शालेय निबंध लेखन कसे करावे ?
निबंधलेखन कसे करावे
---------------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच ssc board च्या दहावी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक शोध कशाचा/कशासाठी घेतला जात असेल तर तो निबंध लेखना साठी.
हे खरयं की यातील काही विद्यार्थी नकलवण्यासाठी ही निबंध आंतरजालावर शोधत असतील पण बराच मोठा वर्ग निबंध लेखन शैली आणि निबंधाच्या विषया संदर्भाने मुद्दे गोळा करण्यासही आलेला असतो. अर्थात शालेय विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आंतरजालावर स्वतः फार कमी लेखन करतात.
आपल्या मध्ये काही जण शालेय विद्यार्थ्याचे पालक असतील, काही जण शिक्षक असू शकतील तर निबंध लेखन कसे करावे ? आणि काही विषयावरील सोदाहरण निबंध लेखन या धाग्याच्या निमीत्ताने मिळू शकल्यास विद्यार्थ्यांचाही फायदा होईल आणि महाराष्ट्रीय विद्यार्थी वर्ग मराठी संकेतस्थळांशी जरासा जोडला जाऊ शकेल असे वाटते म्हणून आपणा सर्वांना निबंध लेखन या बद्दल मार्गदर्शन आणि सहकार्याची विनंती आहे.
*या धाग्यावरील लेखन विकिप्रकल्पांसाठी मुख्यत्वे मराठी विकिबुक्स (पाठ्य) प्रकल्पासाठी वापरला जाण्याची शक्यता असू शकेल म्हणून आपले लेखन प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जाईल.
* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून विकिबुक्स प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.
* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
💬 प्रतिसाद
(52)
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 03/17/2015 - 03:40
नवीन
पाल्यांस अवांतर वाचनाची सवय लावा (लॉंग टर्म इलाज) निबंध आपोआप उत्कृष्ट होतील अथवा
विषय समजवुन द्या निबंध हा फोडल्यास
१. विषय ओळख (इंट्रोडक्शन)
२. मुख्य अंग (मेन बॉडी)
३. निष्कर्ष/स्वमत/इलाज इत्यादी शेवटी मांडा
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 03/17/2015 - 04:33
नवीन
बरोबर, पण प्रॅक्टीकली कस करणार ? खास करून मराठी पालकांची इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं यांचा शब्दसंग्रह इंग्रजी आणि मराठी दोन्ही अवांतर वाचनासाठी कितपत पुरेसा असतो ? इंग्रजी शाळांमध्ये त्यावर्षीचे विशीष्ट विषय कव्हर करण्यासाठी लागणार्या सो कॉल्ड इंग्रजी हार्डवर्ड्स पलिकडे शब्द संग्रह वाढवण्यासाठी काय मेहनत घेतली जाते या बद्दल शंकाच आहे. दुसरे घरी पाल्यांचे शाळेतून येण्यासच लागणारा १ दिडतास उशीर नंतर एक अभ्यासाचा एक खेळाचा तास अवांतर वाचनाची क्षमता आणि वेळ कुठे उरतो. अलरेडी शाळेतून बाहेर पडलेली तरुण पिढी चार ओळींच्या पुढे काही वाचावे लागले तर लगेच वैतागते लेखन कुणाचही कितीही ग्रेट अथवा महत्वाच असू द्या.
दुसरे वाचनालयांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. तर आंतरजाल हाताशी आले आहे पण छपील पुस्तकातील सर्व साहित्य आंतरजालावर आले आहे अशीही स्थिती नाही. खूपच गरज भासलीतर मुलं आंतरजालावर जाऊन गूगल वापरून कामा पुरता मामा करतात झाले.
पालकांनी काय केल्यास मुलांना अवांतर वाचनाची आवड लागेल ? पालकांकडे काही टिप्स असतील तर अवश्य द्याव्यात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2