Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिला नेहमी वाटतं

ख — खटपट्या, Sat, 09/20/2014 - 21:30
तिला नेहमी वाटतं.... असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं राग आला तरी समजूत काढणारं अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं आपल्या नकळत आपली काळजी घेणारं आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं किती झिडकारलं तरी परत येणारं गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं

प्रतिक्रिया द्या
5608 वाचन

💬 प्रतिसाद (36)
ज
जेनी... Sat, 09/20/2014 - 23:16 नवीन
ओय होय ..... खट्टु काका ;) काकुन्ना म्हैते का हे ??? :D
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 09/20/2014 - 23:22 नवीन
काकुन्ना म्हैते का हे ???
तू पण अशी मनकवडी हायस ना जेनीताई… पण हे माझे मनोगत नाहिचै मुळी. आजूबाजूला मित्र असतात ना. त्यांची तडफड बघून स्फ़ुरलिय हि कविथा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/21/2014 - 03:05 नवीन
@कविथा>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 09/21/2014 - 03:34 नवीन
दक्षिण भारतियान्बरोबर राहून सवय लागलिय !! आथ्मा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 14:51 नवीन
ही आमची कविथा. आमचा हिच्यावर फार जीव? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 18:47 नवीन
*wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
द
दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:27 नवीन
तुला भारीच काळजी हो जेनीआज्जी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
भ
भिंगरी Sun, 09/21/2014 - 03:57 नवीन
साजुक तुपासारख शुद्ध प्रेम, ज्याच्या नशिबी तो खरा भाग्यवान.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/21/2014 - 07:32 नवीन
ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
म
मृगनयनी Sun, 09/21/2014 - 08:09 नवीन
पाषाणभेद
ही पोरगी साजूक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद...
पाषाणभेद.. ही पोरगी साजुक तुपातली असं नसून "ही पोली साजूक तुपातली" असे आहे... :) .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ज
जेम्स बॉन्ड ००७ Tue, 09/23/2014 - 08:21 नवीन
च्छ्या.... आजकालची गाणी म्हणजे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
द
दिपक.कुवेत Sun, 09/21/2014 - 14:28 नवीन
कशी काय असते ब्वाँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मदनबाण Sun, 09/21/2014 - 06:55 नवीन
मस्तच ! :) आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/23/2014 - 06:32 नवीन
मस्त आवडली कविता. -दिलीप बिरुटे (अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणा-या मैत्रिणीचा फ्यान)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 07:38 नवीन
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. मिपावर माझी हि पहिलीच कविता.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 08:04 नवीन
या पोरी अशाच नादाला लावतात आणि नंतर "मी तुझ्याकडे अशा द्रूष्टीने कधी बघितलेच नाही" असे बोलून उसात निघून जातात :(
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 08:06 नवीन
आणुभव हाय वाट्ट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 08:59 नवीन
असे आण्भव सगळ्यांचेच अस्तात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ज
जेम्स बॉन्ड ००७ Tue, 09/23/2014 - 08:22 नवीन
या जेव्हा नादाला लावतात तेव्हा आपणच त्यांना उसात घेउन जावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 09:00 नवीन
हा "उस" तो "उस" नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 09/24/2014 - 06:00 नवीन
दोन्हीकडे घेउन जाण्याचा जोर जर पार्श्वात नसेल तर या भानगडीत पडुच नये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 07:34 नवीन
पार्श्वात जोर फक्त कुठेतरी घेउन जायलाच लागतो...मग तो उस असो वा वडगाव बुद्रुक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 09/24/2014 - 06:05 नवीन
वत्सा, यासाठी तुला लादेन ध्यान्धार्णा करुन आपली निर्लज्जपणाची पातळी प्रचंड वाढवुन घ्यावी लागेल. सांसारिक जीवनात असे अण्भव येतच अस्तात. तेव्हा लवकरात लवकर लादेन ध्यान्धार्णा करुन आपल्या कातडीची जाडी वाढवुन घेणे. यामुळे एकतर मदनबाण तुम्हाला लागणार नाहीत आणि तुम्हाला उसावर बसवुन ती उसात गेली तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. निर्लज्ज व्हा. -निर्लज्जेश पोरीपटवी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 07:36 नवीन
चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच) श्री.श्री.श्री.आमिर "गुलाम" खान यांचा बस, ट्रेन आणि मुलींचा नियम पाळतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेनी... Wed, 09/24/2014 - 15:06 नवीन
=)) नेहेमी खरे बोलावे म्हणुन मुली खर्रे खुर्रे बोलतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा Tue, 09/23/2014 - 10:59 नवीन
चांगली आहे कविता
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/23/2014 - 11:04 नवीन
वाह आवडेश
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 14:52 नवीन
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
असं कोणी पाहिजे असेल तर ती मुलगी हरामखोरच म्हटली पाहिजे. (प्रतिसाद कदाचित संपादित होईल, पंखही लागतील. पण तसं झाल्यास ते इम्मॅच्युअर मनोवृत्तीचेच निर्देशक आहे.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/23/2014 - 15:01 नवीन
डिटरंट लावून प्रतिसाद टाकण्याची सोदाहरण ष्टैल ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/23/2014 - 17:06 नवीन
मुलगी हारामखोर म्हनायचं माझ्या जिवावर येतं काहींचा अनुभव असेलही तसा पण सर्वच तशा नसतात. कितीही आयुष्यात व्यस्त असू देत...पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही. - दिलीप बिरुटे (तिच्या आठवणीत रमलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 20:04 नवीन
ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढू नका राव. पोरगी झुलवणार हे माहिती असूनही त्या पोरानं विचारपूस करावी ही अपेक्षा अप्पलपोटेपणाची नाही काय तेवढं सांगा. एक आक्षेप काय घेतला तर लगेच अख्ख्या स्त्रीजातीवर कशाला लावता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जेनी... Wed, 09/24/2014 - 15:09 नवीन
आय हाय .. क्या प्रतिसाद हय ... दिबी काका ... मस्तच लाइक इट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 18:44 नवीन
पण कसायेस रे तू असं विचारल्यावर ...आत जी हालचाल होते ना ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.
हे बाकी एकदम खरं !!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 15:24 नवीन
कशी आहेस तू?
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 09/24/2014 - 15:47 नवीन
हेय दिपु काका इ अम फिने :) होव अरे योउ ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ख
खटपट्या Wed, 09/24/2014 - 20:17 नवीन
काही हालचाल झाली का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा