Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राजगड

स
स्पा
Wed, 10/08/2014 - 08:40
💬 69
टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :) तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली. पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता.. :-D. मग वर आलो, वरती धनाजीराव वाकडे स्वागताला होते. मग सुड च्या हातचे फक्कड फवे खाल्ले, वर झकास चाय ढोसला.तेवढ्यात वल्ली यांनी फोन करुन त्यांना एकट्याला टाकुन आम्ही इथे मजा करतोय याचा निषेढ(सॊम्य) व्यक्त केला.जाताजाता ट्रेक ला शुभेच्छा दिल्या.अकराच्या सुमारास आत्म्याचा अणि धन्याचा निरोप घेऊन परत स्वारगेट ला आलो. सुदॆवाने लगेचच भोर ला जाणारी बस मिळाली.नसरापुर फाटा येईस्तोवर मस्त झोप झाली. फाट्यावर देखिल लगेचच जिपडं मिळालं. घासाघीस करुन चारशे रुपड्यांवर डिल फायनल झालं. वाईट्टच उकडत होतं,मंबईच्या वरताण दमटपणा होता.हि सगळी सांच्याला पावसाची लक्षण दिसत होती.भोसले वाडीत पोचेस्तोवर तीन वाजुन गेलेले होते,गड समोर दिसल्यावर दिल खुष झाला. १.fgf मरणाच्या ऊन्हात गड चढायला सुरवात केली. २.fgf रस्ता विशेष कठीण नाहीये,पण भयंकर उकाड्यामुळे सतत थांबावं लागत होतं.गडाचे बुरुज दिसायला लागल्यावर मात्र अचानक वातावरण बदललं.समोर तोरण्यावरुन ढगांचे लोट यायला लागले, ३.fgf ४.fgf ५.सूड आणि किसनfgf ६.fgf ७.fgf ८.fgf दमटपणा अजुन वाढला,गडगडाट सुरु झाला, चिन्ह काही निट दिसत नव्हती, आम्ही तसंच स्वता:ला रेटत वर पळालो.वर जाई पर्यंतच गड ढगात हरवुन गेला. ९. पाली दरवाजा .fgf सर्वात आधी पद्मावतीच्या देवळात मस्त कोपरा पकडला.बाकीचे पण बरेच ग्रुप देवळात आडोशाला आले.टाक्यांमधलं गार पाणी पिऊन ताजेतवाने झालो, १०. फुलं पांघरलेली धरती आणि भरून आलेले आभाळ .fgf ११.fgf १२.fgf १३.fgf १४.fgf १५.गडावर उतरलेली सांज .fgffgf सुवेळा माची बघण्याचा बेत पावसाने ऊधळुन लावला.दाद्या जोरदार कोसळायला लागला, सोबतीला विजांचा कडकडाट.करण्यासारखे काहि नव्हतेच,देवळात पद्मावतीसमोर दिवाबत्ती झाली,संध्याकाळ दाटून आली १७.fgf मस्त गार अंधारात पाऊस ऎकत बसलो.किती महिन्यांनी अशी शांतता मिळालेली होती.फक्कड चहाचा राऊंड झाला.पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यावर अनवाणीच बाहेर पडलो.वातावरण एकदम बदलुन गेलेले होते.रात्रीच्या जेवणाचे सांगुन टाकले.तिन्हीसांजेला देवीची सुरेख आरती झाली.पाऊस परत वाढलेला होता.तिखटजाळ पिठलं,भाकर्या,ठेचा,दही,भात,असा दणकुन बेत होता,बेक्कार हाणलय सर्वांनी,गप्पा मारायचेही त्राण नव्हते,साठेआठलाच झोपुन गेलो. सकाळी पाचला ऊठलो,कडक थंडी पडलेली होती.फ्रेश होऊन गड भटकायला निघालो. १८.fgf १९.gg २०.आजूबाजूचा परिसर धुक्यात लपेटलेला होता . .fgf २१.fgf २२.fgf २३.kj २४.fgf सर्वात आधी बालेकिल्ल्यावर कूच केले.थोडासा कठीण असा मार्ग आहे. २५.fgf खडा चढ २६.fgf २७.fgf वरून दिसणारे विहंगम दृश्य २७.fgf २८.fgf २९.fgf वर जननीमंदिर,ब्रह्मेश्वराचे देऊळ,बाजारपेठ, चन्द्र तलाव अजुन काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात. ३०.fgf ३१.fgf ३२.fgf ३३.संजीवनी माची .fgf वरुन आजुबाजुच्या परीसराचा अप्रतीम नजारा दिसत होता. ३४.fgf ३५.मावळे :) .fgf दोन्ही माच्या पाहायच्या राहीलेल्या होत्या ,पण हातात कमी वेळ असल्याने उगाच घाई केली नाही.पाहायचं तर तब्येतीत,या निर्णयावर सगळे आले.खाली आल्यावर दणकुन पोहे खाल्ले.सामान आवरलं, आणि निघालो.गड उतरुन खाली भोसलेवाडीत आलो,खाली जीप कधी येईल विचारले,पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चालत पुढे निघालो.वाटेत एक नदी होती,मग डुंबण्याचा कार्येक्रम झाला, ३६.fgf ३७.fgf निघालो.पण गाडीचा पत्ता नव्हता,वाझेघर पर्यंत जवळ जवळ चार किलोमीटर ऊन्हात चाललो, ३८. शेतं. .fgf तिकडे गेल्यावर समजलं,कोणतरी जीपवाल्यांपेकी स्वर्गवासी झाल्याने आज कोणीच येणार नाही, अडीच ची एक बस येते तीही आलेली नाही.बोंबला .. साडसहाची ईंद्रायणी मिळेल की नाही याची चिंता लागायला लागली,कसाबसा एका तासाने एक टमटमवाला आला,त्याने नसरापुर फाट्यावर सोडले.तिथुन कात्रज दुसर्या टमटमने,कात्रज- स्वारगेट बसने, स्वारगेट-पुणे स्टेशन रिक्षाने असे कसेबसे बरोबर सव्वासहाला ठेसनात पोचलो,धावत धावत गाडी पकडली,रिझर्वेशन नसल्याने झक मारत उभे राहुन कसेबसे रात्री घरी पोचलो.पण राजगडची नशा मात्र काही ऒरच होती, देवळात पडुन ऎकलेला पाऊस अजुनही मनातुन जात नाहीये :-) त्यातल्या त्यात फोटूग्राफी रानफुलं fgf fgf fgf fgf fgf

प्रतिक्रिया द्या
14548 वाचन

💬 प्रतिसाद (69)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 05:46 नवीन
फोटो काहीच्या काहीच सुंदर आलेत.लेख पण मस्त!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 05:52 नवीन
सुरेख सफर घडवली आहे राजगडाची.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 10/09/2014 - 06:40 नवीन
क्लास.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 10/09/2014 - 06:48 नवीन
कहर... कहर फोटो आलेत राव !!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 06:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 07:08 नवीन
जीव गेला फोटु पहाताना. कला आहे लेका तुझ्या हातात. बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत. न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 11:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सूड गुरुवार, 10/09/2014 - 11:18 नवीन
आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 10/13/2014 - 10:55 नवीन
प्र चि १०,२७,३४ एकदम खल्लास रे स्पा, ट्रेक बाकी एकदम झकास झालेला दिसतोय
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 10/13/2014 - 13:49 नवीन
कातिल फोटु, काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का? बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का? (गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/13/2014 - 14:20 नवीन
कहर फोटो आहेत! लिखाण नेहमीप्रमाणेच!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/03/2014 - 09:01 नवीन
स्पा भाऊ, अप्रतिम फोटो आणि ट्रेक .. किसन तर एकदम डॉन दिसतोय
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 11/03/2014 - 10:26 नवीन
माताय गणेशा भौंची कमेंट धन्य जाहलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ट
टवाळ कार्टा Mon, 11/03/2014 - 11:31 नवीन
त्यांना फोटो दिसले... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
किसन शिंदे Mon, 11/03/2014 - 17:41 नवीन
हायला!! तू रे कुटनं उगवलास आनी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
किल्लेदार Mon, 11/03/2014 - 17:35 नवीन
नॉंस्टेल्जिक झालो .... मस्त
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 11/03/2014 - 23:12 नवीन
मस्त रे स्पा एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता. बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 11/04/2014 - 01:09 नवीन
लेख आवडला. फोटो तर क्लासच!
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Tue, 11/04/2014 - 01:36 नवीन
१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा