कोळाच्या शेंगा
Primary tabs
मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका.
साहित्यः
१. उकडलेल्या शेंगा - १ बाउल
२. अर्ध्या नारळाचं घट्ट दुध
३. चिंचेचा कोळ - पाव वाटि
४. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे
५. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि
६. चवीनुसार गुळ, मीठ
कॄती:
१. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, वाटलेली पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा
२. कढईत तुप, हिंग - जिर्याची फोडणी तयार करा
३. त्यात उकडलेल्या शेंगा अगदि १/२ मि. परता
४. नारळाचं दूध घालून एक हलकिशी उकळि आणा
५. बारीक चीरलेली कोथींबीर पेरुन सर्व करा
तर मंडळी, या जेवायला. पान वाढलयं....साधा भात, बटाटाच्या काचर्या, कोळाच्या शेंगा, खारातली मिरची आणि पापड
टिपा: १. ह्या शेंगा रश्श्यातल्या करायच्या नसल्यास नारळाच्या दुधाएवजी ओलं खोबरं आणि बाकि साहित्य घालून भाजी टाईप बनवु शकतो. आवडत असल्यास जोडिला भोपळ्याच्या फोडिहि चालतील. पण सुख्या भाजीत मजा येत नाहि म्हणजे शेंगा पोळीशी नीट खाता येत नाहित. गरमागरम भाताबरोबर भुरके मारत, जोडिला खारातली मिरची तोंडि लावत जेवण्यातच खरी मजा आहे.
२. गुळ चवीनुसारच घाला. आंबट-गोड-तिखट नारळाच्या दुधातल्या ह्या शेंगा मस्त लागतात.
आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
सॉल्लिड दिसतय.
च्यामारी, स्टेनलेस स्टीलच्या ताटात जेवून पण 'य' दिवस झाले आमचे नि शेवग्याच्या शेंगा चोखून पण.
छळ झाला तो वेगळाच. :(
सॉल्लीड प्रतिसाद द्यायचा मोह आवरतोय.....दिला तर संमं तो अवश्य उडवतील.
काहीसा अंदाज आलाय पण व्यनि करायला हरकत नाही. तिकडंच श्या घालेन ;)
असं भरलेलं ताट समोर मिळालं तर मग क्या कहने...तोंपासु.
पाकृ पहिल्यांदाच पाहतो आहे. मस्तच.
शेवग्याच्या शेंगा म्हणजे आपला विक पॉईंट रे भौ..
अगदी अगदी :)
शेवग्याच्या शेन्गा लै आवडीच्या
मस्त.
असंच कोळाचं वान्ग्याचं भरीतपण करतात. मस्त लागतं.
मी पण कोळाच्या भरीताचा मी पण लै म्हणजे लै मोठा पंखा आहे
दिपकशेठ,
हा प्रकार पण टेस्ट करुन बघण्यात येईल. आणि हो ताटाचा फोटो फारच आवडला.
पैजारबुवा,
येब्बात! जबरीच!
मौतै - त्यात वांगं भाजून + सोलून घालायचं का?
हो. नेहमी भरीत करायला भाजून सोलतो तसंच.
फोडणीवर ते वांगे थोडे परतून, त्यात चिन्चेचा कोळ आणि नारळाचे दूध, कोथिंबीर असे घालून पुन्हा थोडा वेळ गॅसवर राहू द्यायचं.
अशा कोळाच्या पदार्थांबरोबर बाजूला पोह्याचा पापड हवाच. :)
'ह्या विषयावर एकदा तुमच्याशी चर्चा करायचीच आहे.'
जाऊ दे नं! चर्चा कशाला डायरेक्ट कोळाचे भरीतच करून पाहतो.
शिवाय, दिपकच्या पाककृतीनुसार कोळाच्या शेंगाही करणेत येतील.
भारतातून येताना आणलेले आमचे पोह्याचे पापड नेमके संपलेत त्यामूळे उडदाच्या पापडावर भागवावं लागलं.
चला आता करुन खाल्ल्याशीवाय चैन पडायचं नाहि...
@गरमागरम भाताबरोबर भुरके मारत,

जोडिला खारातली मिरची तोंडि लावत जेवण्यातच खरी मजा आहे.>>> अस्सं वर्णन नै करायचं!!! :-/ .. :-/ .. :-/
पहिला फोटू पाहुन गतप्राण आणि शेवटचा (वरील वाक्यासह! :-/ ) पाहून मुक्ती!
===============
आजपासून तुमचं नावः-
दीपू दी ग्रेट!*
===================
* चंपक-साभार! ;)
चिअंचेचा कोळ घालूनही रश्शाने तोन्ड काळे केले नाही हे विशेष
काळं होण्याईतपत चिंच घालायचीच नाहि. आंबटपणाहि लागेल आणि रंगहि बदलणार नाहि असं बघायचं...हाकानाका
अहाहा.....म्स्त दिसतेय हे. तसेही नारळाच्या दुधातील पदार्थ आवडतातच - हाही करून बघितला पाहिजे!
दिपकराव, किती कौतुक करायचं? समजून घ्या.
ताट बघुन वारल्या गेलो आहे !!
मस्त रे!
कोळाच्या शेंगा नाही पण कोळाचं भरीत येत्या वीकांती करायचा विचार बळावतो आहे..
कोळाच्या शेंगा पण भारी, आमच्या भागात या शेंगाना डांबे म्हणतात.
रसिक बलमा कोण रे तो ?
?सजावट बहाद्दर!
आमच्या गच्चीवर मी लाल माठ लावला होता. काही झाडे चार पाच फुट उंच होऊन त्याला तुरा येऊन नंतर वरीचे तांदुळ आल्यावर मी झाडे उपटली. ती मी टाकणारच होतो इतक्यात शेजारच्या आजी म्हणाल्या "आणा इकडे त्याची भाजी करते मी." त्यांनी त्या झाडाचे बोटभर जाड गुलाबी गाभा काढून त्याची रस्सा भाजी केली. किती छान दिसत आणि लागत होती या भाजीला काय म्हणतात?कशी करतात दिपक?
आमच्याकडे लाल माठाच्या देठांना ढेसे म्हणतात.
तीळ खोबर्याची लाल चटणी तेलात परतून त्यात हे उकडून घेतलेले देठ घालून सुकी भाजी करतात.
आवडत असल्यास चिंच गुळ टाकून आंबट गोडही छन लागतात.
छान असे वाचावे.
लाल माठाच्या देठाच्या पाकॄचा नवा प्रकार कळला. ह्या पुढे आता लाल माठ आणला कि देठं पण उपयोगात आणीन. जरा सवीस्तर पाकृ देशील का?
व्हॉटसॅप वर आलेला एक पालेभाजीयुक्त विनोदः
शिक्षक विद्यार्थ्या ला : अरे मुला, तू अक्षरशः 'माठ' आहेस. किती 'चुका' करतोस? उद्याच्या उद्या 'पालकां'ना घेऊन ये.
कोळाचे भरीत, कोळाचे पोहे आणी आता कोळाच्या शेंगा. तिन्ही पदार्थ माझे अतिशय आवडते आहेत. आमची बायको देशावरची( मराठवाड्याची) असल्याने तिला येत नाहीत. पण आई नागाव(अलिबाग) ची असल्याने हे पदार्थ फारच छान करते आता तिला सांगायलाच लागेल.
बाकी फोटो पाहून फारच जळजळ होत आहे. आता आईला भरीला घालायलाच लागेल.
रच्याकने-- हे पदार्थ कोकणातील आहेत काय?
हो सुबोधजी. पोह्यांचे अगणित प्रकार आणि ओल्या खोबर्याचा सढळ वापर मुख्यत्वे करुन कोकणातच करतात. घाटावरच्या जेवणात शेंगदाण्याचा वापर जास्त असतो. अर्थात ते हि जेवण अप्रतिम चविचं असतं ह्यात शंका नाहि.
झक्कास पाककृती रे दिपक.
साधी सोपी उत्तम बेस्ट!!! येत्या रविवारी ट्राय करेन !!
छान सोपी पाकृ ....
तब्येतीत खा आणि स्वस्थ रहा.
फोटो पाहून अन्नाला पूर्णब्रह्म का मह्णतात हे पुन्हा एकदा उमजले !
अहाहा !
अप्रतिम, अतिशय आवडता प्रकार.
बरोबर तोंडी लावायला वांग्याची कापं असतील तर मी या कोळाच्या शेंगांबरोबर पाउण ते एक वाटी भात फस्त करायचो
खरं तर कोळ जरासं गोडसर असल्यामूळे तोंडिलावण जरासं तिखटं/चमचमीत असेल तर भात हा हा म्हणता फस्त होतो म्हणून झटपट होणार्या बटाटाच्या काचर्या केल्या.
एक सांगायचं राहिलं. शेवग्याचा पाला आणि 'माठा'ची पाने A व्हिटमिनचे बाप आहेत.C साठी चिंच आहेच.हातसडीच्या तांदुळाचा भात(दुर्लभ) B साठी आणि उन्हात बसून खाल तर D पण येईल.
अगदि अगदि. गल्फ मधील लोकांना "D" जीवन्सत्व ३-४ महिने अगदि भरभरुन मिळतं :D
आठवणीतल्या शेंगा.
नविन पदार्थ कळला.मस्त छान पाकक्रुती आणि फोटो.
:)