Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मि. इंडिया की लडकी का खून पाकिस्तानी?

ह
हुप्प्या
Sun, 09/21/2014 - 23:10
🗣 56 प्रतिसाद
मिस्टर इंडियाची भूमिका गाजवणार्‍या अनिल कपूरसाहेबांच्या कन्यारत्न सोनम कपूरने असे विधान केले की माझे दोन्ही आजोबा पेशावरमधे वाढले म्हणून माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्तच आहे. सोनमताईंचे इतिहासाचे आणि मानवी जीवशास्त्राचे ज्ञान अफाट असले पाहिजे. बाईंचे नाना आणि दादा कुठल्या कारणाने भारतात पळून आले हेही माहित करून घेतले असते तर बरे झाले असते. तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे? तिथे सोनम कपूरसारखी अल्पबुद्धी, अल्पवस्त्री, अधर्मी महिला वावरत असेल तर तिच्या नसानसातले पाकिस्तानी खून किती वेळात पाकिस्तानी धरतीवर सांडेल ह्याची कल्पना आहे का? असो. एक मनोरंजक बातमी वा पब्लिसिटी स्टंट म्हणून ह्याकडे बघायला हरकत नाही. http://www.financialexpress.com/news/i-have-pakistani-blood-in-my-veins-sonam-kapoor/1290483 http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4699769566636656834&SectionId=6&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8&NewsDate=20140920&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%20%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0

प्रतिक्रिया द्या
13448 वाचन

💬 प्रतिसाद (56)
म
मारवा Mon, 09/22/2014 - 02:58 नवीन
सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे आपला धार्मिक मारवा
  • Log in or register to post comments
प
पोटे Mon, 09/22/2014 - 09:53 नवीन
आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत. सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आनन्दा Mon, 09/22/2014 - 11:02 नवीन
अहो पेशावरातल्या लोकांच्या दॄष्टीने ती अधर्मीच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ह
हुप्प्या Mon, 09/22/2014 - 04:47 नवीन
सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा. http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-anil-kapoor-visit-lalbagh-18364 पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
प
पोटे Mon, 09/22/2014 - 06:19 नवीन
म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का? माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 09/22/2014 - 06:27 नवीन
ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 06:49 नवीन
आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!! सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय... पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही... टीआरपी?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 09/22/2014 - 09:17 नवीन
पिडांकाका असं खिंडीत गाठू नक्का गडे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुहास.. Mon, 09/22/2014 - 11:17 नवीन
असेच म्हणतो .. सोनमने ( अकलेचे) तोडले आणि काकानी झोडले तर कुठ जायच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ह
हुप्प्या Wed, 09/24/2014 - 06:53 नवीन
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे? सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Mon, 09/29/2014 - 06:20 नवीन
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे
व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 09/22/2014 - 09:19 नवीन
माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या. आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 09/22/2014 - 09:28 नवीन
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 09/22/2014 - 13:19 नवीन
रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ह
हुप्प्या Wed, 09/24/2014 - 06:57 नवीन
सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो. एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 09/24/2014 - 17:52 नवीन
सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Sun, 09/28/2014 - 18:59 नवीन
आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही. तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा. जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
आ
आनंदी गोपाळ Mon, 09/29/2014 - 05:29 नवीन
एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 09/29/2014 - 10:10 नवीन
अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
प
पोटे Mon, 09/22/2014 - 16:33 नवीन
पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ? मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नाव आडनाव Mon, 09/22/2014 - 16:54 नवीन
मीठ पण पा़किस्तानी खाल्लं होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 17:02 नवीन
एकीच मारा पर क्या सॉलीड मारा \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
प
पोटे Tue, 09/23/2014 - 18:48 नवीन
तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एस Mon, 09/22/2014 - 09:36 नवीन
यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ह
हुप्प्या Wed, 09/24/2014 - 06:59 नवीन
आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
द
दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 09:33 नवीन
खूप आवडते विशेषत बिकिनीत.... मग तिच्यात कुठल्या ठिकाणाचं रक्त का असेना!!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 10:56 नवीन
आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल. तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा. एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:09 नवीन
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात
तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;) मुविकाका आले की जळवणार नुस्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 11:17 नवीन
पर्शिया म्हणजेच इराण हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:26 नवीन
हैला...गलतीसे मिश्टेक हो गया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मदनबाण Mon, 09/22/2014 - 11:33 नवीन
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 11:43 नवीन
अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत
तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 09/22/2014 - 11:54 नवीन
नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:03 नवीन
ओह अच्छा. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 15:45 नवीन
हैला...फुल्टू फटाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/29/2014 - 06:23 नवीन
*man_in_love*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/22/2014 - 13:15 नवीन
@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>> य्या...य्या रे य्या य्या....! Image removed. त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्यारे१ Mon, 09/22/2014 - 13:36 नवीन
लोकल सिनेमांमध्ये काम करतात की. इतर ठिकाण साठी काम करायला बहुधा परवानगी नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 07:20 नवीन
मधुबाला तिकडचीच होती का ? जाणकारांनी भर टाकावी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 07:31 नवीन
मधुबाला तिकडचीच होती का ?
ती पठाण होती इतकंच माहिती आहे....
जाणकारांनी भर टाकावी ?
कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ब
बॅटमॅन Sun, 09/28/2014 - 19:14 नवीन
आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्यारे१ Mon, 09/22/2014 - 12:26 नवीन
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात (फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 12:16 नवीन
कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:22 नवीन
च्यायला. याद मत दिलाओ.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 12:28 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 09/24/2014 - 17:54 नवीन
मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :) प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
आ
आबा Mon, 09/22/2014 - 12:45 नवीन
अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...
  • Log in or register to post comments
आ
आबा Mon, 09/22/2014 - 13:11 नवीन
#उपपंतप्रधान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 16:26 नवीन
या ठिकानी हीच इणंती करन्यात येत हाये. आमच्या प्यानलवर सोनलतैंना घ्येट्लंच पायजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आशु जोग Mon, 09/22/2014 - 13:03 नवीन
मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा