Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्ये वागनं बरं नव्हं

न — निराकार गाढव, Wed, 09/17/2014 - 22:03
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   लादेन ध्यान किंमतीचं, शिकिवून रायल्ये हिंमतीचं | लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ... आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   मंडळात भारी गुर्र्जींची वट, तुमची खोडी ये अंगलट घाबरून रावा गुर्र्जेन्ला, समजवू कित्ती तुम्माला आरं कडबत्या, रवांथ करतोस जस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   किती करावी कोल्हेकुई, खोटाच गुर्जी फुडं होई फुसकाच एक्का सत्याचा, गुर्र्जींचा पत्ता हुकमाचा आवो पैसाक्का, कामून उडवता धाग्गा, हे वागनं बरं नव्हं ||  

प्रतिक्रिया द्या
9163 वाचन

💬 प्रतिसाद (38)
ए
एस गुरुवार, 09/18/2014 - 03:17 नवीन
हा धागाही उडायच्या आत वाचून ठेवल्याची पोच. :-) गाढवा रे...!
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/18/2014 - 05:38 नवीन
हा हा हा भलतेच खंग्री जमलयं ;)
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/18/2014 - 06:32 नवीन
हा हा हा.. कहर. एक गाढवाचा फटू तेवढा राहिला बघा.
स
सविता००१ गुरुवार, 09/18/2014 - 07:09 नवीन
:)
प
पोटे गुरुवार, 09/18/2014 - 07:26 नवीन
तिसर्‍या ओळी सुंदरच आहेत. खेबुडकरही चाट पडतील
ध
धन्या गुरुवार, 09/18/2014 - 08:06 नवीन
>> गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, ह्या ह्या ह्या. कुणाचा विलाज करायचा असेल तर बोला. अर्थात काही हाताबाहेर गेलेल्या केशी सोडून. :)
आ
आदूबाळ गुरुवार, 09/18/2014 - 08:26 नवीन
जमलंय जमलंय! आता प्रतिहल्ला म्हणून "घागर नळाला लाव" चं सुडंबन पडेल काय?
प
पैसा गुरुवार, 09/18/2014 - 08:33 नवीन
मी कुठे काय क्येलं? उगाच आपलं! तुम्हा गरीब बापड्या सदस्यांचा टंकशोष वाचून माझे कोमल हृदय द्रवले आणि आता माझे हृदयपरिवर्तन झाले आहे. यापुढे तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फुलासारखे जपेन म्हण्टे. (म्हणजे झाडं कापायची कात्रीच घेऊन बसते आता.) विश्वास ठेवा नायतर ठेवू नका! (मेरे बाप का क्या जाता!) बरं काका, (प्रसंग पडला बाका, तर गधे को केहना काका) तुमचे गुर्जी कोण ते सांगूनच टाका एकदा! त्यांच्याकडून किरपा प्राप्त करीन म्हणटे. आतापर्यंत मी १० गुर्जी करायचा प्रयत्न केला, त्यातल्या ३ जणांनी जीव दिला. ३ जण संन्यास घेऊन फरार झाले आणि उरलेले ४ जण लग्न करून घरजावई झाले. अकरावा गुरू तरी लाभतोय का बघू! बरं तुम्ही जगदीश खेबुडकरांसारख्या बूर्झ्वा, प्रतिगाम्याच्या गाण्याचं विडंबन का केलंत म्हणे? तुम्हाला पुरोगामी व्हायचे नाही?
क
किसन शिंदे गुरुवार, 09/18/2014 - 16:06 नवीन
त्येच म्हनतो की मी, या गाढवाला कुटनं मिळाली आतली खबर.? लैच्च पोचलेलं हाय जणू हे गाढाव.
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 16:12 नवीन
हां ना ! गातय बी सुरात... काना मात्रा सर्वे सर्वे जागेव्र !
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सस्नेह गुरुवार, 09/18/2014 - 08:48 नवीन
तात्पर्य : अखेर गाढव हे गाढव असतं...
क
काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 09:23 नवीन
=))
क
काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 11:04 नवीन
=)) आग्गागा ! _/\_ कहर.
↩ प्रतिसाद: काउबॉय
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/18/2014 - 09:25 नवीन
=)) घोर घोर कलियुग ! निराकार गाडाव श्यान्या मान्साना आक्कल शिकवतया ! +D
स
सूड गुरुवार, 09/18/2014 - 11:10 नवीन
>>पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, हे मला उद्देशून असेल तर हा वल्ली किंवा बुवांचा डुआयडी वाटतो आहे असं नमूद कर्तो. ;)
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/18/2014 - 11:13 नवीन
अगागागागागा =)) =)) =)) =)) =)) एकाचवेळी इतक्या दुगाण्या झाडूण सगळ्यांची तोंडे बाद केल्याबद्दल या ठिकानी या माध्यमातूण मी णिराकार गाढवभाऊंचे हबिणंदण कर्तो!!!!
ज
जेम्स बॉन्ड ००७ गुरुवार, 09/18/2014 - 13:32 नवीन
अशेच म्हण्टो..
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 11:56 नवीन
>>> काव्यरस: मार्गदर्शन मी आणि माझे हझल करुण ह्या उपरोक्त रसांमधलं काव्य अ फा ट आवडलंय....!
इ
इनिगोय गुरुवार, 09/18/2014 - 12:06 नवीन
गुर्जींकडून किती मार्कं पल्डे म्हणे?
स
सुहास.. गुरुवार, 09/18/2014 - 12:09 नवीन
=)) =)) =)) लईच निराकार ब्वा तुम्ही !
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/18/2014 - 12:23 नवीन
म्हारास्ट्राचा फुढचा शिएम निराकार गाढवच झाला पायजेल, त्योच आमाला फुढं नेईल. कारण त्याच्या मागं कोण हुभं राहणार ,लाथ वर्मी बसल्यावं काय घ्या? त्यामुळं समदी गपगुमाण फुढं चालत्याल. निराकारीय गाढवी पार्टी ,-पार्टी विथ दुगाण्या.
अ
अजया गुरुवार, 09/18/2014 - 12:28 नवीन
पंखी अजया गाढवाचे पाय धरी॥__________/\_________
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/18/2014 - 12:33 नवीन
सेम हिअर. वटवाघूळ गाढवाचे पाय धरी _/\_
↩ प्रतिसाद: अजया
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 09/19/2014 - 06:08 नवीन
वटवाघूळ गाढवाचे पाय धरी
ए ब्यॅट्यॅ. खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
काळा पहाड Fri, 09/19/2014 - 06:41 नवीन
ते नावाला. अहो तुम्ही "पुण्याचे" वटवाघूळ. पुण्यातले काही विनोदी प्रकार बघता (उदा: पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव, पुणेरी सिटी बसेस, पुणेरी ट्रॅफिक सेन्स इ.) तुमचा आणि खर्‍या वटवाघूळाचा संबंध वाघ आणि मांजर इतका घनिष्ठ असू शकेल. ह.घ्या.
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ब
बॅटमॅन Fri, 09/19/2014 - 09:20 नवीन
खरोखरचे वटवाघूळ मी आहे बरं का
अन मग आमी काय कागदी पंख लावल्यालं वटवाघूळ हाय का ;) संदर्भः मगदूम च्या. "आमी आमच्या आबाआज्यापासनं मगदूम च्याच पितो." "आन आमी काय ऊन पानी पितो काय?"
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/18/2014 - 13:07 नवीन
लब्बाड माउ बोचकारते, मूषक मिश्श्या फेंदारते ...Image removed. आरं पांडॊस्पा, वुलट्याच मारतोस गस्पा,Image removed.
ज
जेपी गुरुवार, 09/18/2014 - 13:35 नवीन
गाढव ते गाढवच शेवटी,दुसर्याने टाकलेल ओझ वाहुन नेण्यापरीस काही जमत नाही. मग ते परटान टाकलेल्या ओझाच असो की कुभांराने टाकलेल्या मातीच असो की कुणाच्या विचारच. फक्त ओझ वहायच काम करत.
अ
अजय जोशी गुरुवार, 09/18/2014 - 16:32 नवीन
नुसती धमाल...
द
दिनेश सायगल Fri, 09/19/2014 - 08:26 नवीन
तुमचे गुर्जी कोण ते आम्हाला काय माहित नाही, पण दुसरे एक गुर्जी काठी घेऊन कोणा गाढवाच्या पाठी धावताहेत.
प
पिलीयन रायडर Fri, 09/19/2014 - 08:31 नवीन
कोण असेल हा खरा आयडी?
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/19/2014 - 09:07 नवीन
असेल एखादं गाढव =))
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ध
धन्या Fri, 09/19/2014 - 09:12 नवीन
नुसतं गाढव नाही हो; निराकार गाढव. *lol*
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अजया Fri, 09/19/2014 - 10:11 नवीन
हे इथेच खाली हसुन लोळतंय ते तर नाही ना!!
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अजया Fri, 09/19/2014 - 10:15 नवीन
श्या प्रतिसाद खाली आला,पिराच्या प्रतिसादाखाली हवा!!आता वरती हसुन लोळतंय ते म्हणायला हवं!!
↩ प्रतिसाद: अजया
च
चौकटराजा Fri, 09/19/2014 - 09:35 नवीन
मिपा या गावातील मी ढ असल्याने मला काय बी कल्ला नाय ? कोन हाये हा गाडाव ? काव्य बरं लिल्हय म्हानायाचं !
श
श्रीगुरुजी Fri, 09/19/2014 - 09:39 नवीन
कोणाला उद्देशून हे उपरोधिक लिखाण केलं जातंय ते कळेल का? तिकडे स्वयंघोषित सर्वज्ञांनी देखील गाढवावर काही तरी खरडलं आहे. त्यांचं ते लिखाण नम्रपणे केलेली आत्मस्तुतीच असावी असा गोड संशय येतोय. इथेही गाढव हाच मुख्य नायक आहे. काही आयडींना अचानक स्वजातीविषयी का उमाळा वाटू लागला असावा हे एक गूढच आहे. कृपया कोणत्या आयडीला उद्देशून हे लेखन केले जात आहे ते कळेल का?
क
कंजूस Fri, 09/19/2014 - 17:07 नवीन
कळतं त्यांना झोंबतं, नाही त्यांना विरंगुळा.
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा