काथ्याकूट
सज्ञान मुली व बायकांबद्द्ल ठिक आहे हो! पण अल्पवयीन मुलांचे काय?
Primary tabs
मिनल ताईंनी बायकांच्या सिगारेट दारु बद्दल लिहले होते, त्याच संदर्भाने आणखी काही.
अगदी परवाचीच गोष्ट, सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलच्या बाजुने चाललो होतो.
एक अगदी १२/१३ वर्षचा मुलगा ऐटित धुर सोडत होता.
आणि गुटखा तर जणु सर्वमान्यच झालाय.
एवढ्या छोट्या वयात हि सगळी व्यसन योग्य आहेत काय?
आपण काहीच करु शकत नाही?
याला पायबंद बसावा असे मला वाटते.
आपल्याला काय वाटते?
क्रिष्णा
(जनसामान्य)
कृष्णाभाऊ, मान्य की ही व्यसनं लहान मुलांनी करू नयेत, पण पुन्हा तोच प्रश्न, मोठ्या माणसांनी केली तर चालतील का? आपली नजर मेली म्हणून मोठ्या लोकांकडे आपण कानाडोळा करतो पण लहान मुलं त्यांचंच अनुकरण करतात त्याचं काय? व्यसन हे व्यसनच!
तंबाखूमुळे, भले तो कोणत्याही रुपात किंवा प्रमाणात असो, भलं झाल्याचं ऐकीवात नाही. अल्कोहोल कमी प्रमाणात औषध असतो म्हणे (स्वगतः मला काय धाड भरली आहे की मी तो फक्त औषधापुरताच घ्यावा?) आणि त्याने दुसय्राचंही नुकसान होत नाही (व्यसनी लोकांची घरं विस्कटतात, पण मी त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे). पण मोठ्या माणसानी धूर सोडला म्हणून तो फुफ्फुसासाठी चांगला होत नाही ना?
यमी
मोठ्या माणसांनी केली तर चालतील का?
अर्थातच व्यसन करणे चुकिचे?
पण,
छोटी मुले उद्याची मोठी माणसे आहेत?
आज जर त्यांनी केली नाहीत तर उद्या, मला वाटते कि व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी असेल.
आजचा विचार करण्याऐवजी आपण भविष्याचा विचार केला तर?
पण लहान मुलं त्यांचंच अनुकरण करतात त्याचं काय?
मोठ्यांनी अगोदर निर्व्यसनी व्हावे. आपण लहान मुलांसमोर काय आदर्श ठेवत आहोत याचा सर्व मोठ्यांनी विचार करावा.
क्रिष्णा
यमीशी सहमत
माझ्या ओळखीचा एक चांगल्या घरातला लहान मुलगा आईला तंबाखु चोळण्याची दाढेत भरण्याची नक्कल करुन दाखवत होता
त्यांच्या घरात कोणीही तम्बाखु खात नाही.
चौकशी केली तेंव्हा कळाले की त्याने हे रिक्षावाल्या काकांचे पाहुन तो करत होता.
अवांतरः टीव्हे वर आयटम गर्ल चा नाच लहान मुली मुले करतात. कल्पना करा की तुमची मुले मुली डानबार मध्ये आयटम गर्ल आयटम बॉय म्हणुन काम करत आहेत.
विष्व सुंदरी / एअर होस्टेस ही आजच्या लहान मुलींची मोठेझाल्यावर काय करेन याची उत्तरे असतात.
किरण बेदी / मृणाल गोरे वगैरे कोणाला माहीतच नसतात.
सहज एक प्रश्न विचारतो ब्रिगेडीयर प्रमिला वाड किती जणाना माहीत आहेत?
आपण अज्ञानी असतो . मुलांसमोर चांगली उदाहरणे ठेवत नाही. त्यातुन फार निराळे निश्पन्न होणार अशी अपेक्षा धरण्यात चूक आहे.
मुले मोठी होत असतात. त्यांच्या समोर तुम्ही चांगले काही ठेवणार नसाल तर जे काही समोर येईल त्यालाच ते चांगले मानतात.
मुलाना सगळ्या सिविधा दिल्या म्हणजे संस्कार दिले असे नाही.
मुलाना जर चांगले काही द्यायचे असेल तर सुरुवात स्वतःपासुन करुया. किमान आपण स्वतः टीव्ही पहाणे बंद केले तरी बराच फरक पडेल.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मोठ्यांनी अगोदर निर्व्यसनी व्हावे. आपण लहान मुलांसमोर काय आदर्श ठेवत आहोत याचा सर्व मोठ्यांनी विचार करावा.
लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. लहान मूल म्हणजी मातीचा गोळा. जसा आकार द्याल, तशी घडतील. म्हणून मोठ्यांनी सर्वप्रथम व्यसने सोडणे महत्वाचे आहे. खालील विनोद बहुतेकांना माहीत असावा :
बाबा: बेटा सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक असते. आणि इतक्या लहान वयात तर ती मुळीच ओढू नये.
मुलगा: मग तुम्ही का ओढता?
बाबा: अरे, ती माझी लहानपणापासूनची सवय आहे!
आपली मुले आपल्या कडून शिकतात हे खरे !!!!
पुर्न सहमत
मला स्वत:ला मानिकचन्द चे व्यसन गेलि ४ वर्श आहे,रिकाम्या वेळात कधि पुडि तोन्डात जाते कळत नाहि,त्यातिल घातक तत्व माहित असुन सुधा माझ्या सारख्या कित्येक जनानकडून खाल्लि जाते,मग लहान मुलान्चि काय कथा त्याना तर जास्त काहि माहित हि नसत,
पन हि गुट्खा ,सिगारेट फारच सहज उपलब्ध होतात हा घटक सुधा कारनिभुत आहे अल्पवयिन मुलान मधे व्यसन पसरन्यास
त्या बाबत सुज्ञानि काहि करता आल तर पहाव
काहि चुकल्यास माफि असावि !
काय बोल नार सगले कलते पण वलत नाही हा प्रकार आहे हा