Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आ
आनन्दा
Mon, 09/29/2014 - 06:29
🗣 37 प्रतिसाद
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

प्रतिक्रिया द्या
8546 वाचन

💬 प्रतिसाद (37)
भ
भिंगरी Mon, 09/29/2014 - 06:35 नवीन
निष्ठेला
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 09/29/2014 - 06:36 नवीन
व्यक्तीच्या नाही
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 09/29/2014 - 06:38 नवीन
माझे मत सासुबैंना :D 7 :P
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 09/29/2014 - 06:43 नवीन
माझेही मत जेनीच्या सासुबैना!!! (जेनी तो जेनी हाय अल्ला, मगर जेनीकी सासुबै सुभानल्ला!!!) :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 09/29/2014 - 06:49 नवीन
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पैसा Mon, 09/29/2014 - 15:14 नवीन
असंं चारचौघात सांगू नको! तू "मला" मत देणार म्हटलंस की आणखी १००० "विकासाला" देतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Mon, 09/29/2014 - 06:55 नवीन
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
काउबॉय Mon, 09/29/2014 - 20:28 नवीन
मामंजीची दया येतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
क
काळा पहाड Mon, 09/29/2014 - 21:00 नवीन
चप्पल लावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
प
प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 07:06 नवीन
अहो ह्यातल्या एका तरी पर्यायाच्या समोर, किंवा ह्यातली एक गोष्ट तरी करु शकेल असा एक तरी उमेदवार किंवा पक्ष असायला हवा ना.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 09/29/2014 - 07:09 नवीन
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 07:15 नवीन
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
व
विटेकर Mon, 09/29/2014 - 07:17 नवीन
आमी नाय सांगणार ज्जा !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 09/29/2014 - 07:22 नवीन
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Mon, 09/29/2014 - 07:25 नवीन
;)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 09/29/2014 - 07:36 नवीन
आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 09/29/2014 - 07:53 नवीन
यावेळेस आपलाही NOTA.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 07:59 नवीन
शहरी भागात तरी आप ने चांगला चान्स घालवला निवडणुकीत भाग घेउन असे वाटतय. १० तरी आमदार निवडुन आले असते.
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Mon, 09/29/2014 - 08:46 नवीन
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मार्मिक गोडसे Mon, 09/29/2014 - 08:38 नवीन
कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 09/29/2014 - 09:19 नवीन
शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/29/2014 - 09:45 नवीन
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 09/29/2014 - 11:01 नवीन
बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
काळा पहाड Mon, 09/29/2014 - 19:13 नवीन
तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास
हो ना.. फुकट खाणार्‍यांचे वांधेच झाले होते तेव्हा.. खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/30/2014 - 11:47 नवीन
ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 10/01/2014 - 08:06 नवीन
उपमा चुकीची आहे. तसं नसतं तर बोबडा इतकी वर्ष खा खा खातोय. भूक कमी झालीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
उ
उदयन Fri, 10/03/2014 - 10:14 नवीन
तेच राज्यात चालु नये हीच इच्छा वर्गणीचेच दर वाढतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
भ
भाते Mon, 09/29/2014 - 09:22 नवीन
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/29/2014 - 09:40 नवीन
हे 'गुप्त' मतदान आहे.
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Mon, 09/29/2014 - 21:09 नवीन
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विवेकपटाईत Mon, 09/29/2014 - 16:35 नवीन
बड़के भैया, छुटके भैया, चाचा-भतीजा, सर्व नातलग मंडळीच निवडणूकीत उभी आहे,संभ्रमाची स्थिती आहे
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/29/2014 - 18:54 नवीन
आपण आपल्या झोळीकडे बघुया....
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 09/29/2014 - 19:20 नवीन
जो कोणत्याही नेत्याचा नातलग नाहीये त्याला...या सगळ्या नातलगाना आपटवले पाहिजे या निवडणूकीत
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/30/2014 - 06:02 नवीन
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 06:24 नवीन
माझं मत NOTAला
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 09/30/2014 - 06:35 नवीन
एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ट
टवाळ कार्टा Tue, 09/30/2014 - 07:30 नवीन
NOTA हा लोकांना "**" बनवायला काढलेला उपाय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा