Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

म — माम्लेदारचा पन्खा, Fri, 09/26/2014 - 13:31
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली असणार मग त्यातली अर्धी त्याला आठवत सुद्धा नसणार उरलेली अर्धी त्याने पूर्ण केलेलीच नसणार मग आधीचा उमेदवार पण नेमकं असंच नाही करणार कशावरून, असं वाटणार मग डोक्यात एक लक्कन विचार येणार ह्या सगळ्यांशी न घेणं न देणं पण फुकाचे नमस्कार चमत्कार करावेच लागणार काय रे देवा …. मग डोक्याच्या संवेदना बधिर होऊन जाणार डोळ्यात रोजच्या त्रासाची आणि कटकटीची आसवं जमा होणार मग वळल्या गेलेल्या आपल्याच मुठीवर ती टपटपणार मग आपल्याला येत असलेल्या दहावीस शिव्या अपुऱ्या वाटणार मग अजून नवीन शिव्या शिकाव्याश्या वाटणार त्या शिव्या मनसोक्त समोरच्या माणसाला द्याव्याश्या वाटणार मग साराच कसा मूर्खांचा बाजार वाटणार पण आपलं तोंड तसं उघडूच नाही शकणार आपण फक्त दात ओठ खात राहणार काय रे देवा… निवडणुका येणार मग हवेत फक्त बेहोशी पसरणार मग पक्षापक्षात चैतन्य दाटणार त्यातले काही लोक ह्या फांदीवरून त्या फांदीवर जाउन बसणार पण सगळ्यांनाच ते नाही जमणार मग ते तोंडावर जबरदस्त आपटणार पण ते नाही ओशाळणार पुन्हा तिसऱ्या पक्षाच्या दाराशी जाणार…. नाहीतर अपक्षच राहणार लोकात लाज जाऊ नये म्हणून उलट्या बोंबा मारणार पण लोकांचा संयम केव्हाच संपलेला असणार दलबदल्यांचा तमाशा सगळ्या जगाला दिसलेला असणार इतकं सगळं होऊनही त्यांच्या जागी तेच राहणार आणि आपल्या जागी आपण राहणार …. कारण आपल्याकडे गेंड्याची कातडी नसणार डोळ्यातला विखार अजूनही चांगल्या जगण्याच्या अपेक्षेत कुठेतरी विरून जाणार निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा ….

प्रतिक्रिया द्या
3646 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पैसा Fri, 09/26/2014 - 14:44 नवीन
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 09/26/2014 - 16:52 नवीन
जबरदस्त ट्यार्पी मिळणारा एकमेव कार्यक्रम !
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 09/28/2014 - 09:31 नवीन
काय रे देवा.....
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/29/2014 - 09:30 नवीन
मिपाच्या बाजारात उठाव नाही…का रे देवा ??
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/29/2014 - 11:09 नवीन
सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/29/2014 - 13:06 नवीन
आमी कुटं म्हनलं आमची चड्डी लाल...आमी आदीच माफी मागित्ली खरेबुवांची !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ए
एस Mon, 09/29/2014 - 11:17 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/29/2014 - 13:13 नवीन
निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा …. असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्‍या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/30/2014 - 17:04 नवीन
कविता छान साधली आहे. व्हॉट्स अ‍ॅप वरून फिरवा मस्त ट्यार्पी कमवेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा