चालु आहे? आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...! बकि तुमचे चालु देत..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 09:45 नवीन
अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ? (फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय) आई एक नाव असतं घरातल्या घरात जीन्स घातलेलं गाव असतं ! बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही मिपा पांगते प्रतिसादांचे बाजार उठतात उदास धाग्यात उमाळे दाटतात. आई असतो एक जिन्सचा धागा चिमुरड्यासह बाजार करणारी समईतली जागा आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
ब
बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 09:47 नवीन
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 09:50 नवीन
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 09:55 नवीन
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना. वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 09:58 नवीन
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
रुमानी Wed, 09/17/2014 - 09:54 नवीन
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!? धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 09:59 नवीन
आमचं असंच आहे, आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. ;) =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
ब
बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 10:41 नवीन
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्‍यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
प
प्रमोद देर्देकर Wed, 09/17/2014 - 12:52 नवीन
ठोSSSठो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
प
पोटे Wed, 09/17/2014 - 09:28 नवीन
तोंडाला लावली बाटली की लगेच संस्कृती बाटली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुहास.. Wed, 09/17/2014 - 13:07 नवीन
भाषांतर करुन घ्या ब्वा !! I look around and wonder why do people look at a married woman differently?? She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married.. But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman.. She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'.. Marriage doesn't suddenly turn a girl into a woman.. For that matter having kids doesn't necessarily do the same either.. Celebrate who she really is, celebrate the child in her.. She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger.. She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does.. This is for every wonderful woman I know.. Grow up.. But take your own sweet time & let the li'l girl in you live forever.. And for the men- Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'.. She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
अ
असंका गुरुवार, 09/18/2014 - 20:15 नवीन
हे आपण लिहिलंय? अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:00 नवीन
फेस्बुक फॉर्वर्ड आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
प्यारे१ Mon, 09/22/2014 - 12:10 नवीन
सुहास.. नं वर >>> कोणे एकेकाळी हे लिहिले होते .. लिहीलंय त्यामुळं नीट समजत नाहीये. वाश्या, तुझंच आहे का हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाव आडनाव Fri, 09/19/2014 - 07:44 नवीन
लई आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चौथा कोनाडा Sat, 09/20/2014 - 19:08 नवीन
एकदम सुंदर ! एक नंबर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
क
काळा पहाड Wed, 09/17/2014 - 07:14 नवीन
या नॉर्थ इंडियन वाल्यांना फटके देवून हाकललं पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Wed, 09/17/2014 - 07:17 नवीन
मी प्रयत्न करतेय चांगली आई बनण्याचा पण त्या वरच्या पयल्या आईने काय घातलं होतं हेच स्पष्ट होत नाहीये...श्शी बाई...
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/17/2014 - 07:23 नवीन
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 05:50 नवीन
नसली तर शिवून घे.
शिवून? छे छे!!! शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची... आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत.. पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 09/18/2014 - 08:07 नवीन
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सूड गुरुवार, 09/18/2014 - 11:18 नवीन
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!! प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/18/2014 - 13:37 नवीन
@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> +++१११ अश्येच म्हन्तो! हाडं सोडून लोंबणार्‍या कातडीसारखं..कायच्याकाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 18:34 नवीन
हा हा हा!!! :) ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!! हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 18:38 नवीन
आयला, तुमची एकसष्ठी आली पण???????? ;) (की होऊन गेली? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/18/2014 - 18:39 नवीन
तुला बोलावीन हां!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड गुरुवार, 09/18/2014 - 20:04 नवीन
दासबोधाचा पारायण ठेवतास महो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 06:41 नवीन
होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!! अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पैसा Wed, 09/17/2014 - 07:21 नवीन
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्‍या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते! जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 09/17/2014 - 07:29 नवीन
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/17/2014 - 08:15 नवीन
आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला?
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्‍यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका! बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 09/17/2014 - 08:52 नवीन
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गवि Wed, 09/17/2014 - 07:29 नवीन
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले. अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का? सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी. तुम्हाला आत काहीच कालवत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/17/2014 - 07:41 नवीन
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं? (खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्‍या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 09/17/2014 - 13:20 नवीन
आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही.
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वप्नांची राणी Wed, 09/17/2014 - 14:22 नवीन
तु वल्कले घालणार...मग रावण तुला पळवणार दोन बाप्यात युद्ध लावणार....रामायणात महाभारत घडवणार निश्चीत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/17/2014 - 08:58 नवीन
विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै. जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा. यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं. सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन Wed, 09/17/2014 - 09:33 नवीन
प्राडॉ, पुलंनंतर तुम्हीच बघा विनोदात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रसक Fri, 09/19/2014 - 20:52 नवीन
कुठल्या जगात वावरता तुम्ही???? आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?

संपादीत.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सूड Fri, 09/19/2014 - 21:22 नवीन
सार्क्याजम कळतां मरें तुका? ना जाल्यार वगी रांव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसक
य
यसवायजी Sat, 09/20/2014 - 06:42 नवीन
४ वर्षं झाली यांना मिपावर. तरीपण "नया हय यह" ;) रच्याकने,हे 'वगी रांव' काय अस्तंय राव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिवळा डांबिस Sat, 09/20/2014 - 06:48 नवीन
कोकणीतलं 'वगी रंव' म्हणजे मराठीत 'गप बस' -पिवळाशास्त्री डांबिस कोकणी-मराठी भाषांतरकार (नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा