आयुष्य म्हणजे....
"आयुष्य म्हणजे काय असते,
आयुष्य म्हणजे असतो एक संघर्ष...
जन्मापासुन ते जन्माच्या शेवट पर्यंतचा,
आयुष्यातलं ध्येय गाठताना बरीच माणसे भेटतात,
काहीजण आपल्याला या प्रवासात एकटेच सोडुन निघुन जातात,
काहीजण शेवटपर्यंत साथ देतात...
आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते,
तर त्या प्रवासात असते......
तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही,
पण खरे जीवन तेच जगतात जे संघर्षात जगतात....."
💬 प्रतिसाद
(6)
च
चेतन677
Fri, 09/19/2014 - 12:55
नवीन
मित्रांनो आणि मैत्रिणिंनो कविता आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या...
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Fri, 09/19/2014 - 17:11
नवीन
कविता आवडली, एक छोटासा बदल
आयुष्यातली खरी मजा आपले ध्येय गाठल्यावर नसते,
तर त्या प्रवासात असते......
तसे तर जन्माला अनेकजण येतात आणि मरतातही,
पण खरे जीवन तेच जगतात जे प्रवासाचा आनंद घेतात ..."
- Log in or register to post comments
च
चेतन677
Sat, 09/20/2014 - 09:48
नवीन
बदल सुचविल्याबद्दल धन्यवाद!!!!
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Fri, 09/19/2014 - 20:37
नवीन
+१
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Sat, 09/20/2014 - 10:30
नवीन
वाचुन झाले की काय?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 09/20/2014 - 10:41
नवीन
"संस्थळ म्हणजे काय असते,
संस्थळ म्हणजे असतो एक संघर्ष...
आपल्या'पासुन ते डु.आय.डीच्या शेपटा पर्यंतचा,
संस्थळावर वावरताना बरेच आय.डी. भेटतात,
काहीजण आपल्याला या संस्थळावर एकटेच सोडुन निघुन जातात,
काहीजणांना आगाऊ दात देतात...
संस्थळा'तली खरी मजा गप-पडून रहाण्यात नसते,
तर तिथे किडे करण्यात असते......
तसे संस्थळांवर अनेकजण फेसबुका'वरून येतात आणि (लगेच) मरतातही*, =))
पण खरे संस्थळ- तेच जगतात जे डु.आय.डी.वापरतात....."
=============
* इथे काहि भ्रूणहत्यांची अठवण झाली! =))
- Log in or register to post comments