Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनवाणी नवरात्र

द
दिपक.कुवेत
गुरुवार, 09/25/2014 - 08:24
🗣 138 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि. अर्थात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्या बद्द्ल आक्षेप नाहि पण मी पाहिलयं जाताना वाटेवर एखादं मंदिर असेल तर लोक रस्त्यावरुन पण नमस्कार करताना चपला/बूट काढून करतात. निदान मी तरी बूट घालूनच नमस्कार करायचो/अजूनहि करतो. तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का?

प्रतिक्रिया द्या
28893 वाचन

💬 प्रतिसाद (138)
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 09:40 नवीन
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >> चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 09:58 नवीन
@ किसन/सुहास... माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये. आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय. अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 10:14 नवीन
देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ... शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 10:24 नवीन
उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. गुरुवार, 09/25/2014 - 10:54 नवीन
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >> हम्म !! शब्द मागे घेतो मालक .. आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 11:32 नवीन
अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
क
किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 17:11 नवीन
अरेरे!! दिपक चिडल्याचं पाहून एक मिपाकर असल्याची.... :D =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 09:37 नवीन
सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो. अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात. आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/25/2014 - 09:43 नवीन
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 10:08 नवीन
मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 09:07 नवीन
छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
आ
आशु जोग गुरुवार, 09/25/2014 - 10:14 नवीन
अरे ९ दिवसांची कलर स्कीम राहिली की... चपला नाही तसेच कपडे पण नाही... अनवाणी अनकपडे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 10:21 नवीन
मग सगळे दांडीया खेळतात कि गरबा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
आ
आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 15:24 नवीन
गरबा
एक मित्र "गर्भा" असा उच्चार करतो. काही बातम्यांवरून अंदाज घेता हे विशेष खोटं नसावं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 10:23 नवीन
मस्त पाकृ! या वीकांताला करून पाहीन! :-/
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 10:27 नवीन
धागा मनोरंजनात्मक वाटत असेल तर अवश्य उडवावा एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 10:39 नवीन
या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 11:41 नवीन
इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात. शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 11:47 नवीन
देव एवढा दूधखुळा नाही हो पण. तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं. ते फळ तिथलं तिथंच. उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार. देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही. देवाकडं चीटिंग चालत नाय हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/26/2014 - 09:15 नवीन
>>>>देव एवढा दूधखुळा नाही हो पण......देवाकडं चीटिंग चालत नाय हा ! एव्हढी समज असती तर काय पाहिजे होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ध
धन्या Fri, 09/26/2014 - 17:47 नवीन
>> जर देवासाठी असेल तर ठीक. देवासाठी लेखही लिहीता येतो तर. वाचावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 10:40 नवीन
बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 09/25/2014 - 11:09 नवीन
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 11:34 नवीन
कारण तु असचं काहिसं विचारशील म्हणून...तुझ्यासाठि हि चर्चा माफ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कवितानागेश गुरुवार, 09/25/2014 - 11:09 नवीन
त्यापेक्षा उपवासाचे मस्त दोनचार पदार्थ करून इथे दे रे
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 11:26 नवीन
मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 09/25/2014 - 11:39 नवीन
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 11:42 नवीन
मी २००० ते २००३ पर्यंत T.P.C.T's COE मध्ये होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 11:46 नवीन
>>>>T.P.C.T's COE मध्ये होतो. हा कांहीतरी पोलीसांचा बिनतारी संदेश वाटतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 11:49 नवीन
हा हा हा. काय काका, खेचताय काय? ;) T.P.C.T's COE = Terna Public Charitable Trust's College of Engineering, Osmanabad.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 11:52 नवीन
>> तक्तालीन कलेक्टर शब्दप्रयोग आवडला. 'तख्तालीन' जास्त योग्य वाटतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 11:44 नवीन
नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 11:55 नवीन
>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2014 - 11:59 नवीन
>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 11:59 नवीन
मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 12:06 नवीन
१ वर्ष उपास. दिवसभर काहि न खाता रात्री उपास सोडायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 12:14 नवीन
शिंगणापुरात अगोदरही चोर्‍या होतच होत्या, फक्त रिपोर्टिंग दाबले जायचे असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 11:51 नवीन
ह्म्म... जरासे विषयांतर करुन एक इडियो देतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 12:01 नवीन
वरील विडीओची फेसबूकवर आजकाल जाम चलती आहे असे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:04 नवीन
काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
द
दिपक.कुवेत गुरुवार, 09/25/2014 - 12:04 नवीन
पण अप्रतिम आहे. किती निरागस आहेत हे विकणारी सगळे. काय आनंद होतोय १००० रु. मिळाल्यावर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 12:07 नवीन
मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रमोद देर्देकर Mon, 09/29/2014 - 06:39 नवीन
अगदी +१ माझ्याही डोळ्यात पाणी आलं. संगीतही छान दिलं आहे या चलचित्रणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 11:55 नवीन
ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी गुरुवार, 09/25/2014 - 12:29 नवीन
नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 09:03 नवीन
धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 13:13 नवीन
एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 09/25/2014 - 13:15 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:27 नवीन
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
च
चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 09:12 नवीन
"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा