Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनवाणी नवरात्र

द
दिपक.कुवेत
गुरुवार, 09/25/2014 - 08:24
🗣 138 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो. तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?

प्रतिक्रिया द्या
28893 वाचन

💬 प्रतिसाद (138)
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 08:28 नवीन
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 09/25/2014 - 08:44 नवीन
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे
हस्ताक्षर सुधारते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ज
जेपी गुरुवार, 09/25/2014 - 08:31 नवीन
नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 08:32 नवीन
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 09:04 नवीन
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्पा गुरुवार, 09/25/2014 - 09:20 नवीन
फुकटची बासरी वाजवून पण तोंडची वाफ दडवली जाते, साध्य काहीच होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 09:24 नवीन
=)) स्पावड्याचा अपेक्षित प्रतिसाद.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 09:26 नवीन
अरे अरे, असं म्हणू नये स्पावड्या. शांत हो बघू आधी. मोठे आहेत ना ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 10:49 नवीन
श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 10:50 नवीन
सध्यातरी बासरी फुकट न वाजवता तिकीट लावून वाजवता येईल या प्रयत्नात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्पा गुरुवार, 09/25/2014 - 11:18 नवीन
इजाभाय चिल :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्पा गुरुवार, 09/25/2014 - 11:19 नवीन
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/25/2014 - 20:25 नवीन
पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 09:22 नवीन
काय आहे मग बाजरी वाजवणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 09:42 नवीन
छंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 09:58 नवीन
छंदाची व्याख्या काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/26/2014 - 12:31 नवीन
@छंदाची व्याख्या काय?>>> मनाला आनंद देणारं कृतीबद्ध प्रमेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 12:43 नवीन
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Fri, 09/26/2014 - 12:55 नवीन
>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/26/2014 - 13:04 नवीन
मग त्याला छंदच का म्हणत नाही? श्रद्धा का म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 13:16 नवीन
कोण म्हणतंय श्रद्धा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 13:17 नवीन
विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 13:18 नवीन
ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्यारे१ Fri, 09/26/2014 - 10:00 नवीन
निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा Fri, 09/26/2014 - 10:01 नवीन
प्यारे काका मध्येच आल्याने आमचा पास पुढील चर्चा आमच्या खरड वहीत करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 09/26/2014 - 10:05 नवीन
ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 09/26/2014 - 10:06 नवीन
(दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)
याचसाठी केला होता अट्टाहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कवितानागेश Fri, 09/26/2014 - 18:18 नवीन
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ Sat, 09/27/2014 - 09:23 नवीन
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
द
दिपक.कुवेत Sat, 09/27/2014 - 15:17 नवीन
आता छुन्दा छंद लागूनच जौ दे सगळ्यांना....ल्वकर टाका पाकृ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ख
खटपट्या Fri, 09/26/2014 - 22:32 नवीन
येवडं कराय लागतं व्हय बासरीसाठी ? मला वाटलं समदीजन कळव्याच्या जत्रत बासरी इकत घेतात म्हून !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दिपक.कुवेत Sat, 09/27/2014 - 15:18 नवीन
फार खटपट लागते बासरीसाठि. एवढं सोप्प नाहि खट्टु काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sat, 09/27/2014 - 20:33 नवीन
हम्म !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 09:13 नवीन
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 10:51 नवीन
परफेक्ट टवाळभौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जेपी गुरुवार, 09/25/2014 - 08:36 नवीन
नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/25/2014 - 09:09 नवीन
हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 09:12 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सुहास झेले गुरुवार, 09/25/2014 - 09:11 नवीन
अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की... ;-)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 09:15 नवीन
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 09:21 नवीन
>>> हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
प
पिवळा डांबिस गुरुवार, 09/25/2014 - 23:41 नवीन
हल्ली ह्या शब्दावर आक्षेप.
'चर्चा' आणि 'दर्जा' या शब्दांवर नाय आक्षेप? कसले जाज्वल्य मिपाकर तुम्ही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:20 नवीन
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 09:22 नवीन
अवांतर : पुण्यात राहिले की असे वांदे होतात बोलताना ;) का ब्वा ? लिंक देतो खव त थोड्या वेळात :)
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 09/25/2014 - 09:23 नवीन
आस्तिक-नास्तीक्पाव.कॉम :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 09:27 नवीन
वेल :P, हा धागा शंका निरसन कमी आणि आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 09:29 नवीन
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 09:32 नवीन
पाटा खेळपट्टीवर रन होतात मग पाटा खेळपट्टीवरच का खेळू नये? का मॅचेस भरवू नयेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 09:36 नवीन
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 09:38 नवीन
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा