Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अम्मा

ध
धर्मराजमुटके
Sat, 09/27/2014 - 17:24
🗣 29 प्रतिसाद
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

प्रतिक्रिया द्या
9379 वाचन

💬 प्रतिसाद (29)
क
काउबॉय Sat, 09/27/2014 - 18:34 नवीन
वरती अपील होईलच तरही गुन्हा सिध्द झाला जबर शिक्षा सुनावली गेली हे छानच
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 09/27/2014 - 20:31 नवीन
बरोबरे !! वरती अपील होउन अजुन १८ वर्षे जाण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय
स
सवंगडी Sun, 09/28/2014 - 05:45 नवीन
६८ कोटी रुपयांच्या केस करता १०० कोटी दंड ! वरच्या कोर्टात निर्णय टिकेल का ? आणि वरचा निर्णय होईतो अम्मा, भगवान को …. ???
  • Log in or register to post comments
न
निश Sun, 09/28/2014 - 09:15 नवीन
मुळात तिला शिक्षा झाली हे महत्वाच त्यामुळे लोकाना कस्पटासमान मानणार्‍या राजकारणी धेंडाना चपराक बसेल.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 09:29 नवीन
घंटा...हा राजकिय गेम केलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश
प
प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 07:16 नवीन
हे सर्व महाराष्ट्रात कधी घडणार?
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Mon, 09/29/2014 - 09:09 नवीन
महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
भ
भाते Mon, 09/29/2014 - 09:26 नवीन
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…
  • Log in or register to post comments
भ
भाते Mon, 09/29/2014 - 09:26 नवीन
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 09/29/2014 - 12:17 नवीन
अम्मांना शिक्षा होताच सहा आत्महत्या, १० जणांना हार्ट अॅटॅक काय मुर्खपणा आहे हा?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/29/2014 - 14:06 नवीन
'विकत' घेतात हो त्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
र
रेवती Mon, 09/29/2014 - 14:14 नवीन
१६ जणांची आत्महत्या, हृदय विकाराने गेले म्हणे! काहीही. आता वरच्या कोडतात ही बाई सुटली तर या गेलेल्यांचं काय?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 09/29/2014 - 14:41 नवीन
आज तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणी मंत्रीमंडळ शपथविधी मध्ये धाय मोकलुन रडत होत
  • Log in or register to post comments
अ
अतुल झोड Tue, 09/30/2014 - 08:38 नवीन
लोकशाहीची मुळे किती बळ्कत आहेत व घट्ना किती शक्तीशाली आहे हे यावरुन सिद्ध होतय......
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/30/2014 - 11:35 नवीन
संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 09/30/2014 - 11:42 नवीन
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ख
खटपट्या Tue, 09/30/2014 - 23:22 नवीन
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 14:19 नवीन
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
निनाद मुक्काम … Wed, 10/01/2014 - 14:24 नवीन
एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 10/01/2014 - 15:00 नवीन
सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 10/01/2014 - 17:39 नवीन
बर्‍याच दिवसांनी आनंदाची बातमी ऐकली. करूणानिधी, त्याची पिल्लावळ, महाराष्ट्रातले भ्रष्टवादी इ. तुरूंगात जातील तो सुदिन.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 10/01/2014 - 18:06 नवीन
महाराष्ट्रातले भ्रष्टवादी इ. तुरूंगात जातील तो सुदिन. तुम्ही प्रचंड आशावादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे गुरुवार, 10/02/2014 - 11:21 नवीन
महाराष्ट्रातले भ्रष्टवादी
यातले अनेक भाजपा प्रवेश करतायत सद्ध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सचिन गुरुवार, 10/02/2014 - 11:03 नवीन
तुम्ही प्रचंड आशावादी .... का ? तिथे घडू शकते तर इथे का नाही ???
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 11:56 नवीन
रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 05/24/2015 - 18:26 नवीन
अम्मा बाईज्जत बरी झाल्या. पुन्हा मुख्यमंत्री देखील झाल्या. देवी, तुझ्या लीला अपरंपार आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/25/2015 - 18:13 नवीन
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 19:59 नवीन
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Tue, 05/26/2015 - 04:09 नवीन
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा