Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ते काळे अभद्र आभाळ …।

प — प्रकाश१११, Mon, 10/06/2014 - 06:26
[अशी म्हातारी माणसे दिसतात . आज सकाळीच बघितली जोडी . वाचनालयात आणि हळू हळू घराकडे परतताना .नव्वदीच्या तरुणाचे ते लुकलुकनारे डोळे बघून ,आणि त्या पंच्याशी वय असलेल्या गम्भीर स्त्री कडे जिच्या हातात एक पुस्तक होते पानगळ सुरु आहे ह्या पानावरून चालत असताना हे सुचून गेले ] तिचा नव्वद वर्षाचा नवरा तिच्या पंच्याशी वर्षाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेऊन चालत असतो तेव्हा तो नसतोच नव्वद वर्षाचा त्याच्या अधू डोळ्यांना नाहीच दिसत तिचे थकून गेलेलं नि लोंबणारे, ओघळलेले शरीर …. तो असतो मस्त तरुण साठ वर्षापूर्वीचा आणि ती तर असते तरुण त्याच्या नजरेतून तिला पुन्हा स्पर्श करताना शप्पत अजूनही एक सळसळ फुलून जाते त्याच्या रोमारोमातून तिनेही पूर्वी केल्या होत्या कविता ह्या झाडांवर ,फुलांवर रानातील पायवाटेवर भाळून गेली होती ह्या अस्सल रांगड्या तरुणावर देखील ...... तेव्हा कविता लिहायला होता फक्त पेन आणि तिचे अक्षर होते आभाळ कविता लिहिली की शुभ्र चादानं पसरायचं त्याच्या मनात आजकाल ती लिहित नाही काहीसुद्धा बघत बसते खिडकीतून आभाळाच्या पलीकडे कधी नव्हे इतके जाणवून जाते हे काळे अभद्र आभाळ हा रांगडा तरुण गेला पाहिजे माझ्या आधी नाहीतर होऊन जाईल नको तितका म्हातारा ,केविलवाणा … फष्ट कम फष्ट गो हा नियम नाहीका माहित त्याला ...? कसे दिवस जातील त्याचे वृद्धाश्रमात मी नसेन तर माझ्याविना ......? त्याच्या मनात येत असते सारखे सारखे मी घेऊन देईन तिला एक छान कॉम्प्युटर थकल्या बोटांना कुबड्याचा आधार मग ती लिहीन पुन्हा नव्या जोमाने एक एक कविता तिच्या पंच्यांशी वर्षाच्या खांद्यावर हात ठेऊन त्याचे मन अजूनही शोधीत रहाते त्याच्या मनार रुतून बसलेल्या तिच्या त्या सुंदर रचना .....!! प्रकाश

प्रतिक्रिया द्या
1251 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नित्य नुतन Mon, 10/06/2014 - 10:01 नवीन
सुन्दर ...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/06/2014 - 10:16 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/06/2014 - 10:49 नवीन
इतक्या चांगल्या कवितेला हे असलं नाव का दिलय
  • Log in or register to post comments
क
काउबॉय Mon, 10/06/2014 - 11:20 नवीन
असेही जग बघता येते. सुंदर. खरच असे कोण असेल तर मिपावर स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 10/08/2014 - 02:20 नवीन
कालवाकालव झाली हो र्‍हदयात कविता वाचून. अशी माणसे दिसली, तर आपण आवर्जून वेळ काढून त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांचे कौतूक केले पाहिजे. केवढा आनंद, समाधान, दिलासा मिळेल त्यांना....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा